महाराष्ट्र नाभिक महामंडळा तर्फे मेहकर आमदार सिद्धार्थ खरात यांना सन्मानपत्र देऊन केला गौरव मेहकर जिल्हा बुलढाणा येथील आमदार सिध्दार्थजी खरात यांनी दोन वेळा विधान सभेत नाभिक समाजाच्या प्रश्नावर विषय मांडून समाजाच्या समस्या सार्वजनिक करत न्याची अपेक्षा व्यक्त केली याची दखल नाभिक समाजा तर्फे महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घेतली व आमदार खरात यांना कै . हनमंतराव साळुखे स्मृती सेवा गौरव पुरस्कार स्मृती चिन्ह व सन्मान गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले . आपण लोकनेते असुन तळा-गाळातील विविध घटका पर्यंत आपली सेवा-आपले कर्तव्य पोहचत असुन आपल्या सुक्ष्म विचार सरणी मुळे आपण वारंवार नाभीक समाजातील विविध समस्या/प्रश्न विधान मडंळावर मांडुन समाजाला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करत आहात . आपन आमच्या समाज बांधव आणि समाजीक प्रश्र यांच्या प्रति आपले स्नेह यानंतर ही अपेक्षीत आहे. आपल्या या समाज सहकार्या बद्दल आपणास महाराष्ट्र नाभीक महामंडळा तर्फे सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येत आहे. असे सन्मान पत्र व कै हनमंतराव साळुंखे स्मृती सेवा गौरव पुरस्कार देऊन मेहकर आमदार सिद्धार्थजी खरात यांना नाभिक समाजा तर्फे दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिर संस्थान श्रीक्षेत्र नेवासा येथे आयोजित मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व कीर्तन सोहळ्या दरम्यान महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे मान्यवर, तसेच संत सेना महाराजांचे २३ वे वंशज खुशपाल सिंह चिमाजी (पंजाब), नेवासा येथील आमदार मा श्री. विठ्ठलराव लांघे, बाराबोलतेदाराचे नेते तथा आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांची मित्र भाई, विजय गवळी (खामगाव), प्रदेशाध्यक्ष श्री सयाजीराव झुंजार (कोल्हापूर), प्रदेश कार्याध्यक्ष, श्री.शाम आस्कटकर, प्रदेश कोषाध्यक्ष श्री.रामदास दादा पवार (लातूर), दत्तासेट अनारसे, दत्ता मोतेकर ( सारशिव), विकास मदने (अहिल्यानगर), शांताराम राऊत, दिलीपअण्णा गवळी, बबलूभाई चवरे (चिखली), दादासाहेब काळे (ज्येष्ठ पत्रकार, संभाजीनगर) यांसह हभप गहिनीनाथ महाराज , ह भ प उध्व महाराज मंडलिक , ह भ प नंदकिशोर महाराज खरात , ह भ प हदिभाऊ महाराज घुगे , ह भ प बाळकृष्ण . महाराज दिघे , ह भ प देविदास महाराज म्हस्के य ह भ प सचिन महाराज पवार , आप्पा साहेब गायकवाड, डॉ. आनंद आवटे, एकनाथ वाघ, भास्कर वाघमारे आणि बहुसंख्य वारकरी उपस्थित होते . या पवित्र धार्मिक सोहळ्यात संत सेना महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापना आणि सभामंडपाचे लोकार्पण अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. या सोहळ्यात सहभागी होता आले, ही खऱ्या अर्थाने संतांची कृपाच आहे. असे मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी सत्कारा ला उत्तर देतांना सांगितले . माझा सहृदय सत्कार करून पुरस्कार, मानचिन्ह व सन्मानचिन्ह देण्यात आले—हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. असेही आमदार खरात म्हणाले यावेळी बहुसंख्य वारकरी बांधव व नाभिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा सोहळा भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम ठरला.

- घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच1
- सिल्लोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम व्याख्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी भीम जयंतीच्या जनतेस शुभेच्छा दिल्या1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER4
- Balaji Sontakke Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his Jayanti1
- सिल्लोड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले भाषण व अनेक वर्षापासून निमित्त महापुरुषांच्या जयंती निमित्त ते भाषण करतात मात्र अनेक वर्षांचा अनुभव यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला आहे1
- अंधारीत भीमजयंतीचा उत्साह; ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन सिल्लोड (प्रतिनिधी): सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले. पुष्पहार अर्पण व अभिवादन सोहळा कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मंडळांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी 'जय भीम'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सामाजिक सलोख्याचे दर्शन यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. "केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल," असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.3
- प्रेस नोट सिल्लोड (प्रतिनिधी) दि.13, सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. पाणंद रस्त्यांची रखडलेली कामे त्वरित मार्गी लावावीत, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, तसेच विहीर अधिग्रहणाची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांसोबतच पशुधनासाठीही पाण्याची पुरेशी उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्स, डोंगरगाव फाटा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), पाणीटंचाई, चारा टंचाई, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, अनुदान वाटप तसेच सुरू व प्रलंबित विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढे सांगितले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांच्या हाताला तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, तेथे तत्काळ उपाययोजना राबवून टँकर सुरू करावेत. तसेच ‘महाराजस्व अभियान’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेत / पानंद रस्ताची नोंद घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. विकासकामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. *▢ चौकट : 1* विहीर, गायगोठा , घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेणार नाही. या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी विहीर, गाय-गोठा, घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा दिला. घरकुलाचा दुसरा हप्ता देण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या टाळाटाळीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल योजनेचा धनादेश देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्या जात असल्याचा तक्रारीचा आरोप नागरिकांनी केला यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. घरकुलाचा हप्ता देण्यासाठी अधिकारी किंवा रोजगार सेवकांकडून पैसे घेतले जात असल्यास त्यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी बैठकीत दिले. *चौकट : 2* वाळू माफियांवर कारवाईचे निर्देश, जप्त वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्या या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्पष्ट निर्देश दिले. जप्त केलेली वाळू घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. अवैध वाळू उपसा तात्काळ रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,बऱ्याच गावामध्ये अवैध वाळू साठे दिसतात ते वाळूसाठे महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त करावे, तसेच वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या किंवा काणाडोळा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सोयगाव तहसीलदार मनीषा मेने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजयकुमार सोन्ने, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप फुलारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता साजिदा बानो शहापुरे, जलसंधारण अधिकारी राजधार दांडगे, जि.प. सिंचन विभागाच्या उपअभियंता रुचिता घोगरे यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, देविदास लोखंडे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, दारासिंग चव्हाण, सतीश ताठे, विनोद मंडलेचा, दुर्गाबाई पवार, धरमसिंग चव्हाण, अशोक सूर्यवंशी, सयाजीराव वाघ, पांडुरंग दुधे, कौतीकराव मोरे, संजय डमाळे, अजिंठा सरपंच नजीर अहेमद, अक्षय मगर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांतील कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध नियोजन करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.2