logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मोरगाव जिह्वा परिषद शाळेत बालविवाह प्रतिबंध कार्यक्रम साजरा.. मोरगाव जि. प. शाळेत बालविवाह प्रतिबंध कार्यक्रम • अर्जुनी मोरगाव, १९ एप्रिल जिल्हा परिषद समग्र शिक्षा विभाग गोंदियाच्या मार्गदर्शनात अक्षय्य तृतीयेनिमित्त बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथे विविध जनजागृतिपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अक्षय्य तृतीया हा विवाहासाठी शुभ मुहूर्त मानला जात असल्याने या दिवशी बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळेत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बालविवाहाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ बाबत माहिती देऊन अशा प्रथेविरुद्ध ठाम भूमिका घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक सु. मो. भैसारे यांनी केले. यावेळी शाळेत विशेष उपक्रमांतर्गत सभा, निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात रुचिता शहारे, हिमांशी पुस्तोडे, श्रावणी लाडे यांनी बालविवाह प्रतिबंधक विषयावर निबंध लेखन तर श्रेया सूरज शहारे हिने चित्रकला स्पर्धेत प्रभावी सहभाग नोंदवून घोषवाक्ये आणि चित्रांद्वारे बालविवाहविरोधी संदेश दिला. शिक्षकांनी बालकांशी संवाद साधून अल्पवयीन मुलामुलींचे विवाह टाळण्याचे तसेच मुलींचे शिक्षण सुरू ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले. शाळेतील शिक्षक पुरुषोत्तम गहाणे यांनी जोखमीतील विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे, शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याचे आणि बालविवाहाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सोनू कऱ्हाडे, शिक्षक जितेंद्र ठवकर, वामन घरतकर, रूपाली मेश्राम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4 hrs ago
user_Ashlesh Made
Ashlesh Made
Sadak-Arjuni, Gondia•
4 hrs ago
94a63323-78a8-4582-b4d1-a155898de9e1

मोरगाव जिह्वा परिषद शाळेत बालविवाह प्रतिबंध कार्यक्रम साजरा.. मोरगाव जि. प. शाळेत बालविवाह प्रतिबंध कार्यक्रम • अर्जुनी मोरगाव, १९ एप्रिल जिल्हा परिषद समग्र शिक्षा विभाग गोंदियाच्या मार्गदर्शनात अक्षय्य तृतीयेनिमित्त बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथे विविध जनजागृतिपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अक्षय्य तृतीया हा विवाहासाठी शुभ मुहूर्त मानला जात असल्याने या दिवशी बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळेत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बालविवाहाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ बाबत माहिती देऊन अशा प्रथेविरुद्ध ठाम भूमिका घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक सु. मो. भैसारे यांनी केले. यावेळी शाळेत विशेष उपक्रमांतर्गत सभा,

6919af85-d239-4708-8ee8-d00dea0c7bd9

निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात रुचिता शहारे, हिमांशी पुस्तोडे, श्रावणी लाडे यांनी बालविवाह प्रतिबंधक विषयावर निबंध लेखन तर श्रेया सूरज शहारे हिने चित्रकला स्पर्धेत प्रभावी सहभाग नोंदवून घोषवाक्ये आणि चित्रांद्वारे बालविवाहविरोधी संदेश दिला. शिक्षकांनी बालकांशी संवाद साधून अल्पवयीन मुलामुलींचे विवाह टाळण्याचे तसेच मुलींचे शिक्षण सुरू ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले. शाळेतील शिक्षक पुरुषोत्तम गहाणे यांनी जोखमीतील विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे, शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याचे आणि बालविवाहाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सोनू कऱ्हाडे, शिक्षक जितेंद्र ठवकर, वामन घरतकर, रूपाली मेश्राम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.
    1
    डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.
    user_Satyajit Gajbhiye
    Satyajit Gajbhiye
    Toll road services साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.
    2
    हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Dinesh kambli
    3
    Post by Dinesh kambli
    user_Dinesh kambli
    Dinesh kambli
    Lakhandur, Bhandara•
    15 hrs ago
  • बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.
    1
    बकरी करते मिरचीची दंडीकट !
भिवापूर । उमरेड
सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे.
सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?
    3
    कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! 
अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… 
मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे…
नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत…
इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे…
सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे!
स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
    1
    🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात
🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च
🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश 
___________
पाटनबोरी :  शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. 
अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे.  ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. 
भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. 
जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.