logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे ! ■ *ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे !* ■ *उदगीर येथील अधिवेशनात सुप्रसिद्ध टीव्ही ॲकर प्रसन्न जोशी,विशाल परदेशी,प्रज्ञा पोवळे,श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील यांनी "टीव्ही पडद्यावरची दुनिया" या विषयावरील चर्चेत केले आवाहन* उदगीर / अंबाजोगाई लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन १८ व १९ एप्रिल या दोन दिवसांत उत्साहात पार पडले. देशभरातून आलेल्या पत्रकार, संपादक आणि माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे अधिवेशन विचारमंथन, मार्गदर्शन आणि पत्रकारितेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्रात पत्रकारितेतील बदलते स्वरूप, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव आणि पत्रकारितेतील नैतिकता या विषयांवर सखोल चर्चा झाली. वक्त्यांनी पत्रकारांनी वस्तुनिष्ठता, सत्यता आणि जबाबदारी जपत काम करणे आजच्या काळात अधिक आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘डिजिटल पत्रकारिता’, ‘फेक न्यूजचा वाढता धोका’, ‘ग्रामीण पत्रकारितेची आव्हाने’ आणि ‘अँकरिंग व संवाद कौशल्य’ या विषयांवर तज्ज्ञ पत्रकारांनी मार्गदर्शन केले. सहभागी पत्रकारांनी या सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेत अनुभव शेअर केले आणि प्रश्नोत्तरांद्वारे आपले शंका निरसन करून घेतले. ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे ! *ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे ,असे उदगार आज झालेल्या उदगीर येथील व्दितीय सञातील अधिवेशनात सुप्रसिद्ध टीव्ही ॲकर प्रसन्न जोशी,विशाल परदेशी,प्रज्ञा पोवळे,श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील यांनी "टीव्ही पडद्यावरची दुनिया" या विषयावर सविस्तर चर्चा करताना व्यक्त केले.* अधिवेशनादरम्यान काही महत्त्वपूर्ण ठरावही मंजूर करण्यात आले. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे, तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समारोप सत्रात आयोजकांनी अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी अशा अधिवेशनांमुळे पत्रकारांना दिशा आणि नवी ऊर्जा मिळते, असे मत मांडले. एकूणच, उद्गीर येथे पार पडलेले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन पत्रकारितेच्या क्षेत्रातील सध्याच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारे आणि भविष्याची दिशा ठरवणारे ठरले. दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्ष मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर व अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर हे होते.तर विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे,कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे,कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख,महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजीटल मिडीया चे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे,बीड जिल्हाध्यक्ष विशाल सांळुके सह आदी पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध अधिवेशन कार्यात उपस्थिती होती. दोन दिवसीय संपन्न झालेल्याअधिवेशनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पञकार उपस्थित होते.अधिवेशन यशस्वी करण्यासाठी उदगीर संघाचे विभागीय सचिव तसेच अधिवेशन मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे,प्रकाश कांबळे,उदगीर तालुकाध्यक्ष युवराज धोतरे,डीजीटल मिडीया तालुकाध्यक्ष विभीषन मद्देवाड, हल्ला कृती तालुकाध्यक्ष अर्जून जाधव,सचिव सिद्धार्थ सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

20 hrs ago
user_अशोक दगडू वाघमारे
अशोक दगडू वाघमारे
अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
20 hrs ago
d0455326-5ce5-479e-a831-c2b275b1b8c1

ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे ! ■ *ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे !* ■ *उदगीर येथील अधिवेशनात सुप्रसिद्ध टीव्ही ॲकर प्रसन्न जोशी,विशाल परदेशी,प्रज्ञा पोवळे,श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील यांनी "टीव्ही पडद्यावरची दुनिया" या विषयावरील चर्चेत केले आवाहन* उदगीर / अंबाजोगाई लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन १८ व १९ एप्रिल या दोन दिवसांत उत्साहात पार पडले. देशभरातून आलेल्या पत्रकार, संपादक आणि माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे अधिवेशन विचारमंथन, मार्गदर्शन आणि पत्रकारितेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्रात पत्रकारितेतील बदलते स्वरूप, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव आणि पत्रकारितेतील नैतिकता या विषयांवर सखोल चर्चा झाली. वक्त्यांनी पत्रकारांनी वस्तुनिष्ठता, सत्यता आणि जबाबदारी जपत काम करणे आजच्या काळात अधिक आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘डिजिटल पत्रकारिता’, ‘फेक न्यूजचा वाढता धोका’, ‘ग्रामीण पत्रकारितेची आव्हाने’ आणि ‘अँकरिंग व संवाद कौशल्य’ या विषयांवर तज्ज्ञ पत्रकारांनी मार्गदर्शन केले. सहभागी पत्रकारांनी या सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेत अनुभव शेअर केले आणि प्रश्नोत्तरांद्वारे आपले शंका निरसन करून घेतले. ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे ! *ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे ,असे उदगार आज झालेल्या उदगीर येथील व्दितीय सञातील अधिवेशनात सुप्रसिद्ध टीव्ही ॲकर प्रसन्न जोशी,विशाल परदेशी,प्रज्ञा पोवळे,श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील यांनी "टीव्ही पडद्यावरची दुनिया" या विषयावर सविस्तर चर्चा करताना व्यक्त केले.* अधिवेशनादरम्यान काही महत्त्वपूर्ण ठरावही मंजूर करण्यात आले. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे, तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समारोप सत्रात आयोजकांनी अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी अशा अधिवेशनांमुळे पत्रकारांना दिशा आणि नवी ऊर्जा मिळते, असे मत मांडले. एकूणच, उद्गीर येथे पार पडलेले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन पत्रकारितेच्या क्षेत्रातील सध्याच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारे आणि भविष्याची दिशा ठरवणारे ठरले. दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्ष मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर व अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर हे होते.तर विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे,कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे,कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख,महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजीटल मिडीया चे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे,बीड जिल्हाध्यक्ष विशाल सांळुके सह आदी पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध अधिवेशन कार्यात उपस्थिती होती. दोन दिवसीय संपन्न झालेल्याअधिवेशनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पञकार उपस्थित होते.अधिवेशन यशस्वी करण्यासाठी उदगीर संघाचे विभागीय सचिव तसेच अधिवेशन मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे,प्रकाश कांबळे,उदगीर तालुकाध्यक्ष युवराज धोतरे,डीजीटल मिडीया तालुकाध्यक्ष विभीषन मद्देवाड, हल्ला कृती तालुकाध्यक्ष अर्जून जाधव,सचिव सिद्धार्थ सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by परळी वार्ता
    1
    Post by परळी वार्ता
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    1
    सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • चाकूर येथे दोन बेपत्ता अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला; पोलिसांची तातडीची शोधमोहीम व सखोल तपास सुरू. सुरू ॲप इन मराठी न्यूज. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडून त्यापैकी एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोधमोहीम राबवून सखोल तपास सुरू केला आहे. दि. 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 07.00 वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली, चाकूर येथील दोन अल्पवयीन मुले 1) साइचरण दिनेश स्वामी (वय 10 वर्षे) व 2) देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हे घरातील कोणालाही न सांगता बाहेर गेल्याची माहिती दुपारी 01.00 वाजता पोलिसांना प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी भांडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, दुपारी सुमारे 14.10 वाजता शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तपास व शोधकार्य सुरू असतानाच बेपत्ता मुलांपैकी देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हा मुलगा चाकूर ते उजळंब रोडलगत नरेंद्र मनमथ आप्पा शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळून आला. सदर बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, चाकूर येथे हलविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौधर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेची एकूण चार पथके तयार करून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक देखील कार्यरत करण्यात आले. सदर घटनेचा तपास फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने विविध अंगांनी सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याबरोबरच अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच दुसऱ्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. लातूर जिल्हा पोलीस दल या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहत असून, सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
    1
    चाकूर येथे दोन बेपत्ता अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला; पोलिसांची तातडीची शोधमोहीम व सखोल तपास सुरू.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
रविवार दिनांक 19 एप्रिल 2026.
लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडून त्यापैकी एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोधमोहीम राबवून सखोल तपास सुरू केला आहे.
