मंठा तालुक्यात नाफेड खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची उघड लूट; संभाजी ब्रिगेड आक्रमक मंठा (जि. जालना) — मंठा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रांवर सोयाबीन, हरभरा व तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब खवणे यांनी तहसीलदार यांना सविस्तर निवेदन सादर करून तात्काळ चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित खरेदी केंद्रांवर हमाली व चाळणीच्या नावाखाली प्रति क्विंटल ₹140/- इतकी रक्कम शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसूल केली जात आहे. प्रत्यक्षात, किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत होणाऱ्या खरेदी प्रक्रियेमध्ये हमाली, चाळणी, साठवणूक यांसारखे सर्व खर्च शासनाकडून संबंधित खरेदी संस्थांना दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे अतिरिक्त रक्कम वसूल करणे हे नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, चाळणी प्रक्रियेदरम्यान खाली पडणारा शेतमाल तसेच धान्य उतरवताना होणारी गळती ही देखील केंद्राकडून अनधिकृतपणे घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत असून त्यांच्या मालकी हक्कावर अतिक्रमण होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. या सर्व प्रकारांमुळे शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या MSP चा पूर्ण लाभ मिळत नसून आर्थिक फसवणूक होत आहे. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उघड उल्लंघन होत असल्याने हा प्रकार भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यांत बसणारा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे सर्व नाफेड खरेदी केंद्रांची तात्काळ संयुक्त चौकशी करावी, शेतकऱ्यांकडून वसूल केलेली ₹140/- प्रति क्विंटल रक्कम परत करावी, चाळणीदरम्यान खाली पडणारा शेतमाल शेतकऱ्यांना परत देण्याबाबत सक्त आदेश द्यावेत, संबंधित केंद्र चालक, ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड व शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

- Post by Mohsin ahmed khan1
- दिव्यांग संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- महापालिकेत केबिन नाही, म्हणून सभापतींचा मंडपातच कारभार! जालन्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड” 3 महिने उलटले तरी सभापतींना जागा नाही; नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उघड्यावरच ‘कार्यालय’..1
- बदनापूर जिल्हा जालना ढासला येथील सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ढासला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. ज्ञान, समता आणि न्याय यांचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महामानवाच्या विचारांनी कार्यक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. गजभार व्ही. पी. यांनी अत्यंत ओघवत्या, आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी शैलीत केले. त्यांच्या नेटक्या व सुसंगत निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एकसंधता लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करत बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. तसेच, विद्यार्थ्यांनी सादर केलेले भीमगीत, गीतगायन आणि नृत्य यांमुळे कार्यक्रमात उत्साहाची रंगत वाढली व उपस्थितांची दाद मिळाली. ज्ञानाचा दीप लावून अंधःकार दूर करणारे, समानतेचा मार्ग दाखवणारे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे महामानव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजही प्रत्येक पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम स्तुत्य ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बचकूल ए. एस. होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धनाड आर. व्ही. उपस्थित होते. यावेळी श्री. भोवते एन. बी. यांनी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. व्यासपीठावर श्री. नलावडे पी. आर., श्री. शिंदे एस. एस., श्री. कदम एस. बी., श्री. गायकवाड एम. डी., श्री. कुऱ्हे एल. व्ही., श्रीमती. भोईटे एस. आर., श्रीमती. दुबे डी. वाय., श्रीमती. दराडे ए. जे. व श्री. गाडेकर एस. डी. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री. नालिंदे एम. एस. यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.3
- किन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.मदन कुटे, सरपंच सौ.अर्चना वसंत जाधव. शेख इरफान शेख लड्डू, जाफर भाई, प्राचार्य वसंत जाधव, किशोर निकाळजे, सुनील बाहेकर , पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, ज्ञानेश्वर बाहेकरयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला आदराने वंदन केले. ताहेरभाई , युनूस मेंबर, अशोक जाधव , अशोक वानखेडे,अरुण सरदार प्रदीप सरदार ,शेषराव वानखेडे , तसेच महिला , व यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.. उपस्थितानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या कार्याला आदराने वंदन केले. याप्रसंगी अनेक वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या अजोड कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान, दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, शिक्षण आणि समानतेचे त्यांचे विचार यावर सखोल विवेचन केले... मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व आणि ते आजही कसे प्रासंगिक आहेत, यावर आपले विचार मांडले. प्राचार्य वसंत जाधव यांनीआपल्या भाषणात, डॉ. आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या कार्याची महती विशद केली आणि त्यांच्या स्वप्नातील समतावादी समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची नव्याने ओळख झाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत एक लोकशाही आणि समतावादी राष्ट्र म्हणून उभा आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. किन्होळा ग्रामपंचायतीने आयोजित केलेला हा जयंती सोहळा बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहणारा आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.1
- Post by AapTak Hindi News Channel1
- Post by Mohsin ahmed khan1
- विद्रोही फाऊंडेशन व प्राण प्रतिष्ठाण च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हत्तीवरून भव्य मिरवणूक1
- बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागर यांनी केला दिलखुलास डान्स.1