logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विशेष, गोंदियातील सुसज्ज क्रीडा संकुलांचा लाभ घ्या; ग्रामीण खेळाडूंना आधुनिक व्यासपीठ राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विशेष... गोंदियातील सुसज्ज क्रीडा संकुलांचा लाभ घ्या; ग्रामीण खेळाडूंना आधुनिक व्यासपीठ गोंदिया, दि.27 : गोंदिया जिल्ह्यात क्रीडा संस्कृती अधिक बळकट व्हावी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली असून आज ही संकुले शेकडो खेळाडूंसाठी हक्काचे प्रशिक्षण केंद्र ठरत आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा मंडळांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे. मरारटोली, गोंदिया येथे 6 हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलेले जिल्हा क्रीडा संकुल अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. येथे इंडोअर हॉल, जलतरण तलाव, पॅव्हेलियन इमारत, मुलांचे वसतिगृह, 400 मीटर धावनपथ, क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस, हँडबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी आदी खेळांची मैदाने, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रणाली व विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असून दररोज सुमारे 500 ते 600 खेळाडू या संकुलाचा लाभ घेत आहेत. तिरोडा, सालेकसा, गोंदिया (कामठा), देवरी, गोरेगाव, आमगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यातील क्रीडा संकुलेही कार्यान्वित झाली आहेत. या संकुलांमध्ये 200 मीटर धावनपथ, मल्टिपर्पज इनडोअर बॅडमिंटन हॉल, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉलची मैदाने, कार्यालयीन इमारती, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व संरक्षण भिंत अशी पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून खेळाडू नियमित सराव करत आहेत. दुसऱ्या टप्प्यात धावनपथाचे अपग्रेडेशन, सिंथेटिक व्हॉलीबॉल कोर्ट, जिम हॉल, बॅडमिंटन हॉल व प्रसाधनगृहांचे आधुनिकीकरण, चेनलिंक फेन्सिंग, सोलर सिस्टीम, विद्युतीकरण, हायमास्ट दिवे, अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याची कामे वेगाने सुरू असून ती नियोजित कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे तिरोडा येथे आर्चरी व कराटे, तर सालेकसा येथे कबड्डी व खो-खो या खेळांचे नियमित प्रशिक्षण सुरू आहे. अर्जुनी मोरगाव येथील तालुका क्रीडा संकुलात मल्टिपर्पज गेम हॉल, 200 मीटर धावनपथ, संरक्षण भिंत तसेच कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व बास्केटबॉल कोर्टची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र संबंधित जागेबाबत उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने पुढील विकासकामे सध्या स्थगित आहेत. सर्व क्रीडा संकुलांमध्ये सकाळी 6.30 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत प्रशिक्षित क्रीडा मार्गदर्शकांमार्फत व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, कराटे व आर्चरीचे नियमित प्रशिक्षण दिले जात असून शेकडो मुले-मुली त्यात सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून गोंदिया जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी दिली. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व नागरिकांनी क्रीडा संकुलांना भेट देऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा आणि "क्रीडा हीच जीवनशैली" हा संदेश समाजात रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

54 min ago
user_Rekhalal Rahangdale
Rekhalal Rahangdale
Journalist तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
54 min ago
948507df-a368-40bf-af2a-fc111622d6b2

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विशेष, गोंदियातील सुसज्ज क्रीडा संकुलांचा लाभ घ्या; ग्रामीण खेळाडूंना आधुनिक व्यासपीठ राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विशेष... गोंदियातील सुसज्ज क्रीडा संकुलांचा लाभ घ्या; ग्रामीण खेळाडूंना आधुनिक व्यासपीठ गोंदिया, दि.27 : गोंदिया जिल्ह्यात क्रीडा संस्कृती अधिक बळकट व्हावी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली असून आज ही संकुले शेकडो खेळाडूंसाठी हक्काचे प्रशिक्षण केंद्र ठरत आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा मंडळांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे. मरारटोली, गोंदिया येथे 6 हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलेले जिल्हा क्रीडा संकुल अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. येथे इंडोअर हॉल, जलतरण तलाव, पॅव्हेलियन इमारत, मुलांचे वसतिगृह, 400 मीटर धावनपथ, क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस, हँडबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी आदी खेळांची मैदाने, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रणाली व विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असून दररोज सुमारे 500 ते 600 खेळाडू या संकुलाचा लाभ घेत आहेत. तिरोडा, सालेकसा, गोंदिया (कामठा), देवरी, गोरेगाव, आमगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यातील क्रीडा संकुलेही कार्यान्वित झाली आहेत. या संकुलांमध्ये 200 मीटर धावनपथ, मल्टिपर्पज इनडोअर बॅडमिंटन हॉल, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉलची मैदाने, कार्यालयीन इमारती, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व संरक्षण भिंत अशी पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून खेळाडू नियमित सराव करत आहेत. दुसऱ्या टप्प्यात धावनपथाचे अपग्रेडेशन, सिंथेटिक व्हॉलीबॉल कोर्ट, जिम हॉल, बॅडमिंटन हॉल व प्रसाधनगृहांचे आधुनिकीकरण, चेनलिंक फेन्सिंग, सोलर सिस्टीम, विद्युतीकरण, हायमास्ट दिवे, अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याची कामे वेगाने सुरू असून ती नियोजित कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे तिरोडा येथे आर्चरी व कराटे, तर