logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

झोपेत असलेल्या दाम्पत्यावर अॅसिड हल्ला धक्कादायक घटना येवला : तालुक्यातील देवळाणे येथील बोराडे वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने शेतकरी दाम्पत्यावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली. भाऊसाहेब बोराडे आणि त्यांची पत्नी कांता बोराडे हे घराच्या गच्चीवर झोपले असताना त्यांच्या अंगावर अॅसिड फेकण्यात आले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

2 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago
8202f929-ce24-49e7-9f5c-0568b69fa0d5

झोपेत असलेल्या दाम्पत्यावर अॅसिड हल्ला धक्कादायक घटना येवला : तालुक्यातील देवळाणे येथील बोराडे वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने शेतकरी दाम्पत्यावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली. भाऊसाहेब बोराडे आणि त्यांची पत्नी कांता बोराडे हे घराच्या गच्चीवर झोपले असताना त्यांच्या अंगावर अॅसिड फेकण्यात आले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पेट्रोल,डिझेल, सोनं खरेदी बाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आवाहन, जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती बाजारपेठेत अस्थिरता वेगाने वाढणारे भाव या सर्व पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशातील जनतेला आवाहन केले आहे.
    1
    पेट्रोल,डिझेल, सोनं खरेदी बाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आवाहन, 
जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती बाजारपेठेत अस्थिरता वेगाने वाढणारे भाव या सर्व पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशातील जनतेला आवाहन केले आहे.
    user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
    PRASIDDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    42 min ago
  • पूर्णिया में गर्लफ्रेंड घुमाने का नतीजा प्रेमी जोड़ा को साथ घूमते हुए .... लोगों ने पकड़ा फिर पुलिस के हवाले किया लड़की के पिता ने कहा दोनों का शादी होगा अब... पूर्णिया में गर्लफ्रेंड घुमाने का नतीजा प्रेमी जोड़ा को साथ घूमते हुए .... लोगों ने पकड़ा फिर पुलिस के हवाले किया लड़की के पिता ने कहा दोनों का शादी होगा अब...
    1
    पूर्णिया में गर्लफ्रेंड घुमाने का नतीजा प्रेमी जोड़ा को साथ घूमते हुए  ....
लोगों ने पकड़ा फिर पुलिस के हवाले किया लड़की के पिता ने कहा दोनों का शादी होगा अब... 
पूर्णिया में गर्लफ्रेंड घुमाने का नतीजा प्रेमी जोड़ा को साथ घूमते हुए  ....
लोगों ने पकड़ा फिर पुलिस के हवाले किया लड़की के पिता ने कहा दोनों का शादी होगा अब...
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीने तब्बल साडेपाच तास चौकशी केली. चाकणकर यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करत पुढील तपासासाठी पुन्हा हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे. या हाय-प्रोफाईल चौकशीमुळे प्रकरणातील अनेक पैलू उघड होण्याची शक्यता आहे.
    1
    नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीने तब्बल साडेपाच तास चौकशी केली. चाकणकर यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करत पुढील तपासासाठी पुन्हा हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे. या हाय-प्रोफाईल चौकशीमुळे प्रकरणातील अनेक पैलू उघड होण्याची शक्यता आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • रूपाली चाकणकर यांची नाशिक येथे खरात प्रकरणात एसआयटी तपासासाठी हजेरी
    1
    रूपाली चाकणकर यांची नाशिक येथे खरात प्रकरणात एसआयटी तपासासाठी हजेरी
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम चित्रकला सादर केली. त्यांच्या या कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम चित्रकला सादर केली. त्यांच्या या कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
    user_My Lovely School
    My Lovely School
    Teacher सिन्नर, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बोरगाव-खरुडे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून ते त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बोरगाव-खरुडे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून ते त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पालघरच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी 'एल्गार'! पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निर्मितीसाठी प्रमोद पवारांची मुंबई उच्च न्यायालयात 'लेटर पिटिशन' पालघर/ गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (TDC Bank) विभाजनाचा प्रश्न आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी ठाणे बँकेच्या बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेला आणि नोकरभरतीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात लेटर पिटिशन' (पत्राद्वारे याचिका)दाखल केली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, मात्र १२ वर्षे उलटूनही जिल्ह्याची स्वतंत्र सहकारी बँक स्थापन झालेली नाही. ७,३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा बँकेवर आजही ठाण्यातील राजकीय नेत्यांचेच वर्चस्व आहे. पालघरमधील शेतकरी आणि कष्टकरी भूमिपुत्रांचा पैसा ठाण्याच्या राजकारणासाठी वापरला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रमोद पवार यांनी केला आहे. बँकेचे कार्यक्षेत्र बदललेले असताना, नवीन मतदार यादी आणि मतदारसंघांची पुनर्रचना न करताच निवडणूक घेतली जात आहे. मालमत्ता आणि दायित्वाचे वाटप होण्यापूर्वी निवडणूक घेणे म्हणजे पालघरच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासारखे आहे. बँक विभाजनापूर्वीच घाईघाईने केली जाणारी नोकरभरती ही पालघरच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हक्कावर घाला घालणारी आहे. "विभाजन आधी - भरती नंतर" अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या मध्ये असलेल्या अधिकारांचा वापर करून बँकांचे विभाजन करणे अनिवार्य असताना सहकार विभागाने डोळे झाकून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पत्राद्वारे प्रमोद पवार यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली आहे की: १. बँकेची विद्यमान बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया तत्काळ रद्द करावी. २. सुरू असलेली संशयास्पद नोकरभरती थांबवण्यात यावी. ३. कलम ७७-अ अन्वये बँकेवर आय.