logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रेल्वे अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू धामणगांव रेल्वे तालुक्यातील कासारखेड रेल्वे लाईन परिसरात एका ३० वर्षीय युवकाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत युवकाचे नाव विष्णू रमेश भाई वसावा (वय ३०, रा. राजतीपला, गुजरात) असे असून, तो कासारखेड येथील रेल्वे लाईन परिसरात अज्ञात कारणामुळे रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस सुद्धा तात्काळ घटनास्थळी पोहोचले यावेळी दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड व अतुल पाटील, सागर कदम ,उमेश यादव ,भाऊराव कामडी यांनी पुढील कार्यवाहीस सुरुवात केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नसून, रेल्वे पोलीस व दत्तापूर पोलीस यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे

2 hrs ago
user_Santosh Waghmare
Santosh Waghmare
T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
2 hrs ago

रेल्वे अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू धामणगांव रेल्वे तालुक्यातील कासारखेड रेल्वे लाईन परिसरात एका ३० वर्षीय युवकाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत युवकाचे नाव विष्णू रमेश भाई वसावा (वय ३०, रा. राजतीपला, गुजरात) असे असून, तो कासारखेड येथील रेल्वे लाईन परिसरात अज्ञात कारणामुळे रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस सुद्धा तात्काळ घटनास्थळी पोहोचले यावेळी दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड व अतुल पाटील, सागर कदम ,उमेश यादव ,भाऊराव कामडी यांनी पुढील कार्यवाहीस सुरुवात केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नसून, रेल्वे पोलीस व दत्तापूर पोलीस यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे

More news from Amravati and nearby areas
  • जळका पटाचे येथे गाड्या ओढण्याची अनोखी धार्मिक परंपरा भक्तिभावात संपन्न प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे धामणगांव रेल्वे तालुक्यातील जळका (पटाचे) येथे हनुमान जयंतीच्या पौर्णिमेनिमित्त दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा भव्य गाड्या ओढण्याचा धार्मिक सोहळा यंदाही भक्तिभाव व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही अनोखी परंपरा आजही गावकऱ्यांनी श्रद्धेने जपून ठेवली असून या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला गावातील आराध्य दैवत श्री लक्ष्मी माता व तेलंगा माता देवस्थान परिसरात विशेष धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. चैत्र महिन्यातील या पवित्र रात्री पारंपरिक बंडीगाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडतो. गावातीलच नव्हे तर परिसरातील तसेच दूरवर वास्तव्यास असलेले ग्रामस्थही या दिवशी खास गावात येऊन उत्सवात सहभागी होतात. या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांना कोणत्याही प्रकारचे बैल किंवा यंत्रसामग्री जोडलेली नसते. दहा ते त्यापेक्षा अधिक बंड्या एकमेकांना बांधून त्यावर मोठ्या संख्येने भाविक बसवले जातात. प्रत्येक बंडीवर सुमारे २५ ते ३० तसेच काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक भाविक बसलेले असतानाही गाड्या पुढे सरकत असल्याने हा सोहळा पाहणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार भगत श्री पंडित दामाजी कंगाले यांच्या अंगात देवीचा संचार होऊन गाड्या पुढे सरकतात, अशी मान्यता आहे. पिढ्यान्‌पिढ्या त्यांच्या कुटुंबीयांनी देवीची सेवा केल्यामुळे ही दैवी शक्ती त्यांच्या परिवाराला लाभल्याचा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ परंपरा नसून श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक मानला जातो. उत्सवानिमित्त लक्ष्मी माता व तेलंगा माता पूजन, धार्मिक विधी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर समिती व भक्तगण यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीनंतरच्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करतात, ही या परंपरेची खरी ताकद आहे. श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचे प्रतीक असलेली जळका पटाचे येथील गाड्या ओढण्याची अनोखी प्रथा आजही भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे.
    1
    जळका पटाचे येथे गाड्या ओढण्याची अनोखी धार्मिक परंपरा भक्तिभावात संपन्न
प्रतिनिधी संतोष वाघमारे 
धामणगांव रेल्वे
धामणगांव रेल्वे तालुक्यातील जळका (पटाचे) येथे हनुमान जयंतीच्या पौर्णिमेनिमित्त दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा भव्य गाड्या ओढण्याचा धार्मिक सोहळा यंदाही भक्तिभाव व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही अनोखी परंपरा आजही गावकऱ्यांनी श्रद्धेने जपून ठेवली असून या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला गावातील आराध्य दैवत श्री लक्ष्मी माता व तेलंगा माता देवस्थान परिसरात विशेष धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. चैत्र महिन्यातील या पवित्र रात्री पारंपरिक बंडीगाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडतो. गावातीलच नव्हे तर परिसरातील तसेच दूरवर वास्तव्यास असलेले ग्रामस्थही या दिवशी खास गावात येऊन उत्सवात सहभागी होतात.
या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांना कोणत्याही प्रकारचे बैल किंवा यंत्रसामग्री जोडलेली नसते. दहा ते त्यापेक्षा अधिक बंड्या एकमेकांना बांधून त्यावर मोठ्या संख्येने भाविक बसवले जातात. प्रत्येक बंडीवर सुमारे २५ ते ३० तसेच काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक भाविक बसलेले असतानाही गाड्या पुढे सरकत असल्याने हा सोहळा पाहणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरतो.
गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार भगत श्री पंडित दामाजी कंगाले यांच्या अंगात देवीचा संचार होऊन गाड्या पुढे सरकतात, अशी मान्यता आहे. पिढ्यान्‌पिढ्या त्यांच्या कुटुंबीयांनी देवीची सेवा केल्यामुळे ही दैवी शक्ती त्यांच्या परिवाराला लाभल्याचा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ परंपरा नसून श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक मानला जातो.
उत्सवानिमित्त लक्ष्मी माता व तेलंगा माता पूजन, धार्मिक विधी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर समिती व भक्तगण यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीनंतरच्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
संपूर्ण गावातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करतात, ही या परंपरेची खरी ताकद आहे. श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचे प्रतीक असलेली जळका पटाचे येथील गाड्या ओढण्याची अनोखी प्रथा आजही भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    2 hrs ago
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • स्थानिक हनुमान जयंतीनिमित्त दारव्हा शहरातील आठवडी बाजार परिसरातील जागृत हनुमान मंदिर येथे दि. १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमात विविध भक्तिगीते, भजन व सुमधुर संगीत सादर करण्यात आले. कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने वातावरण भक्तिमय केले होते. उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत होते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
    1
    स्थानिक हनुमान जयंतीनिमित्त दारव्हा शहरातील आठवडी बाजार परिसरातील जागृत हनुमान मंदिर येथे दि. १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमात विविध भक्तिगीते, भजन व सुमधुर संगीत सादर करण्यात आले. कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने वातावरण भक्तिमय केले होते. उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत होते.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलीसांनी मोठी कारवाई करीत गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडला. सिनेस्टाईल पाठलाग करून वडगांव जंगल पोलीसांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये १९ गोवंशीय जनावरांची ही सुटका करण्यात आली तर चार जनावरे मृत अवस्थेत आढळून आले. पोलीसांनी २८ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल हा जप्त केला.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलीसांनी मोठी कारवाई करीत गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडला. सिनेस्टाईल पाठलाग करून वडगांव जंगल पोलीसांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये १९ गोवंशीय जनावरांची ही सुटका करण्यात आली तर चार जनावरे मृत अवस्थेत आढळून आले. पोलीसांनी २८ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल हा जप्त केला.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    4 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    1 hr ago
  • विषारी साप चावल्याने ज्येष्ठ इसमाचा दुर्दैवी मृत्यू धामणगांव रेल्वे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर, धावणेवाडी रोड परिसरात विषारी साप चावल्याने एका ज्येष्ठ इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डोमाजी जोगे (वय ६५ वर्षे) हे आपल्या घरी झोपेत असताना विषारी सापाने चावा घेतला. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना धामणगांव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याने जोगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    विषारी साप चावल्याने ज्येष्ठ इसमाचा दुर्दैवी मृत्यू
धामणगांव रेल्वे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर, धावणेवाडी रोड परिसरात विषारी साप चावल्याने एका ज्येष्ठ इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डोमाजी जोगे (वय ६५ वर्षे) हे आपल्या घरी झोपेत असताना विषारी सापाने चावा घेतला.  प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना धामणगांव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याने जोगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.