येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे येवल्यात दिमाखात लोकार्पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी येवला शहरात उभारण्यात आलेल्या 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका'चे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. हे स्मारक केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाची प्रेरणाभूमी ठरेल, असे प्रतिपादन मंत्री भुजबळ यांनी केले. लोकार्पण सोहळ्यात बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे," हा अण्णाभाऊंचा विचार आजही दिशादर्शक आहे. अण्णाभाऊंनी आपल्या ज्वलंत शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवले. त्यांचे 'माझी मैना गावावर राहिली' हे गीत मराठी अस्मितीचे प्रतीक आहे. तसेच, ३५ हून अधिक कादंबऱ्या लिहून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या प्रसिद्ध 'फकिरा' कादंबरीचा रशियन भाषेतील अनुवाद हा मराठी साहित्याचा जागतिक सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- ट्रक चालकाने वैतागून रस्त्यावर ओतत इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला1
- Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार1
- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी राहुरी फॅक्टरी, प्रतिनिधी : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवळाली प्रवरा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेन देण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे, शहराध्यक्ष शरदभाऊ लोखंडे, उपशहराध्यक्ष सुनीलभाऊ रोकडे, सेक्रेटरी सागरभाऊ उल्हारे तसेच सदस्य करण लोंढे, संदीप तोडमल, प्रफुल शिंदे उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे यांच्या वतीने गरजू दोन विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश भेट देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक समता आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.1
- वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी1
- येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशी | प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल. ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत. हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.2
- येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- हाभामटाराहुरीफैक्ट्रीचाआहेअविनाशकोल्हेआहेआईसोबतसेक्सकरतो हाभामटाराहुरीफैक्ट्रीचाआहेअविनाशकोल्हेआहेआईसोबसेक्सकरतोयाचीआईयाचाबुलाघेतीटोडामधी1