Shuru
Apke Nagar Ki App…
*बुलडाणा::बुलढाण्यात शिवविचारांचा जागर! ऐतिहासिक पाळणा सोहळ्याने वेधले सर्वांचे लक्ष.* *बुलढाण्यात शिवविचारांचा जागर! ऐतिहासिक पाळणा सोहळ्याने वेधले सर्वांचे लक्ष.*
जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
*बुलडाणा::बुलढाण्यात शिवविचारांचा जागर! ऐतिहासिक पाळणा सोहळ्याने वेधले सर्वांचे लक्ष.* *बुलढाण्यात शिवविचारांचा जागर! ऐतिहासिक पाळणा सोहळ्याने वेधले सर्वांचे लक्ष.*
More news from महाराष्ट्र and nearby areas
- *बुलढाण्यात शिवविचारांचा जागर! ऐतिहासिक पाळणा सोहळ्याने वेधले सर्वांचे लक्ष.*1
- बुलडाणा :-महाराष्ट्राचे आराध्य दैवत, 'प्रौढ प्रताप पुरंधर' छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज बुलढाणा शहरात अत्यंत देदीप्यमान आणि ऐतिहासिक उत्साहात साजरी करण्यात आली. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले असून, सकाळपासूनच शहराच्या कानाकोपऱ्यात भगवे चैतन्य पाहायला मिळाले. प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने या सोहळ्याला विशेष भव्यता प्राप्त झाली. शहराचे मुख्य केंद्र असलेल्या संगम चौक येथे शिवजयंतीचा मुख्य सोहळा पार पडला. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या उपस्थितीत महाराजांची भव्य आरती करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात झालेल्या या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. आमदार गायकवाड यांनी यावेळी शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन करत सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय स्तरावरही या उत्सवाचा मोठा सहभाग दिसून आला. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य दुचाकी रॅलीला (Bike Rally) जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. शेकडो दुचाकीस्वार कर्मचारी भगवे फेटे बांधून या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते. शाळकरी विद्यार्थ्यांचा महाकुंभ आणि 'बाल शिवाजी'चे आकर्षण यावर्षीच्या उत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. हजारो विद्यार्थी आपल्या शालेय गणवेशात आणि पारंपरिक वेशभूषेत रॅलीमध्ये सामील झाले होते. विशेषतः 'बाल शिवाजी'च्या वेषात सज्ज झालेले लहान चिमुरडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. डोक्यावर जिरेटोप, कपाळावर चंद्रकोर आणि हातात ढाल-तलवार घेतलेले हे बाल शिवबा पाहून उपस्थितांना प्रत्यक्ष शिवकाळाची प्रचिती येत होती. केवळ रॅलीच नव्हे, तर शहरात ठिकठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चौकाचौकात लावलेले भगवे ध्वज, रांगोळ्या आणि विद्युत रोषणाईमुळे शहराचे रूप पालटून गेले होते. अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आणि शिवचरित्रावर आधारित व्याख्यानांचेही आयोजन केले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बुलढाणा पोलिसांनी चोख नियोजन केले होते. रॅलीच्या मार्गावर आणि शहराच्या संवेदनशील नाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.1
- बुलढाणा :-"वरवंडच्या महादेव संस्थानमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला!"1
- खामगाव : शहरातील चांदमारी येथील जय भवानी मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एक नवा आणि आदर्श पायंडा पाडला आहे. शिवजयंतीच्या शोभायात्रेत कानठळ्या बसवणाऱ्या डीजेचा वापर न करता, पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढल्याबद्दल खामगावचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा हार घालून विशेष सत्कार केला. सध्या सण-उत्सवांमध्ये मोठ्या आवाजाचे डीजे लावण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. मात्र, चांदमारी येथील जय भवानी मंडळाने सामाजिक भान राखत यावर्षी 'डीजे मुक्त' शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा त्रास झाला नाही आणि अत्यंत मंगलमय वातावरणात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाच्या या सकारात्मक पावलाची दखल घेत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. पोलिसांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या सत्काराची चर्चा संपूर्ण खामगाव शहरात होत आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यावर कारवाई करणारे पोलीस, जेव्हा नियमांचे पालन झाल्यावर सत्कार करतात, तेव्हा समाजात एक सकारात्मक संदेश जातो, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.2
- शालेय पोषण आहार महिला कामगाराची पंचायत समिती भोकरदन येथे बैठक संपन्न1
- Post by SamirQureash Quresh1
- ब्रेकिंग न्यूज | शेतकरी अफू प्रकरणात पोलिसांची धाडसत्र, रविकांत तुपकर आक्रमक शेतकरी अफू लागवड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खात्री प्रशासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कारवाई पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिसांकडून संशयित ठिकाणी छापे टाकून तपास वेगाने सुरू आहे. काही कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- बुलडाणा:: नाचून नव्हे, वाचून साजरी करा शिवजयंती!”; बुलढाणा शहरात भव्य पदयात्रेचा उत्साह.*1