सालेकसा येथे कबड्डी व खो-खो या खेळांचे नियमित प्रशिक्षण सुरू आहे. अर्जुनी मोरगाव येथील तालुका क्रीडा संकुलात मल्टिपर्पज गेम हॉल, 200 मीटर धावनपथ, संरक्षण भिंत तसेच कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व बास्केटबॉल कोर्टची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र संबंधित जागेबाबत उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने पुढील विकासकामे सध्या स्थगित आहेत. सर्व क्रीडा संकुलांमध्ये सकाळी 6.30 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत प्रशिक्षित क्रीडा मार्गदर्शकांमार्फत व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, कराटे व आर्चरीचे नियमित प्रशिक्षण दिले जात असून शेकडो मुले-मुली त्यात सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून गोंदिया जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी दिली. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व नागरिकांनी क्रीडा संकुलांना भेट देऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा आणि "क्रीडा हीच जीवनशैली" हा संदेश समाजात रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्थानीय लोगों के अनुसार यह स्थान गांव का महत्वपूर्ण टी-पॉइंट है, जहां छोटे-बड़े सामाजिक कार्यक्रम आयोजित होते हैं तथा वाहनों की आवाजाही और पार्किंग के लिए भी इसका उपयोग किया जाता है। ग्रामवासियों का कहना है कि ग्राम पंचायत प्रशासन को इस निर्माण कार्य की जानकारी होने के बावजूद कार्य रोकने के लिए तत्काल कार्रवाई नहीं की जा रही है। अब ग्रामीणों ने प्रशासन से जमीन की मोजणी, निर्माण की अनुमति की जांच और यदि अतिक्रमण पाया जाए तो अनधिकृत निर्माण हटाने की मांग की है। इन आरोपों की स्वतंत्र रूप से प्रशासनिक
    1
    स्थानीय लोगों के अनुसार यह स्थान गांव का महत्वपूर्ण टी-पॉइंट है, जहां छोटे-बड़े सामाजिक कार्यक्रम आयोजित होते हैं तथा वाहनों की आवाजाही और पार्किंग के लिए भी इसका उपयोग किया जाता है।
ग्रामवासियों का कहना है कि ग्राम पंचायत प्रशासन को इस निर्माण कार्य की जानकारी होने के बावजूद कार्य रोकने के लिए तत्काल कार्रवाई नहीं की जा रही है। अब ग्रामीणों ने प्रशासन से जमीन की मोजणी, निर्माण की अनुमति की जांच और यदि अतिक्रमण पाया जाए तो अनधिकृत निर्माण हटाने की मांग की है।
इन आरोपों की स्वतंत्र रूप से प्रशासनिक
    user_Town news
    Town news
    Media company गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कोसमटोला येथे विकासाची वानवा: रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ त्रस्त नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या कोसमटोला येथील नागरिकांची बिकट परिस्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप कोसमटोला (स्थानिक वृत्त): ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक २ मधील कोसमटोला गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे चालढकल धोरण यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांचा संताप: गावातील नागरिक धनराज सिताराम बोपचे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी चौरागडे पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून एक लाखाचा निधी देऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे." गावात सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने पाणी रस्त्यावर साचते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची कमतरता किंवा इतर कारणांमुळे यावर कोणताही ठोस उपाय काढण्यात आलेला नाही. माजी सरपंचांची प्रतिक्रिया: या संदर्भात बोलताना कोसमटोलाचे माजी सरपंच सुनील चंद्रकुमार खोब्रागडे यांनी सांगितले की, "२०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या आणि आमचा कार्यकाळ संपला. आमच्या काळात एमआरजीएस (MRGS) अंतर्गत खडीकरण व सिमेंट रस्त्यांची अनेक कामे मंजूर झाली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून एमआरजीएसच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे आणि मस्टर न निघाल्यामुळे गावातील सर्व रस्त्यांची कामे आणि पर्यायाने गावाचा विकास पूर्णपणे थांबला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, दलित वस्तीसह इतर भागांमधील रस्ते अत्यंत खराब असून, चिखल, खड्डे आणि दूषित वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी चिखलातून वाट काढत येणे, गाड्या-घोड्या आणणे आणि गर्भवती महिला किंवा लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे अत्यंतिक कठीण झाले आहे. अनेकदा मुख्य रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर वाहने उभी करून चिखलातून चालत घरी जावे लागते. ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती: कोसमटोला येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तीव्र शब्दांत आवाहन केले आहे की, गावातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था लवकरात लवकर लक्षात घेऊन, तसेच रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि गावकऱ्यांना या नरकयातनेतून मुक्त करावे.
    1
    कोसमटोला येथे विकासाची वानवा: रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ त्रस्त
नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे
ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या कोसमटोला येथील नागरिकांची बिकट परिस्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
कोसमटोला (स्थानिक वृत्त): ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक २ मधील कोसमटोला गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे चालढकल धोरण यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांचा संताप:
गावातील नागरिक धनराज सिताराम बोपचे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी चौरागडे पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून एक लाखाचा निधी देऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे."
