शाळांची दुरुस्ती, मूलभूत सुविधांच्या कामांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र लातूर प्रतिनिधी बाळकृष्ण कदम लातूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका शाळांमधील मुला-मुलींची स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, वर्गखोल्या दुरुस्ती, सुरक्षा भिंत आणि वीज पुरवठा या मूलभूत सुविधांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन युद्धपातळीवर नियोजन व लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वैयक्तिक लक्ष देवून आढावा घेत असून त्यांच्या सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शाळानिहाय कामांचा आराखडा तयार करून कालबद्ध कार्यक्रम राबवावा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शाळा दुरुस्ती, देखभाल व मूलभूत सुविधांबाबत आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह शिक्षण विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, लाईट, पंखे, पिण्याचे पाणी आणि वीज जोडणी या सुविधा अनिवार्य असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. भोसले यांनी कोणत्या शाळेत कोणत्या सुविधांची गरज आहे, याची माहिती शिक्षण विभागाने तातडीने संकलित करावी आणि प्रत्यक्ष कामास विलंब न लावता सुरुवात करावी, असे सांगितले. शाळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध माध्यमातून उपलब्ध होणारा निधी प्राधान्याने वापरण्यात यावा. तसेच आवश्यकतेनुसार जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा वापर करून कालबद्ध कार्यक्रम राबवावा. शाळांच्या रंगरंगोटी, विद्यार्थ्यांना बाकडे या कामांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मधूनही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. तसेच या कामांचा यापुढे सातत्याने आढावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १,२६८ शाळांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या वर्गखोल्या, स्वच्छता गृहे, विद्युत जोडणी, सुरक्षा भिंत व इतर सुविधा याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी यावेळी मांडली. लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी लातूर शहरातील शाळांबाबत माहिती दिली.
शाळांची दुरुस्ती, मूलभूत सुविधांच्या कामांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र लातूर प्रतिनिधी बाळकृष्ण कदम लातूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका शाळांमधील मुला-मुलींची स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, वर्गखोल्या दुरुस्ती, सुरक्षा भिंत आणि वीज पुरवठा या मूलभूत सुविधांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन युद्धपातळीवर नियोजन व लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वैयक्तिक लक्ष देवून आढावा घेत असून त्यांच्या सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शाळानिहाय कामांचा आराखडा तयार करून कालबद्ध कार्यक्रम राबवावा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शाळा दुरुस्ती, देखभाल व मूलभूत सुविधांबाबत आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह शिक्षण विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित
होते. प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, लाईट, पंखे, पिण्याचे पाणी आणि वीज जोडणी या सुविधा अनिवार्य असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. भोसले यांनी कोणत्या शाळेत कोणत्या सुविधांची गरज आहे, याची माहिती शिक्षण विभागाने तातडीने संकलित करावी आणि प्रत्यक्ष कामास विलंब न लावता सुरुवात करावी, असे सांगितले. शाळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध माध्यमातून उपलब्ध होणारा निधी प्राधान्याने वापरण्यात यावा. तसेच आवश्यकतेनुसार जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा वापर करून कालबद्ध कार्यक्रम राबवावा. शाळांच्या रंगरंगोटी, विद्यार्थ्यांना बाकडे या कामांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मधूनही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. तसेच या कामांचा यापुढे सातत्याने आढावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १,२६८ शाळांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या वर्गखोल्या, स्वच्छता गृहे, विद्युत जोडणी, सुरक्षा भिंत व इतर सुविधा याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी यावेळी मांडली. लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी लातूर शहरातील शाळांबाबत माहिती दिली.
- निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.1
- रस्त्यावरच महिलेची प्रसूती जिल्हा रुग्णालय स्टाफ नर्सचा प्रसुती साठी नकार बुलढाणा मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावरच एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला प्रसूतीच्या वेदनांनी रस्त्यावर तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. शेवटी एका खाजगी नर्सच्या मदतीने रस्त्यावर या महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.आज सकाळी सहा वाजता अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या. त्या महिलेचे पोट दुखू लागल्याने आणि महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता घरात कोणीच नव्हते आणि महिला जेव्हा चालत आली तेव्हा ती ओट्यावर पडली. अर्भकाचा काही भाग बाहेर आणि काही भाग आत होता.1
- 📍लातूरकरांनो 1 /9 /2026 पासून लातुरात सुरु होणार हेल्मेट शक्ती. हेल्मेट वापरा आणि आपला अमूल्य जीव वाचवा.1
- दुचाकी स्वरांनी हेल्मेट वापरण्याच्या संदर्भामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्याचे आवाहन अन्न... वस्त्र... निवारा... आणि हेल्मेट! हेल्मेट ही आता काळाची गरज; स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरण्याचे लातूर पोलिसांचे आवाहन. लातूर (प्रतिनिधी) मानवाच्या जीवनातील अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि वाहतुकीचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले. आजच्या वेगवान युगात रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यासोबत वाढणारे अपघात पाहता ‘हेल्मेट’ हीदेखील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. या अपघातांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्ते व्यक्ती आपला जीव गमावत आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जात आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा हा केवळ वाहतूक विभागाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी आणि संपूर्ण कुटुंबाच्या भवितव्याशी निगडित सामाजिक प्रश्न आहे. *हेल्मेट दंडापासून बचावासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी!* दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट म्हणजे केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्याची वस्तू नाही, तर अपघाताच्या वेळी डोक्याचे संरक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. अपघात कोणाला आणि कधी होईल, हे सांगता येत नाही. मात्र अपघाताच्या वेळी योग्य दर्जाचे हेल्मेट वापरलेले असल्यास डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी करण्यास मोठी मदत होते.त्यामुळे ‘पोलीस कारवाई होईल म्हणून हेल्मेट घालायचे’ हा दृष्टिकोन बदलून ‘माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट घालायचे’ हा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वीकारणे आवश्यक आहे. *१ सप्टेंबरपासून हेल्मेट वापर अनिवार्य.* लातूर जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दिनांक १ सप्टेंबर २०२६ पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.हा निर्णय नागरिकांवर बंधन लादण्यासाठी नसून नागरिकांचे प्राण वाचविणे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे या व्यापक उद्देशाने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाकडे केवळ नियम किंवा कारवाईच्या दृष्टिकोनातून न पाहता, स्वतःच्या सुरक्षिततेसाठीची सामाजिक जबाबदारी म्हणून पाहावे, असे आवाहन लातूर पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. *समाजाभिमुख पोलीसिंगचा केंद्रबिंदू — नागरिकांची सुरक्षितता.* पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या दूरदृष्टीतून लातूर पोलीस दलाकडून कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच ‘समाजाभिमुख पोलीसिंग’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यात येत आहे. पोलिसांचे काम केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे एवढ्यापुरते मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हेदेखील पोलिसांचे महत्त्वाचे सामाजिक दायित्व आहे.याच भावनेतून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. *‘मी हेल्मेट वापरेन’... एवढाच संकल्प पुरेसा नाही!