शेतकरी व कामगार हितासाठी साखर विक्री (एम.एस.पी.) व उपपदार्थांचे खरेदी दर वाढवावे- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. कोपरगाव प्रतिनिधी ( राजेंद्र तासकर) :- शेतकरी आणि कामगार ही साखर उद्योग विकासाच्या रथाची दोन चाके आहेत यातील एक जरी चाक बिघडले तरी ग्रामीण अर्थकारणासह देशाच्या आर्थिक समृद्धतेला फटका बसतो, साखर उद्योगाबरोबरच शेतकरी, कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर साखर विक्रीच्या (एम. एस. पी.) किमतीत व साखरेपासून तयार होणाऱ्या उपपदार्थांचे (इथेनॉल, सीएनजी, सहवीज, पोटॅश ग्रॅन्युअल खत) खरेदी दर वाढले पाहिजे तरच आपले प्रश्न सुटतील असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारवर आपला धाक असावा आणि त्याचा कासरा आपल्याच हातात असला पाहिजे असे ही ते म्हणाले. श्रीक्षेत्र शिर्डी परिसरातील सावळीविहिर येथील साई पालखी निवारा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे राज्यस्तरीय साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन निवासी शिबिर भरवण्यात आले. त्याचा समारोप माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शनिवारी झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राउसाहेब पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अविनाश आपटे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, अशोक बिराजदार, नितीन बेनकर, दत्तात्रय निमसे, प्रदीप शिंदे, सचिव राजेंद्र तावरे, सयाजी कदम, संजय पाटील, संजय मोरे, योगेश हंबीर यांनी राज्यातील साखर कामगारांच्या हितासाठी एफ आर पी बरोबरच कामगारांचे पगाराचा समावेश व्हावा, सेवानिवृत्तीनंतर साखर कामगारांना समाधानकारक पेन्शन मिळावी आदी ठराव मांडून कामगार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकोपा साधत केंद्र व राज्य शासनावर दबाव आणून कामगार अहिताचे कायदे रद्द करावे असे आवाहन केले. विविध उद्योग व्यवसायात खाजगीकरणाचे व कंत्राटी कामगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने साखर कामगारांसह सर्वच कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे असे तात्यासाहेब काळे याप्रसंगी बोलताना म्हणाले. धनगर समाजाचे राज्य अध्यक्ष अशोक कोळेकर, मुळा कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब मोटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. खासदार भाऊसाहेब वाकचौरे या प्रसंगी बोलताना म्हणाले की, देशातील साखर कामगारांना अत्यल्प पेन्शन मिळते त्याबाबतचा प्रश्न मी संसद पटलावर सातत्याने मांडत असून तो अंतिम टप्प्यात आहे., याच बरोबर साखर कामगारांचे अन्य काही प्रश्न असतील तर त्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळासह संसदेच्या संबंधित समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी यांचे समोर साक्ष घेऊन केंद्रीय कामगार मंत्रांच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेऊ. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर याप्रसंगी बोलताना म्हणाले की, साखर कारखाना चालवताना शेतकरी, कामगार आणि साखर कारखानदारी अशा तिहेरी भूमिकेतून संचालक मंडळाला संघर्ष करावा लागत आहे, अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या माध्यमातून आम्ही साखर कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावून कामगार हिताच्या असंख्य योजना सुरू केल्या आहेत. आमदार आशुतोष काळे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, ग्रामीण आर्थिक कणा साखर कारखानदारीवर अवलंबून असून शेतकरी कष्टकरी यांना त्यांचे दाम आणि कामगारांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी माजी मंत्री स्व. शंकरराव काळे, माजी आमदार अशोकराव काळे यांच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार हे साखर कारखानदारी व कामगार हितासाठी निर्णय घेणारे प्रभावी नेतृत्व होते त्यांच्या जाण्याने या उद्योगात पोकळी निर्माण झाली आहे. याप्रसंगी मागील कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात सूचना केल्याबद्दल चंद्रकांत पवार (सोनहिरा) आझाद शेख (पंचगंगा) दत्तात्रय शेलार (सातारा) प्रमोद खलाटे (पुणे), अजय पोटबळ (अहिल्यानगर), अजय दवंगे (नाशिक) तर जवाहर कारखान्याचे सर्जेराव हळदकर यांना महाराष्ट्र शासनाचा कामगार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा व सूत्रसंचालक चंद्रशेखर कलगे यांचा सत्कार करण्यात आला. श्री.बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, १८० दिवस चालणारा साखर हंगाम आता १०० ते ७६ दिवसावर आले आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, स्पर्धा वाढत आहे, घरगुती व व्यवसायासाठी लागणाऱ्या साखरेचे दर स्वतंत्ररित्या असावे, ग्राहकाला सांभाळण्याच्या नादात सहकार व त्यावर अवलंबून असणाऱ्या साखर कारखानदारीतील घटकावर अन्याय करू नये., एकट्या साखर उद्योगातून केंद्र व राज्य शासनाला ८ कोटी रुपयांचा महसूल मिळतो आहे. शीतपेय तयार करणाऱ्या कंपन्यासाठीचा साखर दर वेगळा असावा, वर्षानुवर्षाच्या अभ्यासातून तयार झालेले कामगार कायदे एका रात्रीत बदलून कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार नाही याची काळजी केंद्र व राज्य शासनाने घ्यावी. गावची बाजारपेठ वसवणारा उद्योग म्हणून साखर धंद्याकडे बघितले जाते. शेतकरी हितासाठी तयार झालेले कायदे दुरुस्त व्हावे म्हणून ७०० शेतकऱ्यांना जीव गमववा लागला, पण साखर कामगारांनी नव्या कायद्याला कुठे विरोध केला. साखर व शेती महामंडळ कामगार चळवळीत अहिल्यानगर जिल्ह्यातील बबनराव पवार, बी. आर. पाटील, साथी किशोर पवार, अविनाश आपटे आदी कामगार नेत्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे त्यांच्या कार्याचा विसर पडू नये. केंद्र शासनाने ३१०० ऐवजी ४५०० रुपये प्रति क्विंटल साखर विक्रीचा दर करावा म्हणजे त्यातून साखर कारखानदारीला काही प्रमाणात दिलासा मिळेल., अन्यथा ग्रामीण उद्योगाचा कणा असलेला साखर उद्योग कोलमडून पडेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. साखर कामगारांचे कुटुंब हे आपलेच आहे असे समजून त्यांचे प्रश्न सोडवा. असेही ते म्हणाले. उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी आभार मानले. चंद्रशेखर कलगे यांनी सूत्रसंचालन केले. सोमेश्वर खोमणे, सचिन थोरात (अनुराग शुगर यवत), भगवान जाधव (कादवा नाशिक), उदयसिंह पाटील ,(सोलापूर ), किसनवर कारखाना, रवींद्र तांबे, (अशोक), आझाद शेख (पंचगंगा) संजय थोरात (गुरुदत्त), शशिकांत धनवटे (शाहू कागल), अविनाश पाटील (कुंभी कासारी) या साखर कामगारांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने राज्यस्तरीय तीन दिवसीय निवासी शिबिराचे नियोजन चांगले केल्याबद्दल राज्यभरातील कामगारांनी प्रतिनिधी मंडळाचे कौतुक केले. तीन दिवसीय निवासी शिबिरात राज्यस्तरीय साखर कामगारांच्या विविध प्रश्नांचा उहापोह करण्यात येऊन विविध अडचणीवरील उपाय योजना मांडण्यात आल्या. संघटनेने केलेल्या कार्याची चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. राज्यातील साखर कामगार तुटपुंज्या वेतनात काम करत आहे त्यांना शासनाच्या कर्जमाफीतून वगळणे हे बरोबर नाही त्यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात प्रभावी बाजू मांडत साखर कामगारांनाही कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी नेतृत्व केले त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या शिबिरात मांडण्यात आला.
शेतकरी व कामगार हितासाठी साखर विक्री (एम.एस.पी.) व उपपदार्थांचे खरेदी दर वाढवावे- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. कोपरगाव प्रतिनिधी ( राजेंद्र तासकर) :- शेतकरी आणि कामगार ही साखर उद्योग विकासाच्या रथाची दोन चाके आहेत यातील एक जरी चाक बिघडले तरी ग्रामीण अर्थकारणासह देशाच्या आर्थिक समृद्धतेला फटका बसतो, साखर उद्योगाबरोबरच शेतकरी, कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर साखर विक्रीच्या (एम. एस. पी.) किमतीत व साखरेपासून तयार होणाऱ्या उपपदार्थांचे (इथेनॉल, सीएनजी, सहवीज, पोटॅश ग्रॅन्युअल खत) खरेदी दर वाढले पाहिजे तरच आपले प्रश्न सुटतील असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारवर आपला धाक असावा आणि त्याचा कासरा आपल्याच हातात असला पाहिजे असे ही ते म्हणाले. श्रीक्षेत्र शिर्डी परिसरातील सावळीविहिर येथील साई पालखी निवारा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे राज्यस्तरीय साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन निवासी शिबिर भरवण्यात आले. त्याचा समारोप माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शनिवारी झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राउसाहेब पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अविनाश आपटे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, अशोक बिराजदार, नितीन बेनकर, दत्तात्रय निमसे, प्रदीप शिंदे, सचिव राजेंद्र तावरे, सयाजी कदम, संजय पाटील, संजय मोरे, योगेश हंबीर यांनी राज्यातील साखर कामगारांच्या हितासाठी एफ आर पी बरोबरच कामगारांचे पगाराचा समावेश व्हावा, सेवानिवृत्तीनंतर साखर कामगारांना समाधानकारक पेन्शन मिळावी