गावात सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने पाणी रस्त्यावर साचते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची कमतरता किंवा इतर कारणांमुळे यावर कोणताही ठोस उपाय काढण्यात आलेला नाही.
माजी सरपंचांची प्रतिक्रिया:
या संदर्भात बोलताना कोसमटोलाचे माजी सरपंच सुनील चंद्रकुमार खोब्रागडे यांनी सांगितले की, "२०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या आणि आमचा कार्यकाळ संपला. आमच्या काळात एमआरजीएस (MRGS) अंतर्गत खडीकरण व सिमेंट रस्त्यांची अनेक कामे मंजूर झाली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून एमआरजीएसच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे आणि मस्टर न निघाल्यामुळे गावातील सर्व रस्त्यांची कामे आणि पर्यायाने गावाचा विकास पूर्णपणे थांबला आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, दलित वस्तीसह इतर भागांमधील रस्ते अत्यंत खराब असून, चिखल, खड्डे आणि दूषित वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी चिखलातून वाट काढत येणे, गाड्या-घोड्या आणणे आणि गर्भवती महिला किंवा लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे अत्यंतिक कठीण झाले आहे. अनेकदा मुख्य रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर वाहने उभी करून चिखलातून चालत घरी जावे लागते.
ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती:
कोसमटोला येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तीव्र शब्दांत आवाहन केले आहे की, गावातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था लवकरात लवकर लक्षात घेऊन, तसेच रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि गावकऱ्यांना या नरकयातनेतून मुक्त करावे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • *गोंदिया - व्हॉइस ऑफ मीडिया अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी गठीत,बिंबिसार शहारे अध्यक्षपदी,पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार *गोंदिया - व्हॉइस ऑफ मीडिया अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी गठीत,बिंबिसार शहारे अध्यक्षपदी,पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार* गोंदिया - पत्रकारांच्या हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी नव्याने गठीत करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.बिंबिसार शहारे यांची तालुका अध्यक्षपदी,गुणाजी शहारे उपाध्यक्षपदी,सुरेश जीभकाटे सचिवपदी,प्रशांत ऊके कोषाध्यक्षपदी,स्वप्नील ऊके मीडिया प्रमुखपदी तर चेतन समरीत यांची संघटकपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष रामलाल शहारे,जिल्हा सचिव अरुण बन्नाटे,जिल्हा उपाध्यक्ष सूर्यभान ठलाल व जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिगंबर नंदेश्वर उपस्थित होते.तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या,सुरक्षा, शासकीय सुविधा व न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच पत्रकारांमध्ये एकोपा वाढवून सक्षम,निर्भीड व जबाबदार पत्रकारितेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
    4
    *गोंदिया - व्हॉइस ऑफ मीडिया अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी गठीत,बिंबिसार शहारे अध्यक्षपदी,पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार
*गोंदिया - व्हॉइस ऑफ मीडिया अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी गठीत,बिंबिसार शहारे अध्यक्षपदी,पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार*
गोंदिया - पत्रकारांच्या हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी नव्याने गठीत करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.बिंबिसार शहारे यांची तालुका अध्यक्षपदी,गुणाजी शहारे उपाध्यक्षपदी,सुरेश जीभकाटे सचिवपदी,प्रशांत ऊके कोषाध्यक्षपदी,स्वप्नील ऊके मीडिया प्रमुखपदी तर चेतन समरीत यांची संघटकपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष रामलाल शहारे,जिल्हा सचिव अरुण बन्नाटे,जिल्हा उपाध्यक्ष सूर्यभान ठलाल व जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिगंबर नंदेश्वर उपस्थित होते.तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या,सुरक्षा, शासकीय सुविधा व न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच पत्रकारांमध्ये एकोपा वाढवून सक्षम,निर्भीड व जबाबदार पत्रकारितेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
    user_CHETAN SAMRIT
    CHETAN SAMRIT
