logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महानगरपालिकेने मंदिरातील मारुतीची मूर्ती हटवली शेडही केला जमीन दोस्त मंदिरातील मुर्ती हटविल्याच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाद्वारे निदर्शने परभणी,(प्रतिनिधी) शहरातील वांगी रस्त्यावरील अपना नगर भागात एका तीन शेडमध्ये मंदिर उभारून त्यात मारोती ची मूर्ती ठेवण्यात आली होती. शेड मध्ये असलेल्या या मंदिरातील मारोतीची मुर्ती महानगरपालिकेच्या एका पथकाने आज मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात हटवली सोबत या ठिकाणी असलेल्या ओट्यासह टीनशेड जमीनदोस्त करण्यात आले. महानगरपालिकेच्या या कारवाईच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजबांधवांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना हनुमानाची मुर्ती हटविल्यासह ओटा व शेड जमीनदोस्त केल्याबद्दल जाब विचारला. गेल्या नऊ वर्षांपूर्वी मारोतीची या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. परिसरातील हिंदु बांधव रोज या मंदिरात पुजापाठ करीत आले आहेत. या मंदिराचा कोणालाही त्रास नाही. असे असतांना महापालिकेच्या पथकाने मंगळवारी पहाटे 3 वाजता पोलिसांच्या फौजफाट्यासह मंदिरातील मुर्ती हटविली व मुर्तीची विटंबना केली. मंदिराच्या ओट्याची तोडफोड करुन शेड जमीनदोस्त केले. या संबंधीची कारवाई भल्या पहाटे तीन वाजता कोणत्या अधिकार्‍याने केली व का केली याचा खूलासा करावा, अशी मागणी भरोसे यांनी केली. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी हे बेकायदेशीर कृत्य करणार्‍या अधिकार्‍यांविरुध्द कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

on 24 March
user_Mohsin ahmed khan
Mohsin ahmed khan
Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
on 24 March
a5b646f0-fa03-4b3a-9192-fa76febe6664

महानगरपालिकेने मंदिरातील मारुतीची मूर्ती हटवली शेडही केला जमीन दोस्त मंदिरातील मुर्ती हटविल्याच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाद्वारे निदर्शने परभणी,(प्रतिनिधी) शहरातील वांगी रस्त्यावरील अपना नगर भागात एका तीन शेडमध्ये मंदिर उभारून त्यात मारोती ची मूर्ती ठेवण्यात आली होती. शेड मध्ये असलेल्या या मंदिरातील मारोतीची मुर्ती महानगरपालिकेच्या एका पथकाने आज मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात हटवली सोबत या ठिकाणी असलेल्या ओट्यासह टीनशेड जमीनदोस्त करण्यात आले. महानगरपालिकेच्या या कारवाईच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजबांधवांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना हनुमानाची मुर्ती हटविल्यासह ओटा व शेड जमीनदोस्त केल्याबद्दल जाब विचारला. गेल्या नऊ वर्षांपूर्वी मारोतीची या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. परिसरातील हिंदु बांधव रोज या मंदिरात पुजापाठ करीत आले आहेत. या मंदिराचा कोणालाही त्रास नाही. असे असतांना महापालिकेच्या पथकाने मंगळवारी पहाटे 3 वाजता पोलिसांच्या फौजफाट्यासह मंदिरातील मुर्ती हटविली व मुर्तीची विटंबना केली. मंदिराच्या ओट्याची तोडफोड करुन शेड जमीनदोस्त केले. या संबंधीची कारवाई भल्या पहाटे तीन वाजता कोणत्या अधिकार्‍याने केली व का केली याचा खूलासा करावा, अशी मागणी भरोसे यांनी केली. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी हे बेकायदेशीर कृत्य करणार्‍या अधिकार्‍यांविरुध्द कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

