logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोशल मीडियावर पत्रकाराविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; कंधारमध्ये एसटी वाहकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे एका पत्रकाराविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कंधार डिजिटल मराठी मीडिया परिषदेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. ​संबंधित एसटी वाहकाने पत्रकाराच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी पोस्ट शेअर केल्याचा आरोप करत त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. पत्रकारांच्या सन्मानावर आणि अस्मितेवर आघात करणारे अशा प्रकारचे गैरकृत्य अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सडेतोड इशाराही यावेळी कंधारमधील पत्रकार बांधवांनी दिला आहे. पोलीस आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

10 hrs ago
user_महाराष्ट्र वृत्तवेध
महाराष्ट्र वृत्तवेध
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
10 hrs ago

सोशल मीडियावर पत्रकाराविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; कंधारमध्ये एसटी वाहकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे एका पत्रकाराविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कंधार डिजिटल मराठी मीडिया परिषदेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. ​संबंधित एसटी वाहकाने पत्रकाराच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी पोस्ट शेअर केल्याचा आरोप करत त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. पत्रकारांच्या सन्मानावर आणि अस्मितेवर आघात करणारे अशा प्रकारचे गैरकृत्य अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सडेतोड इशाराही यावेळी कंधारमधील पत्रकार बांधवांनी दिला आहे. पोलीस आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथे समाधान शिबिर; दिवंगत नेते अजितदादा पवार यांना अभिवादन लोहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त लोहा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच स्थानिक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनीही आपल्या समस्या मांडून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथे समाधान शिबिर; दिवंगत नेते अजितदादा पवार यांना अभिवादन
लोहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त लोहा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच स्थानिक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनीही आपल्या समस्या मांडून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा
    1
    भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या  79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व  निष्ठावंत कार्यकर्त्यांना  हार्दिक शुभेच्छा
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर
    1
    उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन 
उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे.  हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 
हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सोशल मीडियावर पत्रकाराविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; कंधारमध्ये एसटी वाहकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे एका पत्रकाराविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कंधार डिजिटल मराठी मीडिया परिषदेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. ​संबंधित एसटी वाहकाने पत्रकाराच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी पोस्ट शेअर केल्याचा आरोप करत त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. पत्रकारांच्या सन्मानावर आणि अस्मितेवर आघात करणारे अशा प्रकारचे गैरकृत्य अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सडेतोड इशाराही यावेळी कंधारमधील पत्रकार बांधवांनी दिला आहे. पोलीस आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
    1
    सोशल मीडियावर पत्रकाराविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; कंधारमध्ये एसटी वाहकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी


नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे एका पत्रकाराविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कंधार डिजिटल मराठी मीडिया परिषदेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.
​संबंधित एसटी वाहकाने पत्रकाराच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी पोस्ट शेअर केल्याचा आरोप करत त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. पत्रकारांच्या सन्मानावर आणि अस्मितेवर आघात करणारे अशा प्रकारचे गैरकृत्य अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा सडेतोड इशाराही यावेळी कंधारमधील पत्रकार बांधवांनी दिला आहे. पोलीस आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • उमरखेड आगाराला मोठी भेट! पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या. नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रवाशांच्या अपेक्षा काय? दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात. वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी. सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. "नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    3
    उमरखेड आगाराला मोठी भेट!

पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन

महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा
उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या.
नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रवाशांच्या अपेक्षा काय?
दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात.
वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी.
सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा
सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
"नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • किनवट तालुक्यातील कंचली गावाजवळ पुराच्या पाण्यात वाहून गेलेले ग्रामपंचायत सेवक किनवट तालुक्यातील पुरातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह अखेर सापडला किनवट तालुक्यातील कंचली गावाजवळ पुराच्या पाण्यात वाहून गेलेले ग्रामपंचायत सेवक राजू रेड्डी दांडेलु (वय ३२) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता शोध पथकाला आढळला. दोन दिवसांपासून पोलिस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू होती. सततचा पाऊस आणि नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अखेर सायंकाळी मृतदेह सापडल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 💐 भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व दुःखी कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. ⚠️ पूराच्या पाण्यातून किंवा पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून प्रवास करू नका. सुरक्षित राहा. #Kinwat #Kanchali #Flood #Rain #Nanded #Maharashtra #BreakingNews #RIP #Condolences #FloodSafety #ALMBharat #NNLMarathi
    1
    किनवट तालुक्यातील कंचली गावाजवळ पुराच्या पाण्यात वाहून गेलेले ग्रामपंचायत सेवक
किनवट तालुक्यातील पुरातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह अखेर सापडला
किनवट तालुक्यातील कंचली गावाजवळ पुराच्या पाण्यात वाहून गेलेले ग्रामपंचायत सेवक राजू रेड्डी दांडेलु (वय ३२) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता शोध पथकाला आढळला.
दोन दिवसांपासून पोलिस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू होती. सततचा पाऊस आणि नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अखेर सायंकाळी मृतदेह सापडल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व दुःखी कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
⚠️ पूराच्या पाण्यातून किंवा पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून प्रवास करू नका. सुरक्षित राहा.
#Kinwat #Kanchali #Flood #Rain #Nanded #Maharashtra #BreakingNews #RIP #Condolences #FloodSafety #ALMBharat #NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.