    Social worker अर्जुनी मोरगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • १५ दिवसांत रस्ता गायब! 😱 कुही नगरपंचायतीत टक्केवारीचा नंगानाच! इंजिनीअर-कंत्राटदाराची जनतेच्या पैशांवर दरोडेखोरी! कुही नगरपंचायतीचा निर्लज्ज भ्रष्टाचार: १५ दिवसांतच वाहून गेला सिमेंट रस्ता; अभियंता आणि कंत्राटदाराच्या टक्केवारीच्या हव्यासापोटी विकासाची स्मशानभूमी! ​वार्ड क्र. १६ मध्ये निकृष्ट दर्जाचा कळस; सिमेंटच्या नावाखाली उधळली केवळ धूळ आणि माती; कुहीकरांचा संयम सुटला, आंदोलनाचा ज्वालामुखी पेटणार! ​कुही (धडक तपासणी वृत्त): कुही नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा संतापजनक पुरावा वार्ड क्रमांक १६ मध्ये समोर आला आहे. 'नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना २०२५-२०२६' अंतर्गत लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट रस्ता अवघ्या १५ दिवसांत अक्षरशः भुईसपाट झाला आहे. सिमेंटचा थातुरमातूर थर निघून रस्त्यावरील गिट्टी आणि रेती हवेत उडून गेली असून, रस्त्याचे रूपांतर जीवघेण्या खडीच्या ढिगाऱ्यात झाले आहे. हा रस्ता जनतेच्या सोयीसाठी बांधला की कंत्राटदार आणि टक्केखाऊ अभियंत्यांची तिजोरी भरण्यासाठी? असा संतप्त सवाल संपूर्ण कुही शहर विचारत आहे. ​१५ दिवसांत रस्त्याची चाळण — सिमेंट गेले कुठे? लाखो रुपयांचा शासकीय निधी लाटून कंत्राटदाराने रस्त्यावर केवळ 'सिमेंटचे पाणी' शिंपडल्यासारखे काम केले. अवघ्या पंधरवड्यात गिट्टी-रेती उखडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार येथे दररोज घसरून रक्तबंबाळ होत आहेत. हा केवळ निकृष्ट दर्जाचा रस्ता नसून नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला उघड खेळ आहे. ​चिरीमिरीच्या तुकड्यांवर अभियंते लाचार? कामाच्या दर्जावर पाळत ठेवण्याची जबाबदारी असलेले नगरपंचायतीचे इंजिनीअर डोळ्यांवर टक्केवारीची पट्टी बांधून गप्प बसले आहेत का? नियमांची पायमल्ली करून बोगस कामाचे मोजमाप (Measurement) अंतिम कसे केले जाते? ​कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या चिरीमिरीसाठी सार्वजनिक निधीवर दरोडा घालण्याची खुली सूट दिली गेली आहे. ​कामाच्या ठिकाणी निकृष्ट साहित्याचा वापर होत असताना इंजिनीअर नेमके कोणाची 'सेवा' करण्यात मग्न होते? ​कुही शहर झाले 'खड्डेमय नरक' केवळ वार्ड १६ च नव्हे, तर संपूर्ण कुही शहरात गेल्या १ ते २ वर्षांत तयार केलेल्या जवळपास सर्वच सिमेंट रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. १५ ते २० वर्षे टिकण्याचा दावा असलेले रस्ते पहिल्याच वर्षी खड्ड्यांत गडप झाले आहेत. कुही नगरपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली केवळ 'टक्केवारीची लूट' सुरू असल्याचा हा थेट पुरावा आहे. ​नागरिकांचे खडे बोल आणि थेट मागण्या: ​कंत्राटदारावर फसवणुकीचा गुन्हा: जनतेच्या पैशांची चोरी करणाऱ्या कंत्राटदाराला तत्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. ​भ्रष्ट अभियंत्यावर निलंबनाची कारवाई: कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या आणि लाचखोरीत मग्न असणाऱ्या संबंधित अभियंत्याची त्वरित खातेनिहाय चौकशी करून निलंबन करा. ​थर्ड पार्टी ऑडिट व पुनर्बांधणी: कामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) व स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी व्हावी आणि कंत्राटदाराच्या स्वखर्चाने रस्त्याचे दर्जेदार फेरकाम व्हावे. ​देयके तत्काळ गोठवा: या कामाचे तसेच मागील सर्व बोगस रस्त्यांचे पेमेंट त्वरित थांबवण्यात यावे. ​थेट इशारा: जर पुढील ४८ तासांत नगरपंचायत प्रशासनाने या बोगस रस्त्याची दखल घेऊन दोषींवर कारवाई केली नाही, तर संतप्त वार्डवासीय नगरपंचायत कार्यालयाला टाळे ठोकतील आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासतील! ​PTN न्यूज करिता संजय अतकरी मुख्य ट्रेंडिंग हॅशटॅग्ज: #कुही_नगरपंचायत_घोटाळा #१५_दिवसांत_रस्ता_गायब #कुही_भ्रष्टाचार_पर्दाफाश #टक्केवारीचा_नंगानाच #PTNNews #SanjayAtkari ​आक्रमक व मोहीम हॅशटॅग्ज: #दरोडेखोर_कंत्राटदार_इंजिनीअर #कुही_रस्ता_घोटाळा #वार्ड१६_दलितेतर_वस्ती_सुधार #रस्ता_नाही_तर_टॅक्स_नाही #चिरीमिरी_बंद_करा #भ्रष्ट_अधिकाऱ्यांना_निलंबित_करा #कुही_नागरिक_आक्रोश ​इंग्रजी व व्हायरल हॅशटॅग्ज: #KuhiScamExposed #RoadCorruptionKuhi #KuhiNagarPanchayat #StopCorruption #BadRoadsMaharashtra #PTNNewsLive #InvestigateKuhiWorks
    1
    १५ दिवसांत रस्ता गायब! 😱 कुही नगरपंचायतीत टक्केवारीचा नंगानाच! इंजिनीअर-कंत्राटदाराची जनतेच्या पैशांवर दरोडेखोरी! 


कुही नगरपंचायतीचा निर्लज्ज भ्रष्टाचार: १५ दिवसांतच वाहून गेला सिमेंट रस्ता; अभियंता आणि कंत्राटदाराच्या टक्केवारीच्या हव्यासापोटी विकासाची स्मशानभूमी!
