Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) जप्त केलेल्या २६० किलो ७९८ ग्रॅम अमली पदार्थांचा कायदेशीर प्रक्रियेनंतर यशस्वीरित्या नाश केला आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली. नष्ट करण्यात आलेल्या या संपूर्ण अंमली पदार्थांची एकूण किंमत ३७ लाख ६२ हजार ६४४ रुपये इतकी आहे. या कारवाईत प्रामुख्याने २६० किलो ११३ ग्रॅम गांजा, २१ ग्रॅम १५ मिलीग्रॅम एमडी पावडर आणि ६०४ ग्रॅम ६० मिलीग्रॅम चरसाचा समावेश होता. हा संपूर्ण मुद्देमाल पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील 'महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड'मध्ये सुरक्षित बंदोबस्तात नेऊन नष्ट करण्यात आला. या मोहिमेत गुन्हे शाखेसह विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
Marathi News Point
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) जप्त केलेल्या २६० किलो ७९८ ग्रॅम अमली पदार्थांचा कायदेशीर प्रक्रियेनंतर यशस्वीरित्या नाश केला आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली. नष्ट करण्यात आलेल्या या संपूर्ण अंमली पदार्थांची एकूण किंमत ३७ लाख ६२ हजार ६४४ रुपये इतकी आहे. या कारवाईत प्रामुख्याने २६० किलो ११३ ग्रॅम गांजा, २१ ग्रॅम १५ मिलीग्रॅम एमडी पावडर आणि ६०४ ग्रॅम ६० मिलीग्रॅम चरसाचा समावेश होता. हा संपूर्ण मुद्देमाल पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील 'महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड'मध्ये सुरक्षित बंदोबस्तात नेऊन नष्ट करण्यात आला. या मोहिमेत गुन्हे शाखेसह विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- औरंगाबादमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यपद्धती आणि विकासकामांबाबत विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसून, तो केवळ काही मोजक्याच व्यक्तींना मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विविध कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, विरोधकांकडून झालेल्या या आरोपांवर आमदार अब्दुल सत्तार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही।1
- औरंगाबादमध्ये एमआयएमचे (AIMIM) शहर अध्यक्ष नासेर सिद्दीकी यांचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.1
- नाथनगर–वडखा–वरझडी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. "राजकीय नेत्यांना फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच गाव आठवते का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावरून दररोज शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. नाथनगर, वडखा, वरझडी, बनगाव, गेवराई, गेवराई-२, आडगाव, लिंगदरी, दोनवाडा, खामखेडा, पिरवाडी, हालदुला आणि अजिंडव या सुमारे १२ ते १३ गावांतील नागरिक आणि शेंद्रा एमआयडीसीतील कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर तरुणांनी स्वतःच हे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.2
- छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. येथे थेट 'हल्लाबोल' आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे.1
- छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.1
- जालना येथे शासकीय डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर एका डॉक्टरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शासकीय डॉक्टरवर झालेल्या या हल्ल्यानंतर डॉक्टरांनी एकत्र येत आपली एकजूट दाखवून दिली आहे.1
- अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतात पेरणी करून तब्बल दहा दिवस उलटून गेले तरी कोंब न फुटल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. कर्ज काढून आणि घाम गाळून खरेदी केलेले बियाणे बोगस निघाल्याचा थेट आरोप करत शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि जाब विचारला. कृषी अधिकाऱ्यांसमोर संतप्त शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला. "आमच्या मुलाबाळांना कसं जगवायचं, त्यांचं शिक्षण कसं करायचं?" असा हृदयद्रावक सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली. बोगस बियाण्यांच्या या वाढत्या प्रकारामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.1
- छत्रपती संभाजीनगरच्या प्रतापनगर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. व्यावसायिक संजय लाहोटी यांच्या बंगल्यावरील सशस्त्र दरोड्याला अवघे सहा दिवस उलटत नाही तोच, याच परिसरात पुन्हा एक मोठी चोरी झाली आहे. घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती देशमुख या कामानिमित्त बाहेरगावी गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घरावर डल्ला मारला. पहाटे सुमारे ३:४५ वाजता दोन शस्त्रधारी चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला आणि लोखंडी लॅच लॉक, लाकडी दरवाजाची चौकट व कपाट फोडून अवघ्या २० मिनिटांत चोरी करून पसार झाले. चोरट्यांनी घरातून सुमारे ९ तोळे सोने, दीड किलो चांदीचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या डॉ. देशमुख यांना पोलिस ठाण्यात वीजपुरवठा नसणे आणि अधिकारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत तब्बल १० तास हेलपाटे मारावे लागल्याचा आरोप आहे. तसेच, घटनेनंतर जवळपास १२ तासांनी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. लाहोटी यांच्या बंगल्यातील दरोड्याप्रमाणेच या चोरीतही दरवाजे फोडण्याची सारखीच पद्धत वापरण्यात आल्याने, दोन्ही गुन्ह्यांमागे एकाच टोळीचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लागोपाठच्या चोऱ्यांमुळे प्रतापनगर परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले असून रहिवाशांनी पोलिसांकडे रात्रगस्त वाढविण्याची मागणी केली आहे.2