कवी संजय गायकवाड यांच्या काव्य संग्रहांचे आईच्या हस्ते प्रकाशन पिंपरी, प्रतिनिधी : कवी संजय एकनाथ गायकवाड यांच्या 'अंधारावर सूर्य गोंदला' आणि 'सूर्यांधकारात माणूस' द्वितीय आवृत्ती या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन गायकवाड यांच्या मातोश्री विमल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित काव्यसंग्रह प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विश्वास वसेकर, रजत प्रकाशनचे प्रकाशक अशोक कुमठेकर, नगरसेविका तृप्ती कांबळे, नगरसेविका दीप्ती कांबळे, रोहिणीताई गायकवाड, अशोक गायकवाड, राजेंद्र गायकवाड, मुखपृष्ठकार अनिल जोशी, दिलीप कुमठेकर, अभियंता विजय मानकर, चंद्रकांत चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. विश्वास वसेकर म्हणाले, की गायकवाड हे मराठीतील प्रतिथयश कवी आहेत. कवितेत अनुभवाचे संश्लेषण असते. बाकी प्रकारात अनुभवांचे विश्लेषण असते. गायकवाड यांची कविता श्रेष्ठ दर्जाची कविता आहे. ती चिरकाल टिकणारी व सामाजिक बांधिलकी जपणारी कविता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू गायकवाड यांच्यात आहेत. कवितेत आईचे मोठे स्थान आहे. आईच्या हस्ते प्रकाशन ही मोठी गोष्ट आहे. आईला कवितेचा विषय बनविणे साधी गोष्ट नाही. विमलताई म्हणाल्या, माझी मुलं हीच माझी बँक आहे. मुलं फुलासारखी जपत आहेत. मुलगा कवी झाला ही मोठी गोष्ट आहे. प्रा. श्रीकृष्ण अडसूळ म्हणाले, लेखन ही गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. संजय गायकवाड यांना जी आई भेटली ती सर्वांना भेटली पाहिजे. त्यांच्या कवितेत दुर्बोधता, क्लिष्टता कुठेही दिसत नाही. चिंतनशिलता, सूक्ष्मता दिसते. गिरणी कामगाराचा मुलगा लिहतो ही मोठी गोष्ट आहे. कवितेत व्यक्तीपूजन नाही, या अर्थाने कवी मोठा वाटतो. आईचे सामर्थ्य खूप मोठे असते. आईची विचारधारा संजय गायकवाड यांच्या काव्यात उतरले आहेत. मातृमहती हरविलेल्या जगात हे महत्वाचे आहे. संजय गायकवाड म्हणाले, की आई - वडिलांनी अंधारातून प्रकाशाकडे नेले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशाकडून प्रकाशाकडे नेले. माणसाच्या आयुष्यात अंधार आल्यावर तो उभा राहू शकत नाही. ज्ञानाच्या जोरावर अंधारावर मात करू शकतो. माझ्या ज्ञानाचे सोने पुस्तक रूपाने आईच्या चरणी ठेवले. चांगल्या गोष्टी लिहायला शिकले पाहिजे. आई वडिलांना जपा. मुखपृष्ठकार जोशी म्हणाले, कठीण परिस्थितीवर मात करून माणूस पुढे जातो, हे मुखपृष्ठातून दिसते. प्रकाशक कुमठेकर यांनी पुस्तक प्रकाशनामागची संकल्पना स्पष्ट केली. प्रास्ताविक आशिष गायकवाड यांनी केले. त्यांनी सांगितले, की कवी गायकवाड यांनी खडतर परिस्थितीवर मात करीत यशस्वी कवीपर्यंतचा प्रवास केला आहे. सूत्रसंचालन मंजिरी तिक्का यांनी, तर आभार मीनल देशपांडे यांनी मानले.

- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!1
- : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी1
- Post by अमोल भालेराव4
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by Raju Bawdiwale1
- मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.2
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1