​वार्ड क्र. १६ मध्ये निकृष्ट दर्जाचा कळस; सिमेंटच्या नावाखाली उधळली केवळ धूळ आणि माती; कुहीकरांचा संयम सुटला, आंदोलनाचा ज्वालामुखी पेटणार!
​कुही (धडक तपासणी वृत्त):
कुही नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा संतापजनक पुरावा वार्ड क्रमांक १६ मध्ये समोर आला आहे. 'नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना २०२५-२०२६' अंतर्गत लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट रस्ता अवघ्या १५ दिवसांत अक्षरशः भुईसपाट झाला आहे. सिमेंटचा थातुरमातूर थर निघून रस्त्यावरील गिट्टी आणि रेती हवेत उडून गेली असून, रस्त्याचे रूपांतर जीवघेण्या खडीच्या ढिगाऱ्यात झाले आहे. हा रस्ता जनतेच्या सोयीसाठी बांधला की कंत्राटदार आणि टक्केखाऊ अभियंत्यांची तिजोरी भरण्यासाठी? असा संतप्त सवाल संपूर्ण कुही शहर विचारत आहे.
​१५ दिवसांत रस्त्याची चाळण — सिमेंट गेले कुठे?
लाखो रुपयांचा शासकीय निधी लाटून कंत्राटदाराने रस्त्यावर केवळ 'सिमेंटचे पाणी' शिंपडल्यासारखे काम केले. अवघ्या पंधरवड्यात गिट्टी-रेती उखडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार येथे दररोज घसरून रक्तबंबाळ होत आहेत. हा केवळ निकृष्ट दर्जाचा रस्ता नसून नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला उघड खेळ आहे.
​चिरीमिरीच्या तुकड्यांवर अभियंते लाचार?
कामाच्या दर्जावर पाळत ठेवण्याची जबाबदारी असलेले नगरपंचायतीचे इंजिनीअर डोळ्यांवर टक्केवारीची पट्टी बांधून गप्प बसले आहेत का? नियमांची पायमल्ली करून बोगस कामाचे मोजमाप (Measurement) अंतिम कसे केले जाते?
​कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या चिरीमिरीसाठी सार्वजनिक निधीवर दरोडा घालण्याची खुली सूट दिली गेली आहे.
​कामाच्या ठिकाणी निकृष्ट साहित्याचा वापर होत असताना इंजिनीअर नेमके कोणाची 'सेवा' करण्यात मग्न होते?
​कुही शहर झाले 'खड्डेमय नरक'
केवळ वार्ड १६ च नव्हे, तर संपूर्ण कुही शहरात गेल्या १ ते २ वर्षांत तयार केलेल्या जवळपास सर्वच सिमेंट रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. १५ ते २० वर्षे टिकण्याचा दावा असलेले रस्ते पहिल्याच वर्षी खड्ड्यांत गडप झाले आहेत. कुही नगरपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली केवळ 'टक्केवारीची लूट' सुरू असल्याचा हा थेट पुरावा आहे.
​नागरिकांचे खडे बोल आणि थेट मागण्या:
​कंत्राटदारावर फसवणुकीचा गुन्हा: जनतेच्या पैशांची चोरी करणाऱ्या कंत्राटदाराला तत्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा.
​भ्रष्ट अभियंत्यावर निलंबनाची कारवाई: कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या आणि लाचखोरीत मग्न असणाऱ्या संबंधित अभियंत्याची त्वरित खातेनिहाय चौकशी करून निलंबन करा.
​थर्ड पार्टी ऑडिट व पुनर्बांधणी: कामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) व स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी व्हावी आणि कंत्राटदाराच्या स्वखर्चाने रस्त्याचे दर्जेदार फेरकाम व्हावे.
​देयके तत्काळ गोठवा: या कामाचे तसेच मागील सर्व बोगस रस्त्यांचे पेमेंट त्वरित थांबवण्यात यावे.
​थेट इशारा: जर पुढील ४८ तासांत नगरपंचायत प्रशासनाने या बोगस रस्त्याची दखल घेऊन दोषींवर कारवाई केली नाही, तर संतप्त वार्डवासीय नगरपंचायत कार्यालयाला टाळे ठोकतील आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासतील!