आदी ठराव मांडून कामगार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकोपा साधत केंद्र व राज्य शासनावर दबाव आणून कामगार अहिताचे कायदे रद्द करावे असे आवाहन केले. विविध उद्योग व्यवसायात खाजगीकरणाचे व कंत्राटी कामगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने साखर कामगारांसह सर्वच कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे असे तात्यासाहेब काळे याप्रसंगी बोलताना म्हणाले. धनगर समाजाचे राज्य अध्यक्ष अशोक कोळेकर, मुळा कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब मोटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. खासदार भाऊसाहेब वाकचौरे या प्रसंगी बोलताना म्हणाले की, देशातील साखर कामगारांना अत्यल्प पेन्शन मिळते त्याबाबतचा प्रश्न मी संसद पटलावर सातत्याने मांडत असून तो अंतिम टप्प्यात आहे., याच बरोबर साखर कामगारांचे अन्य काही प्रश्न असतील तर त्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळासह संसदेच्या संबंधित समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी यांचे समोर साक्ष घेऊन केंद्रीय कामगार मंत्रांच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेऊ. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर याप्रसंगी बोलताना म्हणाले की, साखर कारखाना चालवताना शेतकरी, कामगार आणि साखर कारखानदारी अशा तिहेरी भूमिकेतून संचालक मंडळाला संघर्ष करावा लागत आहे, अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या माध्यमातून आम्ही साखर कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावून कामगार हिताच्या असंख्य योजना सुरू केल्या आहेत. आमदार आशुतोष काळे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, ग्रामीण आर्थिक कणा साखर कारखानदारीवर अवलंबून असून शेतकरी कष्टकरी यांना त्यांचे दाम आणि कामगारांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी माजी मंत्री स्व. शंकरराव काळे, माजी आमदार अशोकराव काळे
यांच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार हे साखर कारखानदारी व कामगार हितासाठी निर्णय घेणारे प्रभावी नेतृत्व होते त्यांच्या जाण्याने या उद्योगात पोकळी निर्माण झाली आहे. याप्रसंगी मागील कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात सूचना केल्याबद्दल चंद्रकांत पवार (सोनहिरा) आझाद शेख (पंचगंगा) दत्तात्रय शेलार (सातारा) प्रमोद खलाटे (पुणे), अजय पोटबळ (अहिल्यानगर), अजय दवंगे (नाशिक) तर जवाहर कारखान्याचे सर्जेराव हळदकर यांना महाराष्ट्र शासनाचा कामगार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा व सूत्रसंचालक चंद्रशेखर कलगे यांचा सत्कार करण्यात आला. श्री.बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, १८० दिवस चालणारा साखर हंगाम आता १०० ते ७६ दिवसावर आले आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, स्पर्धा वाढत आहे, घरगुती व व्यवसायासाठी लागणाऱ्या साखरेचे दर स्वतंत्ररित्या असावे, ग्राहकाला सांभाळण्याच्या नादात सहकार व त्यावर अवलंबून असणाऱ्या साखर कारखानदारीतील घटकावर अन्याय करू नये., एकट्या साखर उद्योगातून केंद्र व राज्य शासनाला ८ कोटी रुपयांचा महसूल मिळतो आहे. शीतपेय तयार करणाऱ्या कंपन्यासाठीचा साखर दर वेगळा असावा, वर्षानुवर्षाच्या अभ्यासातून तयार झालेले कामगार कायदे एका रात्रीत बदलून कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार नाही याची काळजी केंद्र व राज्य शासनाने घ्यावी. गावची बाजारपेठ वसवणारा उद्योग म्हणून साखर धंद्याकडे बघितले जाते. शेतकरी हितासाठी तयार झालेले कायदे दुरुस्त व्हावे म्हणून ७०० शेतकऱ्यांना जीव गमववा लागला, पण साखर कामगारांनी नव्या कायद्याला कुठे विरोध केला. साखर व शेती महामंडळ कामगार चळवळीत अहिल्यानगर जिल्ह्यातील बबनराव पवार, बी. आर. पाटील,
साथी किशोर पवार, अविनाश आपटे आदी कामगार नेत्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे त्यांच्या कार्याचा विसर पडू नये. केंद्र शासनाने ३१०० ऐवजी ४५०० रुपये प्रति क्विंटल साखर विक्रीचा दर करावा म्हणजे त्यातून साखर कारखानदारीला काही प्रमाणात दिलासा मिळेल., अन्यथा ग्रामीण उद्योगाचा कणा असलेला साखर उद्योग कोलमडून पडेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. साखर कामगारांचे कुटुंब हे आपलेच आहे असे समजून त्यांचे प्रश्न सोडवा. असेही ते म्हणाले. उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी आभार मानले. चंद्रशेखर कलगे यांनी सूत्रसंचालन केले. सोमेश्वर खोमणे, सचिन थोरात (अनुराग शुगर यवत), भगवान जाधव (कादवा नाशिक), उदयसिंह पाटील ,(सोलापूर ), किसनवर कारखाना, रवींद्र तांबे, (अशोक), आझाद शेख (पंचगंगा) संजय थोरात (गुरुदत्त), शशिकांत धनवटे (शाहू कागल), अविनाश पाटील (कुंभी कासारी) या साखर कामगारांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने राज्यस्तरीय तीन दिवसीय निवासी शिबिराचे नियोजन चांगले केल्याबद्दल राज्यभरातील कामगारांनी प्रतिनिधी मंडळाचे कौतुक केले. तीन दिवसीय निवासी शिबिरात राज्यस्तरीय साखर कामगारांच्या विविध प्रश्नांचा उहापोह करण्यात येऊन विविध अडचणीवरील उपाय योजना मांडण्यात आल्या. संघटनेने केलेल्या कार्याची चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. राज्यातील साखर कामगार तुटपुंज्या वेतनात काम करत आहे त्यांना शासनाच्या कर्जमाफीतून वगळणे हे बरोबर नाही त्यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात प्रभावी बाजू मांडत साखर कामगारांनाही कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी नेतृत्व केले त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या शिबिरात मांडण्यात आला.
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे येवल्यात दिमाखात लोकार्पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी येवला शहरात उभारण्यात आलेल्या 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका'चे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. हे स्मारक केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाची प्रेरणाभूमी ठरेल, असे प्रतिपादन मंत्री भुजबळ यांनी केले. लोकार्पण सोहळ्यात बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे," हा अण्णाभाऊंचा विचार आजही दिशादर्शक आहे. अण्णाभाऊंनी आपल्या ज्वलंत शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवले. त्यांचे 'माझी मैना गावावर राहिली' हे गीत मराठी अस्मितीचे प्रतीक आहे. तसेच, ३५ हून अधिक कादंबऱ्या लिहून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या प्रसिद्ध 'फकिरा' कादंबरीचा रशियन भाषेतील अनुवाद हा मराठी साहित्याचा जागतिक सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- करंजवण धरण 90 टक्के भरले.. :- नाशिकच्या दिंडोरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळदार पावसाने करंजवण धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने धरणाने 90 टक्क्याचा टप्पा भर केला असून,धरणातून 19 हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. करंजवन धरण भरल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या मनमाड शहराचा पिण्याचा पाण्याचा मिटला. आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून करंजवण - करंजवण थेट पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याने मनमाडकर नागरिकांनी समाधान व्यक्त की. तर शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागली..1
- ट्रक चालकाने वैतागून रस्त्यावर ओतत इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला1
- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी राहुरी फॅक्टरी, प्रतिनिधी : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवळाली प्रवरा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेन देण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे, शहराध्यक्ष शरदभाऊ लोखंडे, उपशहराध्यक्ष सुनीलभाऊ रोकडे, सेक्रेटरी सागरभाऊ उल्हारे तसेच सदस्य करण लोंढे, संदीप तोडमल, प्रफुल शिंदे उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे यांच्या वतीने गरजू दोन विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश भेट देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक समता आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.1
- काळ्या बाजारातील १९ लाखांचा युरिया जप्त; दोघांना अटक...... निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात काळ्या बाजारात विक्रीसाठी आणलेला सुमारे १९ लाख रुपये किमतीचा युरिया लासलगाव पोलिसांनी आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विंचूर परिसरात युरियाचा साठा अवैधरित्या विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लासलगाव पोलीस आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान सुमारे १९ लाख रुपये किमतीचा युरिया जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या अवैध व्यवहारामागील इतर संबंधितांचा शोधही पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे कृषी निविष्ठांच्या काळ्या बाजाराला मोठा आळा बसल्याचे बोलले जात आहे.4
- वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी1
- येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- हाभामटाराहुरीफैक्ट्रीचाआहेअविनाशकोल्हेआहेआईसोबतसेक्सकरतो हाभामटाराहुरीफैक्ट्रीचाआहेअविनाशकोल्हेआहेआईसोबसेक्सकरतोयाचीआईयाचाबुलाघेतीटोडामधी1