कर्जत पोलिसांची कुळधरण येथील जुगार अड्ड्यावर धडाकेबाज कारवाई ; ६ जण रंगेहाथ पकडले कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने दि. १ एप्रिल रोजी कर्जत पोलिसांनी कुळधरण येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परी पोलीस उपनिरीक्षक सचिन भाबड यांना पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुळधरण गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ बालाजी सुपर मार्केटच्या मागील बाजूस काही इसम ‘तिरट’ नावाचा हार-जीतीचा जुगार खेळत आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने सरकारी वाहनातून तेथे जावून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना काही इसम गोलाकार बसून जुगार खेळताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच एक इसम पळून गेला. पोलिसांनी इतरांना जागीच थांबवले. चौकशीदरम्यान पळून गेलेला इसम देविदास तात्याबा उदमले (रा. कुळधरण, ता. कर्जत) हा क्लब मालक असल्याचे पोलिसांना समजले. पकडण्यात आलेल्यांना त्यांचे नाव, गाव विचारले. त्यांनी त्यांची नावे दादा रखमाजी गजरमल, प्रवीण दादा सुपेकर, जालिंदर भाऊसाहेब हांडे (सर्व रा. कुळधरण), तसेच प्रवीण शहाजी पवार, दत्तू शहाजी पवार व वसंत चुनीलाल डमाळे (रा. धालवडी, ता. कर्जत) अशी सांगितली. पंचांसमक्ष केलेल्या पाहणीत आरोपींकडून रोख रक्कम, ‘तिरट’ जुगाराची साधने, मोबाईल फोन व मोटरसायकल असा एकूण १ लाख ३१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळी पंचनामा करून आरोपींना मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ च्या कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण अंधारे करीत आहेत. ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली परी पोलीस उपनिरीक्षक सचिन भाबड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन थोरात, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे, संजय सानप, होमगार्ड परशुराम पांडुळे, आकाश भवाळ व महिला होमगार्ड कल्पना जाधव यांच्या पथकाने केली.

- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..1
- ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- माननीय पोलीस अधीक्षक आंटी करप्शन ब्युरो संभाजीनगर येथे सुद्धा तक्रार दाखल आहे परंतु ही सुद्धा तक्रार दाबल्या गेलेली आहे त्यामुळे आपल्या मुंबई कार्यालाला याप्रकरणी माहिती देण्यात आली असून पाचोड पोलीस स्टेशनचे चार अधिकारी त्वरित सस्पेंड करा व सीबीआय चौकशी करा असे या ठिकाणी बरेच प्रकरण दाबलेले आहेत या पाठीमागे जो प्रकरण दाबतो त्याचे नाव समोर आणा त्याची मी कुंडली ओपन करतो सध्या रनिंग प्रकरण दाबणाऱ्या अधिकारी किशोर शिंदे जमादार वडजी बीट विमा मांडा चौकी नंबर दोन रामबा राहते पोलीस उपनिरीक्षक सध्या पाचोड पोलीस स्टेशन आणि महत्वाचे म्हटले तर सिनिअर ऑफिसर ने या अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या कुणाच्या आणि यांनी प्रकरण निकाली काढले कसे हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सिन्नर ऑफिसर एपीआय सचिन पंडित यांच्या स्वाक्षरी शिवाय दिलेल्या पत्रावर कारवाई करण्याऐवजी खोटे अहवाल यांनी सर्वांनी मिळून वरिष्ठांना पाठवले पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब आव्हाड यांना याप्रकरणी इतर अधिकाऱ्यांनी सहमत दर्शवून गंभीर गुन्ह्यांमध्ये वाचवण्यास मदत केली त्यामुळे खालील कलम अंतर्गत यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा #पोलीसानी प्रकरण दाबण्याचा किंवा तपासात करण्यात हलगर्जीपणा (Police Inaction/Suppression) केल्यास, संबंधित #अधिकाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम १६६, IPC कलम १६७, १७७ किंवा २१७-२२१ नुसार कारवाई होऊ शकते. तसेच, भ्रष्टाचाराचा संशय असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत अधिकाऱ्यावर कार्य होऊ शकते -------------------------------------------------------------------- पोलीस स्टेशनचे ए पी आय सचिन पंडित साहेब तुमची माझी वैयक्तिक दुश्मनी नाही परंतु आपल्या पोलीस स्टेशनला माझे पेंटिंग अर्ज पोलीस उपनिरीक्षक रामबाहते वडजी गावची जमादार किशोर शिंदे यांनी गेली 2021 पासून माझे गंभीर प्रकरण दाबले आहे संपादक सुभाष मस्के पैठण न्युज ऑनलाईन संपादक पत्रकार असोसिएशन प्रेस मीडिया मेंबर संपर्क 88301067731
- Post by Balaji Vedpathak1
- Post by Kishor subhash jadhav1
- पिंपरी चिंचवड : - जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचं भयाण वास्तव समोर आलंय. इथून वाहणारी मुळा नदी अक्षरशः गायब झालीये की काय? अशी परिस्थिती जलपर्णी मुळं निर्माण झालीये. त्यामुळं इथले आयटी अभियंते आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. ब्लु रिच सोसायटीत राहणाऱ्या पंधरा हजार रहिवाश्यांच्या नशिबी असं दूषित पाणी आल्यानं त्या सर्वांची चिंता वाढलीये. या मुळा नदीची ही टॉप व्ह्यू दृश्य इथलं भयाण वास्तव स्पष्टपणे दाखवते. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय.... : प्रसाद देसाई - चिंताग्रस्त आयटी अभियंता : स्थानिक महिला : विक्रम साखरे - माजी सरपंच, हिंजवडी #हिंजवडी #मुळानदी #जलपर्णी #पिंपरीचिंचवड #पर्यावरणसंकट #दूषितपाणी #आयटीअभियंते #आरोग्यधोका #नदीप्रदूषण #PMRDA #स्थानिकप्रश्न #हिंजवडीसमस्या #पाणीप्रदूषण #पर्यावरण #Hinjewadi #MulaRiver #WaterHyacinth #PCMC #WaterPollution #EnvironmentalCrisis #ITEmployees #HealthRisk #RiverPollution #PMRDA #LocalIssues #PuneNews #Pollution #UrbanIssues1
- Post by Kishor subhash jadhav1