​PTN न्यूज करिता संजय अतकरी
मुख्य ट्रेंडिंग हॅशटॅग्ज:
#कुही_नगरपंचायत_घोटाळा
#१५_दिवसांत_रस्ता_गायब
#कुही_भ्रष्टाचार_पर्दाफाश
#टक्केवारीचा_नंगानाच
#PTNNews
#SanjayAtkari
​आक्रमक व मोहीम हॅशटॅग्ज:
#दरोडेखोर_कंत्राटदार_इंजिनीअर
#कुही_रस्ता_घोटाळा
#वार्ड१६_दलितेतर_वस्ती_सुधार
#रस्ता_नाही_तर_टॅक्स_नाही
#चिरीमिरी_बंद_करा
#भ्रष्ट_अधिकाऱ्यांना_निलंबित_करा
#कुही_नागरिक_आक्रोश
​इंग्रजी व व्हायरल हॅशटॅग्ज:
#KuhiScamExposed
#RoadCorruptionKuhi
#KuhiNagarPanchayat
#StopCorruption
#BadRoadsMaharashtra
#PTNNewsLive
#InvestigateKuhiWorks
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कामठीकरांसाठी मोठी खुशखबर! थकीत मालमत्ता करावरील 50% शास्ती माफ कामठी : नगर परिषद कामठी क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये तब्बल 50 टक्के माफी देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर नगर परिषद कामठी हद्दीतील थकीत मालमत्ता करासाठी ही 50 टक्के शास्ती माफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार 31 मार्च 2025 पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत थकीत कराची रक्कम अदा केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नगर परिषद कामठीच्या अभिलेखानुसार शहरामध्ये तब्बल 18 हजार 825 मालमत्ता असून, चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची एकूण मागणी सुमारे 11 कोटी 26 लाख रुपये आहे. कर वसुली वाढविणे आणि नागरिकांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने सर्व मालमत्ताधारकांना आपली थकीत कराची रक्कम तात्काळ भरून 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. म्हणजेच कामठीकरांनो… थकीत मालमत्ता कर भरण्याची हीच योग्य संधी! 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्या आणि आपला कराचा बोजा कमी करा! कामठी : नगर परिषद कामठी क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये तब्बल 50 टक्के माफी देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर नगर परिषद कामठी हद्दीतील थकीत मालमत्ता करासाठी ही 50 टक्के शास्ती माफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार 31 मार्च 2025 पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत थकीत कराची रक्कम अदा केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नगर परिषद कामठीच्या अभिलेखानुसार शहरामध्ये तब्बल 18 हजार 825 मालमत्ता असून, चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची एकूण मागणी सुमारे 11 कोटी 26 लाख रुपये आहे. कर वसुली वाढविणे आणि नागरिकांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने सर्व मालमत्ताधारकांना आपली थकीत कराची रक्कम तात्काळ भरून 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. म्हणजेच कामठीकरांनो… थकीत मालमत्ता कर भरण्याची हीच योग्य संधी! 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्या आणि आपला कराचा बोजा कमी करा!
    1
    कामठीकरांसाठी मोठी खुशखबर! थकीत मालमत्ता करावरील 50% शास्ती माफ
कामठी : नगर परिषद कामठी क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये तब्बल 50 टक्के माफी देण्याची योजना लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर नगर परिषद कामठी हद्दीतील थकीत मालमत्ता करासाठी ही 50 टक्के शास्ती माफी योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेनुसार 31 मार्च 2025 पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत थकीत कराची रक्कम अदा केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
नगर परिषद कामठीच्या अभिलेखानुसार शहरामध्ये तब्बल 18 हजार 825 मालमत्ता असून, चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची एकूण मागणी सुमारे 11 कोटी 26 लाख रुपये आहे. कर वसुली वाढविणे आणि नागरिकांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने सर्व मालमत्ताधारकांना आपली थकीत कराची रक्कम तात्काळ भरून 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
म्हणजेच कामठीकरांनो… थकीत मालमत्ता कर भरण्याची हीच योग्य संधी! 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्या आणि आपला कराचा बोजा कमी करा!
कामठी : नगर परिषद कामठी क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये तब्बल 50 टक्के माफी देण्याची योजना लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर नगर परिषद कामठी हद्दीतील थकीत मालमत्ता करासाठी ही 50 टक्के शास्ती माफी योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेनुसार 31 मार्च 2025 पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत थकीत कराची रक्कम अदा केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
नगर परिषद कामठीच्या अभिलेखानुसार शहरामध्ये तब्बल 18 हजार 825 मालमत्ता असून, चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची एकूण मागणी सुमारे 11 कोटी 26 लाख रुपये आहे. कर वसुली वाढविणे आणि नागरिकांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने सर्व मालमत्ताधारकांना आपली थकीत कराची रक्कम तात्काळ भरून 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
म्हणजेच कामठीकरांनो… थकीत मालमत्ता कर भरण्याची हीच योग्य संधी! 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्या आणि आपला कराचा बोजा कमी करा!