ए.एस. (IAS) दर्जाच्या प्रशासकाची नियुक्ती करावी. एकीकडे मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि निबंधकांना दिलेल्या अल्टिमेटमनंतर आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्याने प्रशासन हबकले आहे. जर तातडीने विभाजनाचा निर्णय झाला नाही, तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनआंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. आता मुंबई उच्च न्यायालय या 'लेटर पिटिशन'ची दखल घेऊन पालघरला न्याय देणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, सहकारमंत्री तसेच सर्व संबंधिताना याबाबत निवेदन देण्यात आले असून ठाणे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी आज अध्यक्ष प्रमोद पवार, कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस स्वप्निल वाघ, जिल्हा संघटक महेश ठाकरे, पालघर तालुका अध्यक्ष विकास धोडी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
    1
    पालघरच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी 'एल्गार'! पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निर्मितीसाठी प्रमोद पवारांची मुंबई उच्च न्यायालयात 'लेटर पिटिशन'
पालघर/ गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (TDC Bank) विभाजनाचा प्रश्न आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी ठाणे बँकेच्या बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेला आणि नोकरभरतीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात लेटर पिटिशन' (पत्राद्वारे याचिका)दाखल केली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
१ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, मात्र १२ वर्षे उलटूनही जिल्ह्याची स्वतंत्र सहकारी बँक स्थापन झालेली नाही. ७,३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा बँकेवर आजही ठाण्यातील राजकीय नेत्यांचेच वर्चस्व आहे. पालघरमधील शेतकरी आणि कष्टकरी भूमिपुत्रांचा पैसा ठाण्याच्या राजकारणासाठी वापरला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रमोद पवार यांनी केला आहे.
बँकेचे कार्यक्षेत्र बदललेले असताना, नवीन मतदार यादी आणि मतदारसंघांची पुनर्रचना न करताच निवडणूक घेतली जात आहे. मालमत्ता आणि दायित्वाचे वाटप होण्यापूर्वी निवडणूक घेणे म्हणजे पालघरच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासारखे आहे.
बँक विभाजनापूर्वीच घाईघाईने केली जाणारी नोकरभरती ही पालघरच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हक्कावर घाला घालणारी आहे. "विभाजन आधी - भरती नंतर" अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या मध्ये असलेल्या अधिकारांचा वापर करून बँकांचे विभाजन करणे अनिवार्य असताना सहकार विभागाने डोळे झाकून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पत्राद्वारे प्रमोद पवार यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली आहे की:
१. बँकेची विद्यमान बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया तत्काळ रद्द करावी.
२. सुरू असलेली संशयास्पद नोकरभरती थांबवण्यात यावी.
३. कलम ७७-अ अन्वये बँकेवर आय.ए.एस. (IAS) दर्जाच्या प्रशासकाची नियुक्ती करावी.
एकीकडे मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि निबंधकांना दिलेल्या अल्टिमेटमनंतर आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्याने प्रशासन हबकले आहे. जर तातडीने विभाजनाचा निर्णय झाला नाही, तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनआंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. आता मुंबई उच्च न्यायालय या 'लेटर पिटिशन'ची दखल घेऊन पालघरला न्याय देणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, सहकारमंत्री तसेच सर्व संबंधिताना याबाबत निवेदन देण्यात आले असून ठाणे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी आज अध्यक्ष प्रमोद पवार, कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस स्वप्निल वाघ, जिल्हा संघटक महेश ठाकरे, पालघर तालुका अध्यक्ष विकास धोडी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हाथीदहजवळ गंगा नदीत एका महिलेने आपल्या मुला-मुलीसोबत उडी मारण्याचा प्रयत्न केला. सिक्स लेन पुलाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ती पोलिसांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी वेळेत तिला वाचवले. कौटुंबिक वादामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
    1
    हाथीदहजवळ गंगा नदीत एका महिलेने आपल्या मुला-मुलीसोबत उडी मारण्याचा प्रयत्न केला. सिक्स लेन पुलाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ती पोलिसांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी वेळेत तिला वाचवले. कौटुंबिक वादामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.