हिंगोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा; घाबरण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता अमेरिका-इराण यांच्यात युद्ध सुरू असले तरीही जिल्ह्यात पुरेसा गँस सिलिंडरचा साठा असून, नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हावासीयांना केले आहे. जिल्ह्यातील गँस वितरणात गॅस पुरवठा स्थिती सध्या पूर्णपणे सामान्य असून नागरिकांनी घाबरून जाण्याची कोणतीही गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात एकूण १३ गॅस एजन्सी कार्यरत असून एकूण ३,७४,४७८ ग्राहकांना गॅस पुरवठा केला जात आहे. सध्या ४,४३५ घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा करताना रुग्णालये, वसतिगृहे तसेच इतर शासकीय संस्थांना प्राधान्य दिले जात आहे. तसेच गॅस प्लांटमध्ये घरगुती सिलिंडरचा सुमारे ३ दिवसांचा बफर साठा उपलब्ध आहे. वितरकांकडेही सुमारे दीड दिवसांचा गॅस साठा उपलब्ध असल्याने पुरवठा सुरळीत सुरू आहे. सध्याची परिस्थिती पूर्णपणे सामान्य असून नागरिकांनी घाबरून न जाता नियमितपणे गॅसचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

- जय मल्हार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यापेक्षा मोठे आमच्यासाठी कोणीही नाही सर्व महापुरुष हे आमच्यासाठी आमचा मान अभिमान स्वाभिमान आणि सर्व काही आहेत आणि आज बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची खाडाखोड होत असताना आम्ही शांत बसणार नाही अनेक समाज बांधव यांचे मला फोन आले आणि 16 तारखेच्या आंदोलनाला माझी भूमिका काय राहील हे विचारली त्यांना माझे मी मत सांगतोय की मी वैयक्तिक किंवा यशवंत संघर्ष सेना 16 तारखेला मुंबईला जाणार नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे एसटी आरक्षणाची लढाई लढत असताना हे जाणीवपूर्वक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो टाकत नाहीत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानामध्ये आरक्षण दिले आहे त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावायला लाज वाटते उपकार विसरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावू शकत नाहीत स्व. बी. के. कोकरे साहेब यांना विसरले आपल्याच नेत्यांना शिव्या देणे सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या बांधवाना शिव्या देणे फक्त स्वतःच्या स्टंटबाजीसाठी समाज बांधवांचा जीव धोक्यात घालून आपलाच फोटो टाकून मुंबईला चला आणि परत माघारी फिरा या भूमिकेमुळे1
- नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भानेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांचे अमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. ग्रामपंचायतमधील विविध प्रश्न व अनियमिततेबाबत सर्व पुरावे सादर करूनही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. “मी गावचा लोकप्रतिनिधी असूनही मला न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.3
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या. सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे. एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. #Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡1
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*1
- हिमायतनगर शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बांधलेल्या नालीला भगदाड पडल्याने ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने भगदाडावर मटेरियल टाकून घाईघाईत थातूरमातूर दुरुस्ती केल्याचा आरोप व्यापारी व नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या मते, नाली बांधल्यानंतर मजबुतीसाठी नियमित पाणी टाकण्याची प्रक्रिया होत नसल्याने अनेक ठिकाणी तडे गेले असून तीन-चार ठिकाणी भगदाड पडले आहे. तसेच नालीवर टाकण्यात येणारे झाकणही फक्त दोन ते अडीच इंच जाडीचे असल्याने भविष्यात पहिल्याच पावसात नाली कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #Himayatnagar #NandedNews #HighwayWork #PoorConstruction #PublicIssue #MaharashtraNews #DevelopmentWork #CitizenVoice 🚧1