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भिवापूर पोलिस स्टेशन येथे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटीची बैठक संपन्न पोलीस स्टेशन भिवापूर येथे आगामी गोकुळ अष्टमी, पोळा, तान्हा पोळा व गणेश उत्सव यांच्या पाश्वभुमीवर आज दि. 27ऑगस्ट शांतता समिती सदस्य व ज्वेलर्स दुकानदार याची ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आगामी सण उत्साहाच्या पार्श्वभुमिवर सर्व सण उत्सव हे शांततेत, सलोख्याने व कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता पार पाडावेत. गणेश मंडळांनी मंडप मिरवणुकीसाठी वेळेत परवानगी घ्यावी. डीजे चा वापर रात्री 10:00 वाजेपर्यंत करावा,कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये, असे सर्व मंडळांना सूचना देण्यात आल्या. तसेच कायदा व सुव्यवस्था व वाढत्या चोरी बाबत सध्या शहर व ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे गावात अनोळखी इसम / टोळी आढळल्यास तात्काळ पोलीस पाटील किंवा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. सर्व व्यापारी व ज्वेलर्स यांनी आपल्या दुकानातील CCTV दुरुस्त करून तीस दिवसाचा बॅकअप ठेवावा.इतर सोशल मीडियावर अफवा पसरवू नये. कोणताही वाद झाल्यास हातात कायदा घेऊ नये, तात्काळ 112 किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. सर्वांनी पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
    1
    भिवापूर पोलिस स्टेशन येथे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटीची बैठक संपन्न
पोलीस स्टेशन भिवापूर येथे आगामी गोकुळ अष्टमी, पोळा, तान्हा पोळा व गणेश उत्सव यांच्या पाश्वभुमीवर आज दि. 27ऑगस्ट शांतता समिती सदस्य व ज्वेलर्स दुकानदार याची ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आगामी सण उत्साहाच्या पार्श्वभुमिवर
सर्व सण उत्सव हे शांततेत, सलोख्याने व कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता पार पाडावेत. गणेश मंडळांनी मंडप मिरवणुकीसाठी वेळेत परवानगी घ्यावी. डीजे चा वापर रात्री 10:00 वाजेपर्यंत करावा,कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये, असे सर्व मंडळांना सूचना देण्यात आल्या.
तसेच कायदा व सुव्यवस्था व वाढत्या चोरी बाबत
सध्या शहर व ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे गावात अनोळखी इसम / टोळी आढळल्यास तात्काळ पोलीस पाटील किंवा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. सर्व व्यापारी व ज्वेलर्स यांनी आपल्या दुकानातील CCTV दुरुस्त करून तीस दिवसाचा बॅकअप ठेवावा.इतर 
सोशल मीडियावर अफवा पसरवू नये. कोणताही वाद झाल्यास हातात कायदा घेऊ नये, तात्काळ 112 किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. सर्वांनी पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी  करण्यात आले.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    45 min ago
  • श्री कसौधन वैश्य समाजाच्या वतीने श्री बागेश्वर पुजा कार्यक्रम संपन्न श्री भिमादेवी सभागृहात श्री बागेश्वर पुजा महोत्सव साजरा भिवापूर ( shuru ॲप ) श्री कसौंधन वैश्य समाज भिवापुर, उमरेड, पवनी, भुयार की ओर से भिमादेवी सभागृह में श्री बागेश्वर पूजा महोत्सव एवं विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए गए। कार्यक्रम में श्री कसौंधन वैश्य समाज के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बंशीलाल गुप्ता, राष्ट्रीय आयोजन समिति सदस्य बंटी गुप्ता, गोविंद गुप्ता, प्रकाश गुप्ता, संजय गुप्ता, जितेंद्र गुप्ता सहित समाज के पदाधिकारी उपस्थित थे। श्री कसौंधन वैश्य समाज नागपुर के अध्यक्ष राजेश गुप्ता सपलीक प्रमुख रूप से उपस्थित रहे। श्री भीमादेवी मंदिर के पंडित जितू पांडेय के हाथों सुबह 11 बजे श्री बागेश्वर बाबा की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा की गई। इसके बाद सुबह 11.30 बजे ज्येष्ठ शंकरलाल गुप्ता ने सपत्नीक श्री बागेश्वर भगवान की पूजा की। दोपहर में समाज के पुरुषों एवं महिलाओं की उपस्थिति में हवन एवं आरती संपन्न हुई। दोपहर 3 से 5 बजे तक विविध सांस्कृतिक कार्यक्रम हुए, जिसमें युवक-युवतियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। प्रतिवर्ष की तरह कक्षा 10वीं एवं 12वीं में प्रथम व द्वितीय श्रेणी से उत्तीर्ण विद्यार्थियों को महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बंशीलाल गुप्ता के हाथों पुरस्कार वितरित किए गए। . शाम 5 बजे सुशोभित ट्रैक्टर में श्री बागेश्वर बाबा