* प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतः हेल्मेट वापरण्याबरोबरच आपल्या घरातील प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे. पालकांनी आपल्या मुलांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगावे. मित्रांनी मित्राला, सहकाऱ्याने सहकाऱ्याला आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या परिचितांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रवृत्त करावे. लातूर पोलीस दलाचे आवाहन आहे की, १ सप्टेंबरपासून हेल्मेट वापरण्याची सक्ती लागू होण्याची वाट न पाहता आजपासूनच हेल्मेट वापरण्याची सवय लावा. स्वतः हेल्मेट वापरा, आपल्या कुटुंबीयांना हेल्मेट वापरायला सांगा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा. चला... नियमांसाठी नव्हे, तर आपल्या जीवनासाठी हेल्मेट वापरूया! चला... सुरक्षित प्रवासाची संस्कृती निर्माण करूया! चला... अपघातमुक्त आणि सुरक्षित लातूरसाठी हातात हात घालूया!1
- शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात; राजकीय झेंडे बाजूला ठेवून हक्कांसाठी एकजूट होऊन लढा- उत्तमराव माने *शेतकरी भावा, जागा हो; कष्ट शेतकऱ्यांचे, नफा इतरांचा- उत्तमराव माने* *शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात; राजकीय झेंडे बाजूला ठेवून हक्कांसाठी एकजूट होऊन लढा- उत्तमराव माने* *शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम नाही; नफा मात्र इतरांच्या खिशात : उत्तमराव माने* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शेतीमध्ये कष्ट करून उत्पादन घेतलेल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नसून, त्यांच्या मालाचा भाव सरकार आणि व्यापारी ठरवतात. मात्र हाच कच्चा माल प्रक्रिया करून पक्का झाल्यानंतर त्या मालाची किंमत कारखानदार आणि व्यापारी ठरवतात. ही केवळ भावनिक बाब नसून भारतीय शेती व्यवस्थेतील विसंगतीचे वास्तव उदाहरण आहे, असे मत शेतकरी नेते उत्तमराव माने यांनी व्यक्त केले. शेतकरी बाप व भाऊ पिढ्यान्पिढ्या आपल्या वडिलोपार्जित जमिनीत रात्रंदिवस कष्ट करून शेतीमाल पिकवतो. वर्षभर निसर्गाच्या संकटांचा सामना करून स्वतःजवळील भांडवल तसेच बँक व सावकार यांचे कर्ज घेऊन शेतीत गुंतवणूक करतो. त्याच्या उत्पादनातून अनेक घटकांना उत्पन्न मिळते; मात्र शेती उद्योगाचा पाया असलेल्या शेतकऱ्यालाच स्वतःकष्ट करून काढलेल्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत नाही, ही भारतीय शेतकऱ्यांसमोरील मोठी शोकांतिका आहे. जमिनीची मशागत, बियाणे खरेदी, लागवड खर्च, खते, औषधे, वीज, खुरपणी व तण नियंत्रण, सिंचन, मजुरी आणि स्वतःची मेहनत यांचा हिशोब केला, तर शेतकऱ्याला शेती करणेही कठीण होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही शेतकऱ्याची हीच वास्तविक परिस्थिती असल्याचे सांगितले. अनुदान, कर्जमाफी, वीज सवलत आणि विविध योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांवर उपकार केल्याचे चित्र निर्माण करते. मात्र शेतकऱ्याला कायमस्वरूपी स्वावलंबी करण्याऐवजी त्याला मदतीवर अवलंबून ठेवण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकारांकडून राबवले जात असल्याची आजतागयात परिस्थिती आहे. ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्याचा कागदोपत्री मालक असला, तरी प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत त्याला डावलले जात आहे. कारखान्याच्या व्यवहाराबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी जागरूक होणे गरजेचे आहे. देशातील उद्योगपतींच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाते, कर्जावरील व्याज कमी केले जाते आणि विविध सवलती दिल्या जातात. वेळप्रसंगी कर्जमाफीही केली जाते. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या कर्जाबाबत निर्णय घेताना सरकार हात आखडता घेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “शेतकरी भावांनो, आपल्या शेतात मेहनत व कष्ट करून पिकवलेल्या मालाच्या घामाचा योग्य आर्थिक मोबदला मिळवायचा असेल, तर राजकीय झेंडे बाजूला ठेवा आणि आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढा. अन्यथा पिढ्यान्पिढ्या सरकार कोणत्याही पक्षाचे आले, तरी शेतीमालाची लूट थांबणार नाही. या फसव्या व्यवस्थेविरोधात शेतकरी भावांनो जागे होण्याची गरज आहे,”असे मत शेतकरी नेते उत्तमराव माने यांनी व्यक्त केले.3
- शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शिवसेना नेते तथा अक्कलकोट तालुक्याचे दानशूर नेतृत्व मा. शंकर (मालक) म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुबारक कोरबू, आझम शेख, जी. अशपाक मुजावर, मजीद कोरबू आदी उपस्थित होते.1
