सोयगावमध्ये भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न हिंदू एकजुटीवरच भारताचे भविष्य – आशुतोष झा सोयगावमध्ये भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न हिंदू एकजुटीवरच भारताचे भविष्य – आशुतोष झा दत्तात्रय काटोले, सोयगाव सोयगाव (ता. 29 मार्च 2025): सोयगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाले. या संमेलनाला संत-महंत, प्रखर हिंदुत्ववादी वक्ते तसेच सोयगाव व परिसरातील हजारो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक हनुमान चालीसा पठण व दीपप्रज्वलन करण्यात आले. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या संमेलनात धर्म, संस्कृती आणि राष्ट्रनिर्माण यांवर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते आशुतोष झा यांनी “हिंदूंच्या एकजुटीवरच भारताचे भविष्य अवलंबून आहे” असे प्रतिपादन केले. तसेच हिंदूंना जाती-पातीमध्ये विभागण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. संमेलनात पूज्य संत गोपाल चैतन्य बाबाजी, स्वामी ब्रह्मानंद महाराज, गोरक्षनाथ आबुज, सारिका ताई मिसाळ (यशोदा माता), जान्हवीताई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वामी ब्रह्मानंद यांनी सनातन धर्मातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार स्तंभांचे महत्त्व स्पष्ट केले, तर गोरक्षनाथ आबुज यांनी हे संमेलन समाजातील एकजूट आणि आत्मपरीक्षणासाठी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश जोशी यांनी केले, सूत्रसंचालन हर्षल हिंदू यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधन्वा केणेकर यांनी मानले. शेंदुर्णी बायपास रोडवर आयोजित या संमेलनात विविध गणेश मंडळ, दुर्गा मंडळ तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण शांततेत पार पडले. या भव्य आयोजनासाठी स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. सोयगावच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज एकत्र आल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या संमेलनातून समाजात एकात्मता, संस्कार आणि सांस्कृतिक जागृतीचा संदेश दिला गेला. भविष्यातही अशा उपक्रमांमुळे नवीन पिढी घडावी आणि सोयगावचे नाव उज्ज्वल व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे थोर संत गोपाल चैतन्य बाबाजी, स्वामी ब्रह्मानंद जी महाराज, श्री.गोरक्षनाथ आबूज, आशुतोष झा, साध्वी सारिका ताई वृंदावन .ह भ.प. सुधन्वा केनेकर महाराज , ह.भ.प. जान्हवी ताई सोनवणेया सर्व संतांचे अमृतवचन आपणा सर्व सोयगाववासी हिंदूंना नक्कीच सदैव दिशा देणारे ठरतील. कार्यक्रम संपल्यावर सुद्धा अगदी शांततेने फराळ प्रसादाच्या पंगती कोणताही गोधळ न करता झाल्या, सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांचे सुद्धा आभार मानावे तेवढे थोडे आहेत. विशेष म्हणजे एवढ्या भव्य हिंदू संमेलननातून श्री संत रामकृष्ण दादा नाईक गुरुजी यांचे सोयगावकर भाविकांवर असलेले संस्कार स्पष्ट दिसले व त्या गोष्टीचे कौतुक स्वतः आशुतोष झा यांनीही केले आणि याचा उल्लेख आपल्या आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आभार मानताना केला. व समर्पण फाउंडेशन यांचे सदस्य व हर्षल हिंदू फुसे त्यांचे परिश्रम व तत्परता त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच होणार. असेच संस्कार संस्कृतीची शिकवण देणारे कार्यक्रम आपल्या सोयगाव नगरी मध्ये सतत होत राहून नवीन पिढीही घडत राहो व आपल्या गावाचे नाव रोशन होत राहो हीच सदिच्छा. परत एकदा सकल हिंदु समाज व समितीचे कोटी कोटी आभार. कृषीभूषण अरूण श्रीराम सोहणी फोटो दत्तात्रय काटोले
सोयगावमध्ये भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न हिंदू एकजुटीवरच भारताचे भविष्य – आशुतोष झा सोयगावमध्ये भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न हिंदू एकजुटीवरच भारताचे भविष्य – आशुतोष झा दत्तात्रय काटोले, सोयगाव सोयगाव (ता. 29 मार्च 2025): सोयगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाले. या संमेलनाला संत-महंत, प्रखर हिंदुत्ववादी वक्ते तसेच सोयगाव व परिसरातील हजारो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक हनुमान चालीसा पठण व दीपप्रज्वलन करण्यात आले. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या संमेलनात धर्म, संस्कृती आणि राष्ट्रनिर्माण यांवर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते आशुतोष झा यांनी “हिंदूंच्या एकजुटीवरच भारताचे भविष्य अवलंबून आहे” असे प्रतिपादन केले. तसेच हिंदूंना जाती-पातीमध्ये विभागण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. संमेलनात पूज्य संत गोपाल चैतन्य बाबाजी, स्वामी ब्रह्मानंद महाराज, गोरक्षनाथ आबुज, सारिका ताई मिसाळ (यशोदा माता), जान्हवीताई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वामी ब्रह्मानंद यांनी सनातन धर्मातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार स्तंभांचे महत्त्व स्पष्ट केले, तर गोरक्षनाथ आबुज यांनी हे संमेलन समाजातील एकजूट आणि आत्मपरीक्षणासाठी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश जोशी यांनी केले, सूत्रसंचालन हर्षल हिंदू यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधन्वा केणेकर यांनी मानले. शेंदुर्णी बायपास रोडवर आयोजित या संमेलनात विविध गणेश मंडळ, दुर्गा मंडळ तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण शांततेत पार पडले. या भव्य आयोजनासाठी स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्वत्र
कौतुक करण्यात आले. सोयगावच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज एकत्र आल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या संमेलनातून समाजात एकात्मता, संस्कार आणि सांस्कृतिक जागृतीचा संदेश दिला गेला. भविष्यातही अशा उपक्रमांमुळे नवीन पिढी घडावी आणि सोयगावचे नाव उज्ज्वल व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे थोर संत गोपाल चैतन्य बाबाजी, स्वामी ब्रह्मानंद जी महाराज, श्री.गोरक्षनाथ आबूज, आशुतोष झा, साध्वी सारिका ताई वृंदावन .ह भ.प. सुधन्वा केनेकर महाराज , ह.भ.प. जान्हवी ताई सोनवणेया सर्व संतांचे अमृतवचन आपणा सर्व सोयगाववासी हिंदूंना नक्कीच सदैव दिशा देणारे ठरतील. कार्यक्रम संपल्यावर सुद्धा अगदी शांततेने फराळ प्रसादाच्या पंगती कोणताही गोधळ न करता झाल्या, सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांचे सुद्धा आभार मानावे तेवढे थोडे आहेत. विशेष म्हणजे एवढ्या भव्य हिंदू संमेलननातून श्री संत रामकृष्ण दादा नाईक गुरुजी यांचे सोयगावकर भाविकांवर असलेले संस्कार स्पष्ट दिसले व त्या गोष्टीचे कौतुक स्वतः आशुतोष झा यांनीही केले आणि याचा उल्लेख आपल्या आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आभार मानताना केला. व समर्पण फाउंडेशन यांचे सदस्य व हर्षल हिंदू फुसे त्यांचे परिश्रम व तत्परता त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच होणार. असेच संस्कार संस्कृतीची शिकवण देणारे कार्यक्रम आपल्या सोयगाव नगरी मध्ये सतत होत राहून नवीन पिढीही घडत राहो व आपल्या गावाचे नाव रोशन होत राहो हीच सदिच्छा. परत एकदा सकल हिंदु समाज व समितीचे कोटी कोटी आभार. कृषीभूषण अरूण श्रीराम सोहणी फोटो दत्तात्रय काटोले
- जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ1
- सिडकोत रिक्षा चालकांचा आक्रमक पवित्रा; प्रवाशांना अडवणाऱ्यांवर कडक कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात रिक्षा चालकांनी गॅस टंचाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला असून, या पार्श्वभूमीवर सिडको चौक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. संपादरम्यान काही रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, काही चालकांनी सिटी बस तसेच सुरू असलेल्या रिक्षा अडवून प्रवाशांना प्रवास करण्यास मज्जाव केला. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने वाहनांतून खाली उतरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घटनेची माहिती मिळताच सिडको वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात आली. काहींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.1
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- Post by गणेश मौर्य1
- औरळा नगरीत श्री लक्ष्मी देवीचा जन्मोत्सव: शिस्त आणि भक्तीचा आदर्श संगम!2
- धुळे शहरासह परिसरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील वलवाडी शिवार, कुसुंबे तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आहे. सायंकाळी सुमारे 4:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही भागात हलकी ते मध्यम गारपीट झाल्याने हवामानात अचानक बदल जाणवला. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.1
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- सावळदबारा येथे अवकाळी पावसाचा थैमान; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सावळदबारा (प्रतिनिधी): परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतात उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. वाऱ्याचा वेगही जास्त असल्यामुळे झाडांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिके घेतली असताना ऐन कापणीच्या तोंडावर आलेल्या या पावसामुळे चिंता वाढली आहे. याशिवाय काही भागात वीजपुरवठा खंडित झाला असून रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.1