logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल गणेशोत्सव मंडळाच्या पाचशे ड्रेसचे प्रत्येकी सहाशे रुपये प्रमाणे टेलरला देण्यासाठी तब्बल तीन लाख रुपये मागणी केली, त्याला नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी निराळे वस्ती येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचा सदस्य नेताजी शिवाजी शिंदे यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी एकनाथ सोपान घाडगे, वय ६७ वर्ष, व्यवसाय - हॉटेल व्यवसाय, रा. मुरारजी पेठ, सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हॉटेल आहे. दि.१४/०९/२०२६ रोजी सायंकाळी ०७.४५ वा. च्या सुमारास निराळे वस्ती येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचे सदस्य नेताजी शिवाजी शिंदे याने मडळाचे नावाचे ५०० ड्रेसचे प्रत्येकी ६०० रूपये याप्रमाणे टेलरला देण्यासाठी एकूण ३,००,००० रू मागणी फिर्यादी यांना केली. त्यावर फिर्यादी यांनी त्यांची तीन लाख रूपये देण्याची आर्थीक परिस्थीती नसल्याचे सांगून दरवर्षी प्रमाणे २५,००० रू वर्गणी देतो असे सांगीतले. तसेच मी यापुर्वी मंडळाला २,००,००० रू दिले आहेत असे सांगून शिंदे याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे याने तीन लाख रूपये देण्याचा आग्रह धरत फिर्यादीच्या अंगावर येऊन शिवीगाळ केली व सदर रककम न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली, त्यामुळे फिर्यादी हे घाबरून चक्कर येऊन पडले होते. सदर बाबत माहीती मिळताच वपोनि महादेव राऊत, फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांनी तात्काळ दखल घेऊन फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत. नागरीक यांना आवाहन करण्यात येते की धार्मिक किंवा सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी -देण्याबाबत कोणी जबरदस्ती करीत असल्यास, वर्गणी पैशांसाठी धमकावत असल्यास किंवा शिवीगाळ करून त्रास देत असल्यास सदर बाबतची माहीती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी. गणेशोत्सव मंडळांनी नागरिकांकडून स्वेच्छेने दिली जाणारी वर्गणी स्वीकारून उत्सव शांततेत व सलोख्याने साजरा करावा. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा इ सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे.

1 hr ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
55aaf41b-c8b2-486a-b3b7-9aa89b866868

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले. मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.
    1
    अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले.
मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.
    1
    महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे.
महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे.
सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर.
मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026.
लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
    1
    मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका!
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.
मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
    user_Saath maharashtrachi news
    Saath maharashtrachi news
    News Anchor केज, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद
    1
    परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...
    3
    माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत सोनपेठ (दर्शन) :- मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत, आजच्या नव्या पिढिला मराठी जुणे गाणे नकोसे वाटतात तेच जुण्या पिढिला जुण्या आठवणीत घेऊन जातात.
    1
    मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत  
मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत   
सोनपेठ (दर्शन) :- 
मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत, आजच्या नव्या पिढिला मराठी जुणे गाणे नकोसे वाटतात तेच जुण्या पिढिला जुण्या आठवणीत घेऊन जातात.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मरणार पण शरण जाणार नाही! १८ दिवसांच्या उपोषणानंतर मनोजदादा जरांगे पाटील मुंबईकडे रवाना | Manoj Jarange Patil तब्बल १८ दिवसांच्या कडक आमरण उपोषणानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. प्रकृती अत्यंत खालावली असतानाही "मी मरणार पण शरण जाणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. याबद्दलची सविस्तर बातमी पाहा या व्हिडिओमध्ये. मराठा आरक्षणाचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ताज्या घडामोडींचे अचूक आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या 'साथ महाराष्ट्राची न्यूज' या चॅनलला नक्की Like, Share आणि Subscribe करा!
    1
    मरणार पण शरण जाणार नाही! १८ दिवसांच्या उपोषणानंतर मनोजदादा जरांगे पाटील मुंबईकडे रवाना | Manoj Jarange Patil
तब्बल १८ दिवसांच्या कडक आमरण उपोषणानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. प्रकृती अत्यंत खालावली असतानाही "मी मरणार पण शरण जाणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. याबद्दलची सविस्तर बातमी पाहा या व्हिडिओमध्ये.
मराठा आरक्षणाचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ताज्या घडामोडींचे अचूक आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या 'साथ महाराष्ट्राची न्यूज' या चॅनलला नक्की Like, Share आणि Subscribe करा!
    user_Saath maharashtrachi news
    Saath maharashtrachi news
    News Anchor केज, बीड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ
    1
    लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ
    user_लक्ष लातूर न्यूज
    लक्ष लातूर न्यूज
    Advertising Photographer शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.