- लातूर वाहतूक शाखेचा 'फटाका सायलेन्सर' लावणाऱ्यांवर बडगा; सात बुलेटस्वारांना ठोठावला दंड लातूर वाहतूक शाखेचा 'फटाका सायलेन्सर' लावणाऱ्यांवर बडगा; सात बुलेटस्वारांना ठोठावला दंड. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणारे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर लातूर शहर वाहतूक शाखेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. काल राबवलेल्या विशेष मोहिमेत अशा 7 बुलेटस्वारांवर दंडात्मक कार्यवाही करत ७,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. काही वाहनचालक आपल्या बुलेटमध्ये बेकायदेशीरपणे फटाका सायलेन्सर बसवून शहरातून वावरत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या कर्णकर्कश आणि अवाजवी आवाजामुळे लहान मुले, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम हाती घेतली. नॉईज लेव्हल मीटरने होणार तपासणी: येत्या दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. वाहनांच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी 'नॉईज लेव्हल मीटर'चा वापर करून थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्या दुचाकीस्वारांनी नियमबाह्य सायलेन्सर बसवले आहेत, त्यांनी ते तात्काळ काढून कंपनीचे अधिकृत सायलेन्सर लावावेत, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाचे आवाहन: "वाहनाचा कर्णकर्कश आवाज ही स्टाईल नसून, तो इतरांच्या त्रासाचे कारण ठरतो. सायलेन्सरचा गैरवापर करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी नियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे."3
- दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — ५ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवर इचलकरंजी पोलिसांची अरेरावी? खाकीच्या दादागिरीवर संताप! इचलकरंजीमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत कथितरित्या झालेल्या ‘घाणेरड्या स्पर्शा’च्या गंभीर प्रकाराने संतापाची लाट निर्माण झाली आहे. आपल्या चिमुकलीला न्याय मिळावा, यासाठी आई पोलीस ठाण्यात धाव घेते; मात्र तिथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडून कथितरित्या “आम्ही दखल घेणार नाही, कोर्टात जा” असे सांगण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या सुरक्षेचा आणि लैंगिक अत्याचाराच्या संशयाचा प्रश्न असताना, तक्रारदार महिलेची व्यथा ऐकून घेणे आणि कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया करणे अपेक्षित असताना तिला थेट न्यायालयाचा मार्ग दाखवण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे. POCSO कायद्यांतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना अत्यंत गांभीर्याने हाताळण्याची गरज असते. अशा संवेदनशील प्रकरणात पीडित बालक आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी जर पोलीस अधिकाऱ्याकडून अरेरावी झाली असेल, तर ही बाब अधिक गंभीर ठरते. आई आपल्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचते. तिच्या डोळ्यासमोर केवळ आपल्या पाच वर्षांच्या मुलीची सुरक्षितता आणि न्याय असतो. अशा वेळी खाकी वर्दीकडून तिला धीर, कायदेशीर मार्गदर्शन आणि संरक्षणाची अपेक्षा असते. मात्र, तक्रारच ऐकून घेण्यास नकार दिल्याचा आरोप खरा असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी दाद मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्याने नेमके काय म्हटले, तक्रार घेण्यास नकार देण्यात आला का, घटनेबाबत कायदेशीर प्रक्रिया का सुरू झाली नाही आणि पीडित बालिकेच्या संरक्षणासाठी कोणती पावले उचलण्यात आली, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात दोषी कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होईल; मात्र तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले असेल, तर त्या भूमिकेचीही चौकशी झालीच पाहिजे. बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा अरेरावी खपवून घेतली जाऊ नये. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी! विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि चिमुकलीच्या कुटुंबाला आवश्यक कायदेशीर मदत मिळवून द्यावी. पाच वर्षांच्या लेकराच्या न्यायाचा प्रश्न आहे. हा प्रश्न दाबण्याचा नाही, तर सत्य बाहेर आणण्याचा आहे! खाकीचा मान राखायचा असेल तर आधी खाकीवरचा विश्वास कायम ठेवावा लागेल. #IchalkaranjiPolice #KolhapurPolice #JusticeForChild #POCSO #PoliceAccountability #KolhapurSP #IGPKolhapur #MaharashtraPolice #JusticeForVictim #ChildSafety1