दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय मूक धरणे आंदोलन केले. आंदोलनानंतर पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करत विद्यार्थ्यांवरील या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा व आपली भूमिका मांडण्याचा घटनात्मक अधिकार असून विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे आहे, अशी स्पष्ट भूमिका निवेदनात मांडण्यात आली. या निवेदनाद्वारे जंतर-मंतर येथील लाठीहल्ल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथका (एसआयटी) मार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांवर संवादातून सकारात्मक तोडगा काढावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही पत्रकारांनी व्यक्त केली. या मूक धरणे आंदोलनात वैभव स्वामी, बालाजी जगतकर, दीपक जाधव, नितेश उपाध्ये, आयेशा शेख, अनिल कचरे, पूजा निर्मळ, आकाश सावंत, महेंद्र मुदोळकर, हरिदास तावरे, महादेव सवई, दादा धनवे, शेख इमरोज शरीफ, अमीर हुसेन, कृष्णा शिंदे, संतोष राजपूत, गोकुळ इंगळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे पत्रकार, संपादक, वार्ताहर आणि प्रेस फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- बीड येथे आंदोलन करत असलेल्या अभिजीत दिपके यांच्या आंदोलनस्थळी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनाची सविस्तर माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी दिपके यांच्याशी त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली आणि हे आंदोलन पूर्णपणे शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले. आंदोलनस्थळी उपस्थित नागरिक आणि समर्थकांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन लोकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगत आंदोलकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. अभिजीत दिपके यांनी आपल्या आंदोलनामागील भूमिका व मागण्या दोन्ही नेत्यांसमोर मांडल्या. अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भेटीमुळे आंदोलनकर्त्यांचा उत्साह अधिक वाढल्याचे पाहायला मिळाले.1
- बीड येथील वॉर्ड २३ मध्ये साचलेल्या पाण्याच्या समस्येतून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या परिसरात जलभराव झाल्यानंतर नगरसेवक वाजीद कुरेशी यांनी स्वतः पुढाकार घेत परिस्थितीची सूत्रे हाती घेतली आणि काम पूर्ण करून घेतले.1
- बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने महिला बचत गट भवन येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त हा विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून पार पडलेला हा अभिवादन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला आहे.1
- दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथून चालत मुंबईच्या दिशेने निघालेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे पाटील यांच्यासह या तरुणांना धाराशिव जिल्ह्यातील आंबी पोलिसांनी जिल्हा सोडण्यापूर्वीच रोखले आणि ताब्यात घेतले. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यातील तरुणांचे समर्थन मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आवाज उठवण्यासाठी आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे तरुण मुंबईकडे निघाले होते. मात्र, हा ताफा जिल्ह्याबाहेर पडण्याआधीच आंबी पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.1
- मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील टोलनाका लोकलसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.1
- उस्मानाबाद जिल्ह्यातील भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही कामे न करताच लाखों रुपये हडपण्यात आल्याचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.1
- स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बीड नगरपालिकेच्या खा. गोपीनाथराव मुंडे सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष प्रतिनिधी मुजीब शेख, स्वच्छता सभापती शेख निजाम, बांधकाम सभापती संजय उडान आणि नियोजन सभापती बाळासाहेब गुंजाळ यांच्यासह नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन जनतेच्या सेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात आला. हा अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण आणि आदरयुक्त वातावरणात पार पडला.3
- बिहारची राजधानी पाटणा येथे काँग्रेसच्या 'सदाकत आश्रम' या मुख्यालयाबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने जोरदार हाणामारी झाली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला झालेल्या घोषणाबाजीनंतर या वादाचे रूपांतर थेट दगडफेक आणि हिंसक संघर्षात झाले. या तुफान राड्यात दगडफेक आणि लाठीचार्ज झाला असून अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील या थेट वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.1