logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी पोपटशेठ गारळे यांची बिनविरोध निवड मायणी :- प्रतिनिधी कलेढोण, ता.खटाव येथील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी गारळेवाडीचे माजी सरपंच सन्माननीय श्री. पोपटशेठ शंकर गारळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कलेढोण आणि गारळेवाडी परिसरातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. नूतन उपाध्यक्षांच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोसले यांनी कामकाज पाहिले. पोपटशेठ गारळे यांचा प्रदीर्घ सामाजिक अनुभव आणि जनसंपर्क विचारात घेऊन त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ,हनुमान पॅनलचे प्रमुख संजीव हणमंतराव साळुंखे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, "हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासण्याचे काम केले आहे. पोपटशेठ गारळे यांच्यासारखा अनुभवी आणि अभ्यासू व्यक्ती उपाध्यक्षपदी लाभल्यामुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल. सहकार क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी निश्चितपणे होईल. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. या सोहळ्याप्रसंगी सन्माननीय मारुती गारळे, चेअरमन महेश पाटील, ज्येष्ठ संचालक प्रकाश शेटे, माजी उपाध्यक्ष सचिन चव्हाण, शिवाजी इंगवले, सुतार गुरुजी, विजय साखरे, लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजेंद्र लोखंडे, कुंभार सर, युवराज बुधावले, मोहन खांडेकर, श्रीमती ढोकळे, जावेद कुमठेकर यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, कलेढोण व गारळेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो ओळी - हनुमान पॅनेलच्या वतीने नूतन उपाध्यक्ष पोपट गारळे सत्कार करताना संजीव साळुंखे व अन्य मान्यवर..

3 hrs ago
user_Datta. Koli
Datta. Koli
Tour Guide खटाव, सातारा, महाराष्ट्र•
3 hrs ago
40f478f5-10c5-47c1-abdf-6cdaaef71005

हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी पोपटशेठ गारळे यांची बिनविरोध निवड मायणी :- प्रतिनिधी कलेढोण, ता.खटाव येथील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी गारळेवाडीचे माजी सरपंच सन्माननीय श्री. पोपटशेठ शंकर गारळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कलेढोण आणि गारळेवाडी परिसरातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. नूतन उपाध्यक्षांच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोसले यांनी कामकाज पाहिले. पोपटशेठ गारळे यांचा प्रदीर्घ सामाजिक अनुभव आणि जनसंपर्क विचारात घेऊन त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ,हनुमान पॅनलचे प्रमुख संजीव हणमंतराव साळुंखे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, "हणमंतराव साळुंखे विकास सेवा सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासण्याचे काम केले आहे. पोपटशेठ गारळे यांच्यासारखा अनुभवी आणि अभ्यासू व्यक्ती उपाध्यक्षपदी लाभल्यामुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल. सहकार क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी निश्चितपणे होईल. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. या सोहळ्याप्रसंगी सन्माननीय मारुती गारळे, चेअरमन महेश पाटील, ज्येष्ठ संचालक प्रकाश शेटे, माजी उपाध्यक्ष सचिन चव्हाण, शिवाजी इंगवले, सुतार गुरुजी, विजय साखरे, लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजेंद्र लोखंडे, कुंभार सर, युवराज बुधावले, मोहन खांडेकर, श्रीमती ढोकळे, जावेद कुमठेकर यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, कलेढोण व गारळेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो ओळी - हनुमान पॅनेलच्या वतीने नूतन उपाध्यक्ष पोपट गारळे सत्कार करताना संजीव साळुंखे व अन्य मान्यवर..

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड झाली आहे. पणदरे गटातून निवडून आलेल्या किरण तावरे यांच्यावर संघटन कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या जोरावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडीनंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण विकास, शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
    1
    पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड झाली आहे.
पणदरे गटातून निवडून आलेल्या किरण तावरे यांच्यावर संघटन कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या जोरावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार झाल्याची माहिती समोर येत आहे.
निवडीनंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण विकास, शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रफुल्लित केंद्रामार्फत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे प्रेरणादायी उपक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. तसेच प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांचा ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
    2
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रफुल्लित केंद्रामार्फत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे प्रेरणादायी उपक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. तसेच प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांचा ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड : -
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात,
बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर  दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.
: सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे )
#पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस
#PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात,
बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर  दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.
: सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे )
#पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस
#PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    49 min ago
  • Post by Vruttshakti Digital News
    1
    Post by Vruttshakti Digital News
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कोल्हापूर : रविराज कांबळे अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटताना दिसत आहेत. शहरातील विविध गॅस एजन्सींच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.संभाव्य गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी एजन्सींकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा जाणवणार नसून पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    1
    कोल्हापूर : रविराज कांबळे 
अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटताना दिसत आहेत. शहरातील विविध गॅस एजन्सींच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.संभाव्य गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी एजन्सींकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा जाणवणार नसून पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर विकासाबाबत संभ्रम; सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न कोल्हापूर / प्रतिनिधी  मुंबई शहराचे “फुप्फुस” मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जागेच्या विकासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला.आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करत या मोठ्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले. मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जमिनीवर विकासकामे सुरू असून या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी अधिवेशनात नमूद केले.या संदर्भात त्यांनी राज्य सरकारने नागरिकांसाठी खुली सुनावणी आयोजित करावी किंवा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या या हरित क्षेत्राचा आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई सेंट्रल पार्क विकसित करताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण होणार नसल्याचा स्पष्ट खुलासा सामंत यांनी केला. पार्कचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नागरिकांना खुला असा करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मोठे हरित क्षेत्र उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या 295 एकर जागेचा विकास कशा स्वरूपात होणार याकडे आता नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागले आहे.
    1
    मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर विकासाबाबत संभ्रम; सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न
कोल्हापूर / प्रतिनिधी 
मुंबई शहराचे “फुप्फुस” मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जागेच्या विकासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला.आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करत या मोठ्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले.
मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जमिनीवर विकासकामे सुरू असून या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी अधिवेशनात नमूद केले.या संदर्भात त्यांनी राज्य सरकारने नागरिकांसाठी खुली सुनावणी आयोजित करावी किंवा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या या हरित क्षेत्राचा आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई सेंट्रल पार्क विकसित करताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण होणार नसल्याचा स्पष्ट खुलासा सामंत यांनी केला. पार्कचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नागरिकांना खुला असा करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मोठे हरित क्षेत्र उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या 295 एकर जागेचा विकास कशा स्वरूपात होणार याकडे आता नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागले आहे.
    user_आमची मराठी.com
    आमची मराठी.com
    शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.
    1
    कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.