Shuru
Apke Nagar Ki App…
उस्मानाबाद जिल्ह्यातील भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही कामे न करताच लाखों रुपये हडपण्यात आल्याचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
Vijay Meher
उस्मानाबाद जिल्ह्यातील भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही कामे न करताच लाखों रुपये हडपण्यात आल्याचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पवार कुटुंबीयांनी बारामतीतील गोजुबावी येथील अपघातस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. जिथे अजितदादांचा प्रवास अकस्मात थांबला होता, त्याच काळजाला चिरून टाकणाऱ्या ठिकाणी आज त्यांच्या आठवणींचा महापूर उसळला होता. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, युवा नेते जय पवार आणि अन्य कुटुंबीयांनी दादांच्या स्मृतींना वंदन केले. या प्रसंगी अजितदादांच्या आठवणींनी पवार कुटुंबीयांना भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.1
- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील आणि खंडोबा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले वाटंबरे गाव संपूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. पंढरपूरच्या दिशेने पायी प्रस्थान करणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, सांगली आणि कोल्हापूर अशा विविध भागांतील हजारो वारकऱ्यांचे वाटंबरे हे एक प्रमुख मुक्कामस्थान आहे. वर्षातून होणाऱ्या चारही वारीच्या वेळी या गावात मोठ्या प्रमाणावर दिंड्यांचा मुक्काम असतो. दरवर्षी वारीच्या काळात सुमारे १२० ते १३० दिंड्या गावात मुक्कामासाठी थांबत असल्याने येथे वैष्णव भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांच्या या आगमनामुळे गावातील प्रत्येक रस्ता आणि मंदिर भक्तिमय वातावरणात व्यापून गेले आहे.1
- दिल्ली येथील आंदोलकांवर आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड लाठीचार्ज तसेच अमानुष मारहाणीचा तीव्र निषेध करण्यासाठी बारामतीत जनआंदोलन छेडण्यात आले आहे. दिल्लीत आंदोलक आणि विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या या अमानुष मारहाणीच्या आणि भ्याड कारवाईच्या निषेधार्थ हा आक्रोश व्यक्त केला जात असून बारामतीत या घटनेचा जोरदार प्रतिकार आणि निषेध नोंदवला जात आहे.1
- बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने महिला बचत गट भवन येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त हा विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून पार पडलेला हा अभिवादन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला आहे.1
- लातूर येथे काँग्रेस भवनला घेराव घालून आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी गांधी चौकातच अडवले आहे. भाजपच्या या आंदोलनाला आमदार अमित देशमुख यांनी अत्यंत सडेतोड उत्तर दिले असून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र सवाल उपस्थित केले आहेत. देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, देशामध्ये एकीकडे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जात असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. दुसरीकडे सत्ताधारी विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी वेगळेच काहीतरी करू पाहत आहेत. त्यामुळे देशात आता लोकशाही फक्त नावालाच उरली आहे की काय, असा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी आजच्या आंदोलनावरून भाजपचा जोरदार समाचार घेतला.1
- सोलापूर येथे ब्रह्मर्षी सुभाष पत्रीजी यांच्या जीवनावर आधारित 'ब्रह्मर्षी सुभाष पत्रीजी' या तेलुगु भाषेतील चित्रपटाचा विशेष शो आणि ध्यान साधनेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी, ध्यानामुळे मानवी जीवन भयमुक्त, रोगमुक्त आणि चिंतामुक्त होते असे उद्गार काढले. महेश इंगळे यांनी सांगितले की, ब्रह्मर्षी सुभाष पत्रीजी यांनी मानवसेवेच्या मार्गात आलेले सर्व कटू अनुभव झुगारून देत यशाच्या शिखरापर्यंत मजल मारली. स्पिरीच्युअल पिरॅमिडिकचे कार्य आणि आत्मपरिवर्तनाचा संदेश देणारा हा चित्रपट प्रत्येकाच्या जीवनात ध्यानाचे बीज रोवणारा एक दिव्य अनुभव आहे. जगभरात २५० थिएटरमध्ये एकाच वेळी प्रदर्शित झालेला हा चित्रपट ध्यानाचे महत्त्व आणि त्याचे जीवनावरील सकारात्मक परिणाम प्रभावीपणे अधोरेखित करतो. ध्यानामुळे आरोग्य सुधारते आणि जीवनाचा आनंद निरामयपणे घेता येतो. त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा, ध्यानाला दैनंदिन जीवनात स्थान द्यावे आणि चित्रपटानंतर उपस्थितांनी ध्यानाच्या प्रसारासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला प्रथमेश मालक इंगळे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, विद्याधर गुरव सर, संतोष जवळगे, चंद्रशेखर रेड्डी, पुरणचंद्र राव, परमानंद अलगोंडा पाटील, आनंद गांगजी, नेहा मिराजगावकर, रोहित वंगारी, देवयानी नवगजे, संतोष पराणे, मनोज जगताप सर, सुनील पवार, कल्याणी गंगोंडा सर, अशोक कलशेट्टी सर, देवरमणी सर, दत्ता कटारे, रफिक पठाण, अंकुश केत, बाळासाहेब एकबोटे, डॉ. राजू मलंग, मनोज इंगोले, तुषार मोरे, स्वामीराव मुसळे, सिद्धाराम बिडवे, प्राचार्य शिवराय अडीवीतोटे सर, मेजर अमोल माने, अमर पाटील, सुनिल पवार, ओमकार उठगे साहेब, माणिक माशाळे, कुमार हत्तुरे मालक, रमेश कनमोसे मालक, श्रीकांत झिपरे, स्वामीराव मुसळे यांच्यासह महेश मालक इंगळे मित्र परिवार आणि स्विमिंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय मूक धरणे आंदोलन केले. आंदोलनानंतर पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करत विद्यार्थ्यांवरील या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा व आपली भूमिका मांडण्याचा घटनात्मक अधिकार असून विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे आहे, अशी स्पष्ट भूमिका निवेदनात मांडण्यात आली. या निवेदनाद्वारे जंतर-मंतर येथील लाठीहल्ल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथका (एसआयटी) मार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांवर संवादातून सकारात्मक तोडगा काढावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही पत्रकारांनी व्यक्त केली. या मूक धरणे आंदोलनात वैभव स्वामी, बालाजी जगतकर, दीपक जाधव, नितेश उपाध्ये, आयेशा शेख, अनिल कचरे, पूजा निर्मळ, आकाश सावंत, महेंद्र मुदोळकर, हरिदास तावरे, महादेव सवई, दादा धनवे, शेख इमरोज शरीफ, अमीर हुसेन, कृष्णा शिंदे, संतोष राजपूत, गोकुळ इंगळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे पत्रकार, संपादक, वार्ताहर आणि प्रेस फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीयांनी बारामती येथील स्मृतीस्थळी जाऊन अजितदादांना अभिवादन केले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीतील स्मृतीस्थळावर उपस्थित होते.1
- बारामतीकरांसाठी एक अतिशय आनंदाची आणि रोमांचक बातमी समोर आली आहे. शहरात इतिहास, थरार आणि मनोरंजनाचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बारामतीमध्ये प्रथमच अशा भव्य टायटॅनिक एक्झिबिशनची पर्वणी नागरिकांसाठी पाहायला मिळणार आहे.1