नांदेड शहरातील सिडको एमआयडीसी येथील रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या 'शिवा ग्लोबल ऍग्रो इंडस्ट्रीज' या कंपनीची भरारी पथकाने अर्धवट तपासणी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पंकज कांबळे यांनी केला आहे. या कंपनीत माती मिश्रित आणि निकृष्ट दर्जाचे खत तयार होत असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. शिवा ग्लोबल ऍग्रो इंडस्ट्रीजमध्ये पेरणीसाठी १८:१८:१०, २०:२०:०० आणि १०:२०:२० या नावांची रासायनिक खते तयार होतात. या कारखान्यामध्ये माती मिश्रित भेसळ आणि निकृष्ट खत तयार होत असल्याची तक्रार पंकज कांबळे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी यांच्याकडे केली होती. या खतांचे लॅबोरेटरी सॅम्पल घेऊन त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फेट P205, अमोनिया, पोटॅश आणि कणांचा आकार योग्य प्रकारे असणे आवश्यक आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी कळसाईत यांनी २५/६/२०२६ रोजी लातूर विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालकांना पत्र दिले होते. यामध्ये भरारी पथकाकडून कंपनीच्या खत उत्पादनाची, साठवणूक केंद्राची आणि विक्री केंद्राची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २६ जून २०२६ रोजी भरारी पथकाने कारखान्याची तपासणी केली, मात्र तक्रारदाराच्या तक्रारीनुसार रासायनिक खताचे नमुने घेण्यात आले नाहीत आणि विक्री तसेच साठवणूक केंद्राचीही तपासणी केली गेली नाही, असा आक्षेप कांबळे यांनी घेतला आहे. भरारी पथक प्रमुख मुंडे, तिडके आणि नांदेडचे गुण नियंत्रण निरीक्षक पेकम यांनी शिवा ग्लोबल ऍग्रो इंडस्ट्रीजला पाठीशी घातल्याचा आरोप करत पंकज कांबळे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना लेखी निवेदन दिले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून भरारी पथकातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या कंपनीचे धागेदोरे खूप वरपर्यंत असल्याने कोणी कारवाई करू शकत नाही, अशी चर्चा नांदेडमध्ये सुरू आहे. यावर कारवाई न झाल्यास २० जुलैपासून मंत्रालय आझाद मैदानासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.1
- शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावरील तळणी फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सध्या योग्य भाव मिळत नसून, सरकारने बी-बियाणे व खतांचे दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. निवडून येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तातडीने माफ करावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.1
- महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.1
- हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. "मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे परदेशी समितीची बैठक रद्द झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारचा जोरदार निषेध केला असून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हा एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान सभेने सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफीवरील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात आणि परदेशी समितीची बैठक त्वरित घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना, "आमदारांनो, विधानभवनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठा; अन्यथा शेतकरीच उत्तर देतील!" असा थेट आणि इशारावजा इशारा कॉ. अर्जुन आडे यांनी दिला आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.2
- नांदेडमधील SGGS समोरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शिवसेनेचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर अत्यंत आक्रमक झाले आहेत. आमदार बोंढारकर यांनी थेट कोसळलेल्या पुलाच्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला आणि त्याला चांगलेच धारेवर धरले. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून यात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार बोंढारकर यांनी केली आहे. अशा दुर्घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वच पुलांचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या कामाशी संबंधित असणाऱ्या कंपनीला थेट काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचेही बोंढारकर यांनी स्पष्ट केले।1
- परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील खरबा रोडवर दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार टक्कर झाली आहे. या भीषण अपघातामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.1