More news from Maharashtra and nearby areas
  • महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार
    1
    महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • निर्भीड पत्रकार तथा दैनिक बुलंद शक्ती चे संपादक मा. रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात दरेकर हे निर्भीड, पुराव्यानिशी पत्रकारिता करणारे व जनहितासाठी सातत्याने लढणारे पत्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, राज्यातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर दरेकर यांनी संबंधितांच्या मालमत्तेबाबत सखोल व पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला असला, तरी तो महसूलमंत्री यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. रामेश्वर दरेकर यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या कथित भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व पुरावे समोर आणणे, लाचलुचपत प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणे तसेच अवैध धंदे व प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या प्रकरणाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याचे नमूद करत, गुन्ह्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी तसेच दरेकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
    1
    निर्भीड पत्रकार तथा दैनिक बुलंद शक्ती चे संपादक मा. रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात दरेकर हे निर्भीड, पुराव्यानिशी पत्रकारिता करणारे व जनहितासाठी सातत्याने लढणारे पत्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, राज्यातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर दरेकर यांनी संबंधितांच्या मालमत्तेबाबत सखोल व पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला असला, तरी तो महसूलमंत्री यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
रामेश्वर दरेकर यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या कथित भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व पुरावे समोर आणणे, लाचलुचपत प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणे तसेच अवैध धंदे व प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
या प्रकरणाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याचे नमूद करत, गुन्ह्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी तसेच दरेकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    14 hrs ago
  • मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
    1
    मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी  मोठी गर्दी केली होती.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला पदभार. शूरू ॲप तर्फे मराठी न्यूज. लातूर, शनि. दि. ०४ एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४ एप्रिल 2026) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
    3
    नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला पदभार.
शूरू ॲप तर्फे मराठी न्यूज. लातूर, शनि. दि. ०४ एप्रिल 2026.
लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४ एप्रिल 2026) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • निलंग्यात छावा संघटना आक्रमक; जिओ कंपनीचा मनमानी कारभार आणि नाटक खपवून घेतले जाणार नाही," असा इशारा देत छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास (भैया) साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आज जिओ कार्यालयाला टाळे ठोकून कामकाज बंद पाडण्यात आले. नमस्कार छावा महाराष्ट्राचा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे निलंगा येथील जिओ ऑफिस ची ​नेमकी घटना काय? ​गेल्या काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील जिओ ग्राहकांना विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपनीच्या प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांमध्ये मोठा असंतोष होता. या पार्श्वभूमीवर, छावा संघटनेने आज थेट कृती करत कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. ​'नाटकं चालणार नाहीत' - दास साळुंके ​या आंदोलनावेळी बोलताना दास साळुंके म्हणाले की, कंपनी केवळ आश्वासनांचे गाजर दाखवत असून प्रत्यक्ष सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. "निलंग्याच्या मातीत ग्राहकांची फसवणूक आणि प्रशासकीय नाटकं अजिबात सहन केली जाणार नाहीत," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
    1
    निलंग्यात छावा संघटना आक्रमक;  जिओ कंपनीचा मनमानी कारभार आणि नाटक खपवून घेतले जाणार नाही," असा इशारा देत छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास (भैया) साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आज जिओ कार्यालयाला टाळे ठोकून कामकाज बंद पाडण्यात आले.
नमस्कार छावा महाराष्ट्राचा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे 
बातमी आहे निलंगा येथील जिओ ऑफिस ची 
​नेमकी घटना काय?
​गेल्या काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील जिओ ग्राहकांना विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपनीच्या प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांमध्ये मोठा असंतोष होता. या पार्श्वभूमीवर, छावा संघटनेने आज थेट कृती करत कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.
​'नाटकं चालणार नाहीत' - दास साळुंके
​या आंदोलनावेळी बोलताना दास साळुंके म्हणाले की, कंपनी केवळ आश्वासनांचे गाजर दाखवत असून प्रत्यक्ष सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. "निलंग्याच्या मातीत ग्राहकांची फसवणूक आणि प्रशासकीय नाटकं अजिबात सहन केली जाणार नाहीत," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड
    1
    परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.