गोंदिया जिल्ह्यातील विशेष लोक अदालतीत चार प्रकरणांचा निपटारा वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली दि.21, 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे सामंज्यस्याने निकाली काढण्यासाठी 'समाधान समारोह-2026' या विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 23 प्रकरणे गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाले, त्यापैकी 3 प्रकरणे इतर जिल्ह्यात स्थांनातरीत करण्यात आले. 20 प्रकरणांपैकी 1 प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले. उर्वरीत 19 प्रकरणात मध्यस्थी करीता त्यातील सर्व पक्षकारांच्या पुर्वबैठका जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके यांनी प्रत्यक्ष व आभासी पध्दतीने घेवुन मध्यस्थी केली. त्यामुळे 19 प्रकरणांपैकी 4 प्रकरणे सामोपचाराने व सामंजस्याने निकाली काढण्यात यश आले. सदर प्रकरणे निकाली काढण्याकरीता व 'समाधान समारोह-2026' ही विशेष लोक अदालत यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया येथील न्यायालयीन कर्मचारी व पी.एल.व्ही यांनी अथक परिश्रम घेवुन सहकार्य केले. अशाप्रकारे सदर लोकअदालतीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील पक्षकारांना दिल्लीला जाण्याची गरज भासली नाही. तसेच पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाल्यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले. अशाच लोकअदालतीचा लाभ सामान्य लोकांना मिळण्याकरीता दि.12 सप्टेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यात नियमित लोकअदालतीचे आयोजन केले आहे. त्याचा संबंधीत पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील विशेष लोक अदालतीत चार प्रकरणांचा निपटारा वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली दि.21, 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे सामंज्यस्याने निकाली काढण्यासाठी 'समाधान समारोह-2026' या विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 23 प्रकरणे गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाले, त्यापैकी 3 प्रकरणे इतर जिल्ह्यात स्थांनातरीत करण्यात आले. 20 प्रकरणांपैकी 1 प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले. उर्वरीत 19 प्रकरणात मध्यस्थी करीता त्यातील सर्व पक्षकारांच्या पुर्वबैठका जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके यांनी प्रत्यक्ष व आभासी पध्दतीने घेवुन मध्यस्थी केली. त्यामुळे 19 प्रकरणांपैकी 4 प्रकरणे सामोपचाराने व सामंजस्याने निकाली काढण्यात यश आले. सदर प्रकरणे निकाली काढण्याकरीता व 'समाधान समारोह-2026' ही विशेष लोक अदालत यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया येथील न्यायालयीन कर्मचारी व पी.एल.व्ही यांनी अथक परिश्रम घेवुन सहकार्य केले. अशाप्रकारे सदर लोकअदालतीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील पक्षकारांना दिल्लीला जाण्याची गरज भासली नाही. तसेच पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाल्यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले. अशाच लोकअदालतीचा लाभ सामान्य लोकांना मिळण्याकरीता दि.12 सप्टेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यात नियमित लोकअदालतीचे आयोजन केले आहे. त्याचा संबंधीत पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.
- ईद ए मिलाद च्या मुस्लिम सणाच्या दिवशी आज साकोली शहरात मुस्लिम बांधवानी काढली रॅली आज मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद च्या सनाच्या दिवशी आज साकोली शहरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवानी रॅली काढून हा सण साजरा केला. शहरातील सर्व मुस्लिम समाज आज उपस्तित होता. कुठलीही हानी होणार नाही या करिता पोलीस प्रशासन सुद्धा उपस्थित बंदोबसतात होता.1
- कोसमटोला येथे विकासाची वानवा: रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ त्रस्त नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या कोसमटोला येथील नागरिकांची बिकट परिस्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप कोसमटोला (स्थानिक वृत्त): ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक २ मधील कोसमटोला गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे चालढकल धोरण यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांचा संताप: गावातील नागरिक धनराज सिताराम बोपचे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी चौरागडे पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून एक लाखाचा निधी देऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे." गावात सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने पाणी रस्त्यावर साचते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची कमतरता किंवा इतर कारणांमुळे यावर कोणताही ठोस उपाय काढण्यात आलेला नाही. माजी सरपंचांची प्रतिक्रिया: या संदर्भात बोलताना कोसमटोलाचे माजी सरपंच सुनील चंद्रकुमार खोब्रागडे यांनी सांगितले की, "२०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या आणि आमचा कार्यकाळ संपला. आमच्या काळात एमआरजीएस (MRGS) अंतर्गत खडीकरण व सिमेंट रस्त्यांची अनेक कामे मंजूर झाली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून एमआरजीएसच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे आणि मस्टर न निघाल्यामुळे गावातील सर्व रस्त्यांची कामे आणि पर्यायाने गावाचा विकास पूर्णपणे थांबला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, दलित वस्तीसह इतर भागांमधील रस्ते अत्यंत खराब असून, चिखल, खड्डे आणि दूषित वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी चिखलातून वाट काढत येणे, गाड्या-घोड्या आणणे आणि गर्भवती महिला किंवा लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे अत्यंतिक कठीण झाले आहे. अनेकदा मुख्य रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर वाहने उभी करून चिखलातून चालत घरी जावे लागते. ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती: कोसमटोला येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तीव्र शब्दांत आवाहन केले आहे की, गावातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था लवकरात लवकर लक्षात घेऊन, तसेच रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि गावकऱ्यांना या नरकयातनेतून मुक्त करावे.1
- *गोंदिया - व्हॉइस ऑफ मीडिया अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी गठीत,बिंबिसार शहारे अध्यक्षपदी,पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार *गोंदिया - व्हॉइस ऑफ मीडिया अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी गठीत,बिंबिसार शहारे अध्यक्षपदी,पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार* गोंदिया - पत्रकारांच्या हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी नव्याने गठीत करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.बिंबिसार शहारे यांची तालुका अध्यक्षपदी,गुणाजी शहारे उपाध्यक्षपदी,सुरेश जीभकाटे सचिवपदी,प्रशांत ऊके कोषाध्यक्षपदी,स्वप्नील ऊके मीडिया प्रमुखपदी तर चेतन समरीत यांची संघटकपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष रामलाल शहारे,जिल्हा सचिव अरुण बन्नाटे,जिल्हा उपाध्यक्ष सूर्यभान ठलाल व जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिगंबर नंदेश्वर उपस्थित होते.तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या,सुरक्षा, शासकीय सुविधा व न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच पत्रकारांमध्ये एकोपा वाढवून सक्षम,निर्भीड व जबाबदार पत्रकारितेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.4
- कामठीकरांसाठी मोठी खुशखबर! थकीत मालमत्ता करावरील 50% शास्ती माफ कामठी : नगर परिषद कामठी क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये तब्बल 50 टक्के माफी देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर नगर परिषद कामठी हद्दीतील थकीत मालमत्ता करासाठी ही 50 टक्के शास्ती माफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार 31 मार्च 2025 पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत थकीत कराची रक्कम अदा केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नगर परिषद कामठीच्या अभिलेखानुसार शहरामध्ये तब्बल 18 हजार 825 मालमत्ता असून, चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची एकूण मागणी सुमारे 11 कोटी 26 लाख रुपये आहे. कर वसुली वाढविणे आणि नागरिकांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने सर्व मालमत्ताधारकांना आपली थकीत कराची रक्कम तात्काळ भरून 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. म्हणजेच कामठीकरांनो… थकीत मालमत्ता कर भरण्याची हीच योग्य संधी! 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्या आणि आपला कराचा बोजा कमी करा! कामठी : नगर परिषद कामठी क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये तब्बल 50 टक्के माफी देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर नगर परिषद कामठी हद्दीतील थकीत मालमत्ता करासाठी ही 50 टक्के शास्ती माफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार 31 मार्च 2025 पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत थकीत कराची रक्कम अदा केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नगर परिषद कामठीच्या अभिलेखानुसार शहरामध्ये तब्बल 18 हजार 825 मालमत्ता असून, चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची एकूण मागणी सुमारे 11 कोटी 26 लाख रुपये आहे. कर वसुली वाढविणे आणि नागरिकांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने सर्व मालमत्ताधारकांना आपली थकीत कराची रक्कम तात्काळ भरून 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. म्हणजेच कामठीकरांनो… थकीत मालमत्ता कर भरण्याची हीच योग्य संधी! 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्या आणि आपला कराचा बोजा कमी करा!1
- साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा* स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले. कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. *प्रतिक्रीया* कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. -राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही. #SalwaCrime #KuhiPolice #SuperstitionNews #MaharashtraNews #NagpurNews विषयानुरूप हॅशटॅग (मराठी): #अंधश्रद्धा #साळवा #कुही #अघोरीपूजा #भानामती #स्मशानभूमी #महाराष्ट्रबातम्या #जादूटोणाविरोधीकायदा विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी): #BlackMagicNews #StopSuperstition #CrimeUpdate #PoliceInvestigation #LocalNews1
- सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ नागपूर : सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून शिवशक्ती नागाब्दार स्वामी सेवा मंडळ व नवयुवक हनुमान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कपालेश्वर महादेव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी या कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. यावेळी किर्तन, फळवाटप व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल- ताशे, भजन व जयघोषाच्या गजरात कावडधारी शिवभक्तांनी सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून तुळशीबाग, महाल येथील कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. कपालेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर कावडधारी शिवभक्तांनी विधिवत पूजन व महादेवाचा अभिषेक केला. यानंतर कडई व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या सर्व कावड यात्रेकरूंसह शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक उपक्रमाच्या आयोजनासाठी शिवभक्त प्रशांत मोटघरे, दिलीप माखाडे, प्रकाश तांदुळकर, राजू तितरे, भगवान नरड, सुनील नांदुरकर, अरविंद शेंडे, किशोर पेटकर व प्रभू रणदिवे यांच्यासह सिरसपेठ परिसरातील महिला व पुरुष शिवभक्तांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मोरया फांऊन्डेशनची संस्थापिका सौ. रजनीताई चौहान, सौ. सारिका नांदुरकर, प्र.क्र. १८ च्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती मनपा, यांची उपस्थिती होती. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्तीन सौ.चित्रा मोटघरे, नितू ठाकूर, कुंदा हिंगणकर, माधुरी आष्टणकर, वर्षा आकरे, छाया मलेवार, चंदा चकोले, सुनीता शेंडे व राणी गायधने यांच्यासह परिसरातील महिला शिवभक्तांनी सहकार्य केले. या कावड यात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.3
- जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन प्रतिनिधी अलिबाग बिनधास्त न्यूज नेटवर्क अलिबाग: सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग - मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील खानाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.1
- गोंदिया - अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी,गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन अर्जुनी मोरगाव - पत्रकारांची सुरक्षा आणि निर्भीड पत्रकारितेच्या अधिकारासाठी गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी पत्रकार धीरज कसारे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. कारंजा, जिल्हा वर्धा येथील दैनिक महासागरचे प्रतिनिधी पत्रकार धीरज कसारे यांच्यासोबत कथित मारहाण, धमकी तसेच दबाव आणण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा निषेध करत संघटनेने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, पत्रकार धीरज कसारे यांनी कारंजा तालुका परिसरातील भेसळखोरी आणि नागरिकांच्या जीविताशी कथित खेळ केला जात असल्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे तसेच पत्रकाराला कथितरीत्या धमकी देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.या प्रकरणी अर्जुनी मोरगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडिया कमिटी आणि जिल्हा कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, पोलीस ठाण्याच्या परिसरातच पत्रकार कसारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्यांना कथितरीत्या जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एखाद्या पत्रकाराने वृत्त प्रकाशित केल्यामुळे पोलीस ठाण्यासारख्या सार्वजनिक आणि संवेदनशील परिसरातच धमकी किंवा दबावाला सामोरे जावे लागणे, ही स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेसाठी गंभीर चिंतेची बाब आहे.या घटनेबाबत गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. हे निवेदन गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे. संघटनेने मागणी केली आहे की, या प्रकरणातील संबंधित आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच घटनेची सत्यता समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार धीरज कसारे यांना आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यात यावी. व्हॉईस ऑफ मीडियाचे स्पष्ट म्हणणे आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा प्रहरी आहे. जनहिताचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना धमकी, दबाव अथवा हिंसाचाराला सामोरे जावे लागणे, हे लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान आहे. त्यामुळे पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. आता या निवेदनानंतर प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते आणि आरोपांच्या चौकशीत कोणती तथ्ये समोर येतात, याकडे पत्रकारिता क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा कमिटी / अर्जुनी मोरगाव तालुका कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते : जिल्हाध्यक्ष – रामलाल शहारे जिल्हा सचिव – अरुण वाय. बन्नाटे जिल्हा उपाध्यक्ष – सूर्यभान ठलाल जिल्हा ग्रामीण अध्यक्ष – दिगंबर नंदेश्वर अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष – बिंबिसार शहारे तालुका उपाध्यक्ष – गुनाजी शहारे तालुका सचिव – सुरेश जीभकाटे तालुका संघटक – चेतन समरित तालुका कोषाध्यक्ष – प्रशांत ऊके सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.1