पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील ५१,३३० शेतकऱ्यांना ३८१ कोटी ९४ लाख रुपयांची कर्जमाफी नांदेड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात ५१ हजार ३३० शेतकऱ्यांसाठी ३८१ कोटी ९४ लाख ६७ हजार ३८ रुपये इतकी कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील संबंधित बँकांमध्ये वर्ग करण्यात आली असून, लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही संबंधित बँकांकडून सुरू आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ५३५ कर्जदार शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ३६ लाख ९ हजार ७३१ रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी दिली आहे. यापूर्वी योजनेच्या पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील १२ हजार ९२९ पात्र शेतकऱ्यांसाठी १०६ कोटी २४ लाख ९८ हजार २३१ रुपये इतकी रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यात आली असून, सदर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यास पात्रता प्राप्त होते. दरम्यान, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील ७३ हजार ६६६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. अद्याप २३ हजार १०६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यापैकी १२ हजार २५७ शेतकऱ्यांकडे अद्याप ॲग्रीस्टॅक आयडी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही. ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक आयडी नाही, त्यांनी तात्काळ ॲग्रीस्टॅक आयडी काढून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी विलंब न करता प्रमाणीकरण पूर्ण करून शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

- मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सामाजिक संदेश; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान1
- नांदेड महापालिकेतील भ्रष्टाचार कधी थांबणार..... उपमहापौर दीपक सिंह रावत, प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक तुलजेश यादव, बजरंग ठाकूर नगरसेवक प्रतिनिधी यांनी केले स्टिंग ऑपरेशन जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी पहा पूर्ण प्रकरण काय आहे संपूर्ण व्हिडिओ हेडफोन लावून ऐकणे1
- 🚨 Nanded Crime | किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त; ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात 📍किनवट | २७ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या कथित निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ₹१,०३,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालात गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ लोखंडी मशीन, चुना, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, प्लास्टिक पिशव्या, मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ आणि ॲल्युमिनियमची पात्रे यांचा समावेश आहे. या प्रकरणी व्यंकट गंगाराम नागनुरवार (रा. फुलेनगर, गोकुंदा, किनवट) याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. 💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,०३,८०० या कारवाईबद्दल तुमचं मत कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #Kinwat #NandedNews #Gutkha #NandedPolice #PoliceAction #NandedUpdates #NandigramTimes1
- ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? हिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात बोरगड येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त ₹२० हजारांची मागणी केल्याचा आणि पैसे घेतल्यानंतर ते नाकारत वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद भाषा केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. त्या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा केवळ एका शेतकऱ्याचा अपमान नाही; हा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, पैशांची मागणी आणि दादागिरी करण्यासाठी नाही! या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे. आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही — वामनराव पाटील वडगावकर #रोखठोक #हिमायतनगर #नांदेड #भूमीअभिलेख #शेतकरी शेतकरीसन्मान शेतकरीन्याय बोरगड पांदणरस1
- 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪 #खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी1
- शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड1
- अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा? या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. — प्रतिनिधी, उमरखेड4
- प्रमुख मागण्या आहेत 2024 पासून करार झालेला असून त्या करारामध्ये हॉलिडेज बँकिंग पाच दिवसाचा आठवडाची मागणी1