Shuru
Apke Nagar Ki App…
महापालिकेत केबिन नाही, म्हणून सभापतींचा मंडपातच कारभार! जालन्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड” 3 महिने उलटले तरी सभापतींना जागा नाही; नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उघड्यावरच ‘कार्यालय’..
YUVA JALNA NEWS
महापालिकेत केबिन नाही, म्हणून सभापतींचा मंडपातच कारभार! जालन्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड” 3 महिने उलटले तरी सभापतींना जागा नाही; नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उघड्यावरच ‘कार्यालय’..
- User7096Maharashtra😂12 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन.. संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नजर; DYSP अनंत कुलकर्णी1
- बदनापूर जिल्हा जालना ढासला येथील सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ढासला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. ज्ञान, समता आणि न्याय यांचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महामानवाच्या विचारांनी कार्यक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. गजभार व्ही. पी. यांनी अत्यंत ओघवत्या, आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी शैलीत केले. त्यांच्या नेटक्या व सुसंगत निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एकसंधता लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करत बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. तसेच, विद्यार्थ्यांनी सादर केलेले भीमगीत, गीतगायन आणि नृत्य यांमुळे कार्यक्रमात उत्साहाची रंगत वाढली व उपस्थितांची दाद मिळाली. ज्ञानाचा दीप लावून अंधःकार दूर करणारे, समानतेचा मार्ग दाखवणारे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे महामानव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजही प्रत्येक पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम स्तुत्य ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बचकूल ए. एस. होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धनाड आर. व्ही. उपस्थित होते. यावेळी श्री. भोवते एन. बी. यांनी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. व्यासपीठावर श्री. नलावडे पी. आर., श्री. शिंदे एस. एस., श्री. कदम एस. बी., श्री. गायकवाड एम. डी., श्री. कुऱ्हे एल. व्ही., श्रीमती. भोईटे एस. आर., श्रीमती. दुबे डी. वाय., श्रीमती. दराडे ए. जे. व श्री. गाडेकर एस. डी. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री. नालिंदे एम. एस. यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.3
- जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे सुरू असलेले जलसमाधी आंदोलन स्थगित सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केलं होतं मागण्या मान्य; आंदोलन स्थगित दरम्यान, प्रशासनाकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर युवा शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. घनसावंगी चे तहसीलदार रमेश पागोटे व गटविकास अधिकारी प्रदीप यांच्या मार्फत संबंधित पत्र स्वीकारण्यात आले. या निर्णयानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा दिल्या. गुंज परिसरातील या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.1
- विझोरा येथे बुद्ध विहार मध्ये महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी1
- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐शुभेच्छुक: डॉक्टर संजय पगारे,सृष्टी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद1
- छत्रपती संभाजी नगर शहरातील भडकल गेट परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या ठिकाणी विविध पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.1
- सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व शांततेत संपन्न झाली आहे सिल्लोड शहर पोलीस व सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी जयंती साठी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता1
- महापालिकेत केबिन नाही, म्हणून सभापतींचा मंडपातच कारभार! जालन्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड” 3 महिने उलटले तरी सभापतींना जागा नाही; नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उघड्यावरच ‘कार्यालय’..1