logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भुजबळ ब्रिगेड आयोजित ‘येवला प्रीमियर लीग - २०२६’ ला दमदार सुरुवात!* * भुजबळ ब्रिगेड आयोजित ‘येवला प्रीमियर लीग - २०२६’ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला असून पहिल्याच दिवशी एकापेक्षा एक रंगतदार आणि चुरशीचे सामने पाहायला मिळाले. खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे आणि प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे संपूर्ण मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. *सामना १: येवला टायगर्सचा थरारक विजय* पहिल्या सामन्यात येवला फायटर्सने ७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात येवला टायगर्सने ४ गडी राखून ७९ धावा करत विजय मिळवला. सामनावीर: दिशान शेख स्ट्रायकर: सोमनाथ घिगे *सामना २: येवला मास्टरचा एकतर्फी विजय* येवला मास्टर संघाने १२५/२ असा मोठा स्कोर उभारला. येवला ब्लास्टरला केवळ ३९ धावांवर रोखत मास्टर संघाने तब्बल ८६ धावांनी विजय मिळवला. सामनावीर: संजय वाबळे स्ट्रायकर: वीरेंद्र मोहारे *सामना ३: एव्हरग्रीनचा निसटता विजय* एव्हरग्रीन संघाने ७०/२ धावा केल्या. मावळा संघ ६७/८ वर थांबला आणि एव्हरग्रीनने ३ धावांनी रोमांचक विजय मिळवला. सामनावीर: सतीश गायकवाड स्ट्रायकर: स्वतेज भामबोरे *सामना ४: शिवनेरी लासलगावची बाजी* शिवनेरी लासलगावने ६८/४ धावा केल्या. सह्याद्री पाटोदा संघ ६१/४ वर थांबला आणि लासलगावने ७ धावांनी विजय मिळवला. सामनावीर: सुयश रायते स्ट्रायकर: कामिल देशमुख *सामना ५: अंदरसुलचा दमदार परफॉर्मन्स* अंदरसुल संघाने १०१/० अशी भक्कम सुरुवात करत राजापूर संघाला ५०/९ वर रोखले आणि ५१ धावांनी विजय मिळवला. सामनावीर: दीपक त्रिभुवन स्ट्रायकर: सचिन उंडे *सामना ६: मुखेडची विजयी घोडदौड* मुखेड संघाने ८०/३ धावा केल्या. नगरसुल संघ ४८/३ वर थांबला आणि मुखेडने ३२ धावांनी विजय मिळवला. सामनावीर: शेखर रंधे स्ट्रायकर: शंकर जाधव पहिल्याच दिवशी झालेल्या सहा सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रत्येक सामन्यात चुरस, थरार आणि उत्कृष्ट क्रिकेट पाहायला मिळाले. भुजबळ ब्रिगेडच्या या उपक्रमामुळे स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत असून येत्या दिवसांत आणखी रंगतदार सामने पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. येवला प्रीमियर लीग - २०२६” ही स्पर्धा पुढील काही दिवस अधिकच रंगणार असून क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन भुजबळ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

3 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago
cdfc90d4-8747-44b4-b194-f8aa9590c21d

भुजबळ ब्रिगेड आयोजित ‘येवला प्रीमियर लीग - २०२६’ ला दमदार सुरुवात!* * भुजबळ ब्रिगेड आयोजित ‘येवला प्रीमियर लीग - २०२६’ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला असून पहिल्याच दिवशी एकापेक्षा एक रंगतदार आणि चुरशीचे सामने पाहायला मिळाले. खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे आणि प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे संपूर्ण मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. *सामना १: येवला टायगर्सचा थरारक विजय* पहिल्या सामन्यात येवला फायटर्सने ७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात येवला

7e6bb3f6-f7dc-41e1-ac4e-d34a97f3f5f3

टायगर्सने ४ गडी राखून ७९ धावा करत विजय मिळवला. सामनावीर: दिशान शेख स्ट्रायकर: सोमनाथ घिगे *सामना २: येवला मास्टरचा एकतर्फी विजय* येवला मास्टर संघाने १२५/२ असा मोठा स्कोर उभारला. येवला ब्लास्टरला केवळ ३९ धावांवर रोखत मास्टर संघाने तब्बल ८६ धावांनी विजय मिळवला. सामनावीर: संजय वाबळे स्ट्रायकर: वीरेंद्र मोहारे *सामना ३: एव्हरग्रीनचा निसटता विजय* एव्हरग्रीन संघाने ७०/२ धावा केल्या. मावळा संघ ६७/८ वर थांबला आणि एव्हरग्रीनने ३ धावांनी रोमांचक विजय मिळवला. सामनावीर: सतीश गायकवाड स्ट्रायकर: स्वतेज भामबोरे *सामना ४: शिवनेरी लासलगावची बाजी* शिवनेरी

04f6ae8a-d6a6-4180-a13f-96af4071969b

लासलगावने ६८/४ धावा केल्या. सह्याद्री पाटोदा संघ ६१/४ वर थांबला आणि लासलगावने ७ धावांनी विजय मिळवला. सामनावीर: सुयश रायते स्ट्रायकर: कामिल देशमुख *सामना ५: अंदरसुलचा दमदार परफॉर्मन्स* अंदरसुल संघाने १०१/० अशी भक्कम सुरुवात करत राजापूर संघाला ५०/९ वर रोखले आणि ५१ धावांनी विजय मिळवला. सामनावीर: दीपक त्रिभुवन स्ट्रायकर: सचिन उंडे *सामना ६: मुखेडची विजयी घोडदौड* मुखेड संघाने ८०/३ धावा केल्या. नगरसुल संघ ४८/३ वर थांबला आणि मुखेडने ३२ धावांनी विजय मिळवला. सामनावीर: शेखर रंधे स्ट्रायकर: शंकर जाधव पहिल्याच दिवशी झालेल्या सहा