की मूर्ति विराजित कर भीमादेवी मंदिर सभागृह से शोभायात्रा निकाली गई। यात्रा में हर-हर महादेव के जयकारे गूंजते रहे। शोभायात्रा शिवाजी ले-आउट, बस स्टैंड, कोष्टीपुरा शाला एवं सिद्धार्थ नगर होते हुए मरू धाम पहुंची। शाम 6 बजे पूजा एवं आरती के बाद श्री बागेश्वर बाबा की मूर्ति का विसर्जन किया गया। इसके बाद महाप्रसाद वितरित किया गया। महोत्सव में बड़ी संख्या में समाजबंधु एवं महिलाएं उपस्थित थीं। आयोजन की सफलता के लिए श्री कसौंधन वैश्य समाज संगठन भिवापुर के अध्यक्ष राहुल गुप्ता, उपाध्यक्ष गौरव गुप्ता, सचिव आनंद गुप्ता, सहसचिव गिरीश गुप्ता, कोषाध्यक्ष सचिन गुप्ता, राजेंद्र गुप्ता पवनी, आनंद आर. गुप्ता, मनोहर गुप्ता उमरेड, अशोक गुप्ता, दिलीप गुप्ता, प्रवीण गुप्ता, प्रमोद गुप्ता, राधेश्याम गुप्ता, मनीष गुप्ता, डॉ. बलवंत गुप्ता, डॉ. प्रदीप गुप्ता, नारायण गुप्ता, विशाल गुप्ता, अमित गुप्ता, यश गुप्ता, हेमंत गुप्ता, नितीन गुप्ता, गणेश गुप्ता, पप्पू गुप्ता, भरत गुप्ता उमरेड, शैलेश गुप्ता, किशोर गुप्ता, संतोष गुप्ता भुयार, माया गुप्ता, संदीपा गुप्ता, ममता गुप्ता, मंजूषा गुप्ता, किरण गुप्ता, रचना गुप्ता, आभा गुप्ता, डॉ. वर्षा गुप्ता, अनामिका गुप्ता, संगीता गुप्ता, दिव्या गुप्ता, खुशबू गुप्ता, साधना गुप्ता, शोभा गुप्ता, आशा गुप्ता आदि ने प्रयास किए।
    1
    श्री कसौधन वैश्य समाजाच्या वतीने श्री बागेश्वर पुजा कार्यक्रम संपन्न
श्री भिमादेवी सभागृहात श्री बागेश्वर पुजा महोत्सव साजरा
भिवापूर ( shuru ॲप )
श्री कसौंधन वैश्य समाज भिवापुर, उमरेड, पवनी, भुयार की ओर से भिमादेवी सभागृह में श्री बागेश्वर पूजा महोत्सव एवं विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए गए। कार्यक्रम में श्री कसौंधन वैश्य समाज के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बंशीलाल गुप्ता, राष्ट्रीय आयोजन समिति सदस्य बंटी गुप्ता, गोविंद गुप्ता, प्रकाश गुप्ता, संजय गुप्ता, जितेंद्र गुप्ता सहित समाज के पदाधिकारी उपस्थित थे। श्री कसौंधन वैश्य समाज नागपुर के अध्यक्ष राजेश गुप्ता सपलीक प्रमुख रूप से उपस्थित रहे।
श्री भीमादेवी मंदिर के पंडित जितू पांडेय के हाथों सुबह 11 बजे
श्री बागेश्वर बाबा की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा की गई। इसके बाद सुबह 11.30 बजे ज्येष्ठ शंकरलाल गुप्ता ने सपत्नीक श्री बागेश्वर भगवान की पूजा की। दोपहर में समाज के पुरुषों एवं महिलाओं की उपस्थिति में हवन एवं आरती संपन्न हुई।
दोपहर 3 से 5 बजे तक विविध सांस्कृतिक कार्यक्रम हुए, जिसमें युवक-युवतियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। प्रतिवर्ष की तरह कक्षा 10वीं एवं 12वीं में प्रथम व द्वितीय श्रेणी से उत्तीर्ण विद्यार्थियों को महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बंशीलाल गुप्ता के हाथों पुरस्कार वितरित किए गए।
. शाम 5 बजे सुशोभित ट्रैक्टर में श्री बागेश्वर बाबा की मूर्ति विराजित कर भीमादेवी मंदिर सभागृह से शोभायात्रा निकाली गई। यात्रा में
हर-हर महादेव के जयकारे गूंजते रहे। शोभायात्रा शिवाजी ले-आउट, बस स्टैंड, कोष्टीपुरा शाला एवं सिद्धार्थ नगर होते हुए मरू धाम पहुंची। शाम 6 बजे पूजा एवं आरती के बाद श्री बागेश्वर बाबा की मूर्ति का विसर्जन किया गया। इसके बाद महाप्रसाद वितरित किया गया।
महोत्सव में बड़ी संख्या में समाजबंधु एवं महिलाएं उपस्थित थीं। आयोजन की सफलता के लिए श्री कसौंधन वैश्य समाज संगठन भिवापुर के अध्यक्ष राहुल गुप्ता, उपाध्यक्ष गौरव गुप्ता, सचिव आनंद गुप्ता, सहसचिव गिरीश गुप्ता, कोषाध्यक्ष सचिन गुप्ता, राजेंद्र गुप्ता पवनी, आनंद आर. गुप्ता, मनोहर गुप्ता उमरेड, अशोक गुप्ता, दिलीप गुप्ता, प्रवीण गुप्ता, प्रमोद गुप्ता, राधेश्याम गुप्ता, मनीष गुप्ता, डॉ. बलवंत गुप्ता, डॉ. प्रदीप गुप्ता, नारायण गुप्ता, विशाल गुप्ता, अमित गुप्ता, यश गुप्ता, हेमंत गुप्ता, नितीन गुप्ता, गणेश गुप्ता, पप्पू गुप्ता, भरत गुप्ता उमरेड, शैलेश गुप्ता, किशोर गुप्ता, संतोष गुप्ता भुयार, माया गुप्ता, संदीपा गुप्ता, ममता गुप्ता, मंजूषा गुप्ता, किरण गुप्ता, रचना गुप्ता, आभा गुप्ता, डॉ. वर्षा गुप्ता, अनामिका गुप्ता, संगीता गुप्ता, दिव्या गुप्ता, खुशबू गुप्ता, साधना गुप्ता, शोभा गुप्ता, आशा गुप्ता आदि ने प्रयास किए।
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित
    1
    नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित
नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.