logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपळे धुमाळ येथे एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश तर संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मागील दोन दिवसात तीन बिबटे जे्र बंद करण्यात वनविभागास यश आले आहे. त्यातील पिंपळे धुमाळ येथील पिंजऱ्यात एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद झाले. त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश असून संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ५० हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली असल्याचे तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. . या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान आज पहाटे(११ मे) साडेपाच च्या  दरम्यान दरम्यान पिंपळे धुमाळ येथील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ५ वर्षे वयाची बिबट मादी आणि १.५ वर्षाचे तिचे पिल्लू अडकले. दोघांची जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे रवानगी करण्यात आली. शनिवार दिनांक ९ मे रोजी संविदणे येथे अशोक मुलानी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ७-८ वर्षे वयाची बिबट मादी अडकली. तिला जुन्नर येथे माणिकडोह निवारा केंद्र येथे पाठविण्यात आले असल्याचे तालुका वनाधिकरी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. दरम्यान यापूर्वी ४ एप्रिल २०२६ रोजी पिंपळसुटी येथे एकाच वेळी दोन बिबट जेरबंद झाले होते. . त्यातील नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे होते. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.

1 hr ago
user_Satish Dhumal
Satish Dhumal
Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago

पिंपळे धुमाळ येथे एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश तर संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मागील दोन दिवसात तीन बिबटे जे्र बंद करण्यात वनविभागास यश आले आहे. त्यातील पिंपळे धुमाळ येथील पिंजऱ्यात एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद झाले. त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश असून संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या

7dc9acea-7830-468e-b18f-b38234e53f14

हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ५० हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली असल्याचे तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. . या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान आज पहाटे(११ मे) साडेपाच च्या  दरम्यान दरम्यान पिंपळे धुमाळ येथील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ५ वर्षे वयाची बिबट मादी आणि

99ffa092-bf0e-412c-b994-04182395c8f9

१.५ वर्षाचे तिचे पिल्लू अडकले. दोघांची जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे रवानगी करण्यात आली. शनिवार दिनांक ९ मे रोजी संविदणे येथे अशोक मुलानी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ७-८ वर्षे वयाची बिबट मादी अडकली. तिला जुन्नर येथे माणिकडोह निवारा केंद्र येथे पाठविण्यात आले असल्याचे तालुका वनाधिकरी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. दरम्यान यापूर्वी ४ एप्रिल २०२६ रोजी पिंपळसुटी येथे एकाच वेळी दोन बिबट जेरबंद झाले होते. . त्यातील नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे होते. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
    1
    युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • भोर-कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंटजवळ एका एर्टिगा मोटारीचा अपघात झाला. तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळली. या घटनेत एक जण जखमी झाला असून, गाडीचेही नुकसान झाले आहे.
    2
    भोर-कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंटजवळ एका एर्टिगा मोटारीचा अपघात झाला. तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळली. या घटनेत एक जण जखमी झाला असून, गाडीचेही नुकसान झाले आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • इंदापूरच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी; प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिकं खडकवासला कॅनॉल चे उन्हाळी आवर्तन न सुटल्याने अक्षरशा जळू लागल्याने सामाजिक कार्यकर्ता भगवानराव खारतोडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सिंचन भवन पुणे येथील गेटसमोर अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यामध्ये कलम १४४ रद्द, १२ मे रोजी पाणी सोडणे, कोयता दहशत संपुष्टात आणणे इत्यादी निर्णय घेण्यात आले आहेत.
    1
    इंदापूरच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी; प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिकं खडकवासला कॅनॉल चे उन्हाळी आवर्तन न सुटल्याने अक्षरशा जळू लागल्याने सामाजिक कार्यकर्ता भगवानराव खारतोडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सिंचन भवन पुणे येथील गेटसमोर अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यामध्ये कलम १४४ रद्द, १२ मे रोजी पाणी सोडणे, कोयता दहशत संपुष्टात आणणे इत्यादी निर्णय घेण्यात आले आहेत.
    user_Sanjay  Chandgude
    Sanjay Chandgude
    Local News Reporter Indapur, Pune•
    1 hr ago
  • पुण्यातील हडपसर भागात एका मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिक अधिक सतर्क असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
    1
    पुण्यातील हडपसर भागात एका मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिक अधिक सतर्क असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सातारा जिल्ह्यात सरकारी पैशांवरच्या पंचपकवान्नाऐवजी स्वाभिमानाने मिळवलेल्या चटणी-भाकरीची चव खरी असल्याचे म्हटले जात आहे. ही चव केवळ जिभेवरच नाही, तर मेंदूतही कायम रेंगाळत राहते, असे या विचारातून अधोरेखित होते.
    1
    सातारा जिल्ह्यात सरकारी पैशांवरच्या पंचपकवान्नाऐवजी स्वाभिमानाने मिळवलेल्या चटणी-भाकरीची चव खरी असल्याचे म्हटले जात आहे. ही चव केवळ जिभेवरच नाही, तर मेंदूतही कायम रेंगाळत राहते, असे या विचारातून अधोरेखित होते.
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.
    1
    पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार राम पाचकाळे यांनी अनोखे आंदोलन करत जाळीत उडी घेतली. आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याऐवजी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.
    1
    पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार राम पाचकाळे यांनी अनोखे आंदोलन करत जाळीत उडी घेतली. आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याऐवजी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक खोल्या रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचा नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे. यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. काही रुग्णांना तर दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागल्याने घाटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक खोल्या रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचा नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे. यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. काही रुग्णांना तर दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागल्याने घाटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम चित्रकला सादर केली. त्यांच्या या कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम चित्रकला सादर केली. त्यांच्या या कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
    user_My Lovely School
    My Lovely School
    Teacher सिन्नर, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.