657817e6-22bb-49cd-9833-9df2f278ed74

सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रत्येक सामन्यात चुरस, थरार आणि उत्कृष्ट क्रिकेट पाहायला मिळाले. भुजबळ ब्रिगेडच्या या उपक्रमामुळे स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत असून येत्या दिवसांत आणखी रंगतदार सामने पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. येवला प्रीमियर लीग - २०२६” ही स्पर्धा पुढील काही दिवस अधिकच रंगणार असून क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन भुजबळ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​येवला: येथील मामलेदार गल्ली, जुने सिटी पोलीस स्टेशन जवळ असलेल्या श्री दत्त महाराज मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या मंगल सोहळ्याचे औचित्य साधून श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची शहरातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ​मिरवणुकीचा प्रारंभ जुन्या पोलीस स्टेशनपासून करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक आणि पारंपारिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विशेष आकर्षण म्हणजे, मिरवणुकीत महिलांनी सादर केलेले गर्भा नृत्य यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ​या सोहळ्यात कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे, शिवसेना गट नेते व नगरसेवक गणेश शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे नगरसेविका पारू गुजराती, राजेश भांडगे, सनी पटणी, राजू पटेल, बालूशेठ परदेशी, यती भाई गुजराती, शैलेश देसाई यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ​मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पुढील कार्यक्रम बुधवार ते शुक्रवार (दि. ३ एप्रिल) या कालावधीत पार पडणार आहेत. शुक्रवारी होम दर्शन आणि सायंकाळी ६ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    4
    ​येवला: येथील मामलेदार गल्ली, जुने सिटी पोलीस स्टेशन जवळ असलेल्या श्री दत्त महाराज मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या मंगल सोहळ्याचे औचित्य साधून श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची शहरातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
​मिरवणुकीचा प्रारंभ जुन्या पोलीस स्टेशनपासून करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक आणि पारंपारिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विशेष आकर्षण म्हणजे, मिरवणुकीत महिलांनी सादर केलेले गर्भा नृत्य यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
​या सोहळ्यात कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे, शिवसेना गट नेते व नगरसेवक गणेश शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे नगरसेविका पारू गुजराती, राजेश भांडगे, सनी पटणी, राजू पटेल, बालूशेठ परदेशी, यती भाई गुजराती, शैलेश देसाई यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
​मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पुढील कार्यक्रम बुधवार ते शुक्रवार (दि. ३ एप्रिल) या कालावधीत पार पडणार आहेत. शुक्रवारी होम दर्शन आणि सायंकाळी ६ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग
    2
    चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by सुनिलआण्णा सोनवणे
    1
    Post by सुनिलआण्णा सोनवणे
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    पत्रकार देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Anand Gangurde
    4
    Post by Anand Gangurde
    user_Anand Gangurde
    Anand Gangurde
    Nashik, Nashik•
    7 hrs ago
  • Post by Afsjcjryued
    1
    Post by Afsjcjryued
    user_Afsjcjryued
    Afsjcjryued
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे
    1
    सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner
    1
    Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    14 hrs ago
  • आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस उजाडूनही विकासकामांची बिले न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांनी आज संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांची भेट घेऊन ठेकेदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. ​सध्या राज्यातील ठेकेदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. स्वत:चे भांडवल, कर्ज आणि उसनवारी करून ठेकेदारांनी सरकारी कामे पूर्ण केली. मात्र, लेखाशीर्षक ०४ आणि ०३ अंतर्गत असलेल्या कामांना एक रुपयाही निधी प्राप्त झालेला नाही. काही कामांना अत्यंत अल्प निधी मिळाल्याने आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून बिले थकल्याने बँकांचे हप्ते व देणी कशी फेडायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. ​याप्रसंगी रमेश शेठ शिरसाट, राजेंद्र पानसरे, आर. टी. शिंदे, अमोल मोरे, दत्ताजी शेलार, भगवान चित्ते, गोविंदराव गायके यांसह अनेक ठेकेदारांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. "शासनाने तातडीने लक्ष देऊन विकासकामांना हातभार लावणाऱ्या ठेकेदारांना न्याय द्यावा," अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुपारच्या सुमारास झालेल्या या आंदोलनाने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
    1
    आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस उजाडूनही विकासकामांची बिले न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांनी आज संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांची भेट घेऊन ठेकेदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
​सध्या राज्यातील ठेकेदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. स्वत:चे भांडवल, कर्ज आणि उसनवारी करून ठेकेदारांनी सरकारी कामे पूर्ण केली. मात्र, लेखाशीर्षक ०४ आणि ०३ अंतर्गत असलेल्या कामांना एक रुपयाही निधी प्राप्त झालेला नाही. काही कामांना अत्यंत अल्प निधी मिळाल्याने आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून बिले थकल्याने बँकांचे हप्ते व देणी कशी फेडायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
​याप्रसंगी रमेश शेठ शिरसाट, राजेंद्र पानसरे, आर. टी. शिंदे, अमोल मोरे, दत्ताजी शेलार, भगवान चित्ते, गोविंदराव गायके यांसह अनेक ठेकेदारांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. "शासनाने तातडीने लक्ष देऊन विकासकामांना हातभार लावणाऱ्या ठेकेदारांना न्याय द्यावा," अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुपारच्या सुमारास झालेल्या या आंदोलनाने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.