logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन बुलढाणा, दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडॉप्टेरा लिटुरा), उंट अळी, घाटे अळी आणि केसाळ अळी यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने केले आहे. पाने खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील कोष नष्ट करावेत. मुख्य पिकाभोवती एरंडी किंवा सूर्यफुलाची एक ओळ सापळा पीक म्हणून लावावी. पिकाची नियमित पाहणी करून अंड्यांचे पुंजके तसेच समूहाने आढळणाऱ्या लहान अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. शेत तणमुक्त ठेवून संतुलित खत व्यवस्थापन करणेही आवश्यक आहे. पतंगांच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच कामगंध (फेरोमोन) सापळे लावून त्यामध्ये स्पोडोल्युअर किंवा हेलील्युअर प्रलोभकाचा वापर करावा. भक्षक पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रति एकर ८ ते १० पक्षीथांबे उभारावेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच जैविक नियंत्रणासाठी बिव्हेरिया बॅसियाना ५ मिली प्रति लिटर, एस.एल.एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) ५ मिली प्रति लिटर किंवा मेटारायझियम रिलायी ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास रासायनिक नियंत्रण : कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस प्रति सापळा ८ ते १० नर पतंग आढळल्यास किंवा फुलोऱ्यापूर्वी प्रति मीटर ओळीत १० तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्या आढळल्यास कीड नियंत्रणाची उपाययोजना करावी. तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत प्रति मीटर ओळीत ३ उंट अळ्या किंवा ५ घाटे अळ्या आढळल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी. यासाठी क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एससी १५० मिली प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. पर्याय म्हणून इमामेक्टिन बेंझोएट १.९० टक्के ईसी ४२५ मिली प्रति हेक्टर, फ्लुबेंडायामाइड २० टक्के डब्ल्यूजी २५० ते ३०० ग्रॅम प्रति हेक्टर किंवा फ्लुबेंडायामाइड ३९.३५ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी १५० मिली प्रति हेक्टर यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करता येईल. पाने खाणाऱ्या अळ्यांसह इतर किडींचा प्रादुर्भाव असल्यास : ज्या क्षेत्रात पाने खाणाऱ्या अळ्या, पांढरी माशी तसेच खोड कीड (गर्डल बीटल) यांचा एकाच वेळी प्रादुर्भाव आढळतो, अशा ठिकाणी थायामेथोक्झाम + लॅम्ब्डा-सायहॅलोथ्रिन १२५ मिली प्रति हेक्टर किंवा बेटासायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड ३५० मिली प्रति हेक्टर या मिश्र कीटकनाशकांची फवारणी करता येईल. याशिवाय क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल ०९.३० टक्के + लॅम्ब्डा-सायहॅलोथ्रिन ०४.६० टक्के झेडसी २०० मिली प्रति हेक्टर किंवा इंडॉक्साकार्ब १५.८० टक्के ईसी ३३३ मिली प्रति हेक्टर यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून आर्थिक नुकसान पातळीच्या आधारेच कीड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. कीटकनाशकांची फवारणी करताना शिफारस केलेले प्रमाण, लेबलवरील सूचना आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने केले आहे. 00000

6 hrs ago
user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
6 hrs ago
1dee4038-0558-4954-abd9-846460c627db

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे–नागपूर महामार्गावर एसटी बस आणि रेतीच्या टिपरची समोरासमोर भीषण धडक; टिपर चालकाचा मृत्यू, ३ जण गंभीर तर १५ ते २० प्रवासी जखमी पुणे ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला असून, एसटी बस आणि रेतीच्या टिपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. चिखली तालुक्यातील बोरगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात टिपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एसटी बस चालकासह ३ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या रेतीच्या टिपरने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातातील सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वाहतूक ठप्प अपघातानंतर पुणे–नागपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडल्याने लांब पल्ल्याच्या वाहनांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
    1
    पुणे–नागपूर महामार्गावर एसटी बस आणि रेतीच्या टिपरची समोरासमोर भीषण धडक; टिपर चालकाचा मृत्यू, ३ जण गंभीर तर १५ ते २० प्रवासी जखमी
पुणे ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला असून, एसटी बस आणि रेतीच्या टिपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. चिखली तालुक्यातील बोरगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात टिपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एसटी बस चालकासह ३ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या रेतीच्या टिपरने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
अपघातातील सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वाहतूक ठप्प
अपघातानंतर पुणे–नागपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडल्याने लांब पल्ल्याच्या वाहनांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा! चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!
    1
    चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!

चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
    1
    छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग
छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग
छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी.. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ देण्याची मागणी त्यांनी केली. *हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींची मागणी* जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.
    1
    जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी..

आज दिनांक 28 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ देण्याची मागणी त्यांनी केली.
*हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींची मागणी*
जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    21 min ago
  • नवी दिल्ली : राष्ट्र उभारणी, शिक्षण व मानवतेच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव येथील प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांना ‘पद्मश्री गौरव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ ऑगस्ट २०२६ रोजी द्वारका, नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्रा. वाघ यांनी साने गुरुजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना विविध राज्य व राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त करून ते महाविद्यालयाला अर्पण केले. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करत शेती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये संघटनात्मक कार्याचा विस्तार केला. शिक्षण क्षेत्रात अनेक डॉक्टर, अभियंते घडविण्यासह विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. यावेळी ‘द झेनिथ इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशन’कडून त्यांना आजीवन सभासदत्वाची मान्यताही प्रदान करण्यात आली. हा सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना आणि राष्ट्राला अर्पण करत असल्याचे प्रा. वाघ यांनी सांगितले.
    1
    नवी दिल्ली : राष्ट्र उभारणी, शिक्षण व मानवतेच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव येथील प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांना ‘पद्मश्री गौरव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ ऑगस्ट २०२६ रोजी द्वारका, नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
प्रा. वाघ यांनी साने गुरुजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना विविध राज्य व राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त करून ते महाविद्यालयाला अर्पण केले. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करत शेती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये संघटनात्मक कार्याचा विस्तार केला.
शिक्षण क्षेत्रात अनेक डॉक्टर, अभियंते घडविण्यासह विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. यावेळी ‘द झेनिथ इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशन’कडून त्यांना आजीवन सभासदत्वाची मान्यताही प्रदान करण्यात आली. हा सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना आणि राष्ट्राला अर्पण करत असल्याचे प्रा. वाघ यांनी सांगितले.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
    2
    *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी*

*बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी*
बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    बांधकाम कंत्राटदार बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    1
    संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..

दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..
दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!.. सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार.. संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!.. सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने जालना शहरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
    1
    संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!..

सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार..

संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!..
सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने जालना शहरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    29 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.