दि. 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 07.00 वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली, चाकूर येथील दोन अल्पवयीन मुले 1) साइचरण दिनेश स्वामी (वय 10 वर्षे) व 2) देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हे घरातील कोणालाही न सांगता बाहेर गेल्याची माहिती दुपारी 01.00 वाजता पोलिसांना प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी भांडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, दुपारी सुमारे 14.10 वाजता शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तपास व शोधकार्य सुरू असतानाच बेपत्ता मुलांपैकी देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हा मुलगा चाकूर ते उजळंब रोडलगत नरेंद्र मनमथ आप्पा शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळून आला. सदर बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, चाकूर येथे हलविण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौधर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेची एकूण चार पथके तयार करून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक देखील कार्यरत करण्यात आले.
सदर घटनेचा तपास फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने विविध अंगांनी सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याबरोबरच अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच दुसऱ्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
लातूर जिल्हा पोलीस दल या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहत असून, सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • *लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.* लातूर शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १८.०० वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव 1) नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर) असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/-स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.
    1
    *लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.*
लातूर शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १८.०० वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे  पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव 
1) नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर)
असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/-स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची  कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    21 hrs ago
  • *लातूर शहरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या आरोपींना अटक; पोलिसांची जलद व प्रभावी कारवाई.* लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका लूटप्रकरणाचा पोलिसांनी अल्पावधीत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 14 मार्च 2026 रोजी फिर्यादी अथर्व दुष्यांत गाडेकर (वय 17 वर्षे, रा. माळी गल्ली, पटेल चौक, लातूर) यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ते व त्यांचे मित्र महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी अंदाजे 2.00 वाजता घराकडे जात असताना, आरोपी अजय दिलीप काळे (रा. मंठाळे नगर, लातूर) व त्याचे दोन साथीदार यांनी संगनमत करून मोटारसायकलवर येत त्यांना अडवले. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या हातातील अंदाजे 20,000/- रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व घटनास्थळावरून पसार झाले. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड यांनी पथक गठित करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला. अत्यंत शिताफीने आरोपी १) अजय दिलीप काळे २) देवेंद्र शिवराम सलगर ( दोघे रा. कातपूर रोड, लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी त्यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे 75,000/- रुपये) तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल (किंमत अंदाजे 60,000/- रुपये) असा एकूण 1,35,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश चित्ते तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपटले, अनिल कज्जेवाड, दीपक थोटे, राहुल गव्हाणे व राजू हनमंते यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
    1
    *लातूर शहरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या आरोपींना अटक; पोलिसांची जलद व प्रभावी कारवाई.*
लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका  लूटप्रकरणाचा पोलिसांनी अल्पावधीत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 14 मार्च 2026 रोजी फिर्यादी अथर्व दुष्यांत गाडेकर (वय 17 वर्षे, रा. माळी गल्ली, पटेल चौक, लातूर) यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ते व त्यांचे मित्र महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी अंदाजे 2.00 वाजता घराकडे जात असताना, आरोपी अजय दिलीप काळे (रा. मंठाळे नगर, लातूर) व त्याचे दोन साथीदार यांनी संगनमत करून मोटारसायकलवर येत त्यांना अडवले. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या हातातील अंदाजे 20,000/- रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व घटनास्थळावरून पसार झाले.
सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड यांनी पथक गठित करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला. अत्यंत शिताफीने आरोपी 
१) अजय दिलीप काळे
२)  देवेंद्र शिवराम सलगर ( दोघे रा. कातपूर रोड, लातूर) 
यांना ताब्यात घेण्यात आले. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी त्यांना अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे 75,000/- रुपये) तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल (किंमत अंदाजे 60,000/- रुपये) असा एकूण 1,35,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश चित्ते तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपटले, अनिल कज्जेवाड, दीपक थोटे, राहुल गव्हाणे व राजू हनमंते यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून  घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला.
👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Anil Rathod
    1
    Post by Anil Rathod
    user_Anil Rathod
    Anil Rathod
    माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद, ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू
    1
    प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद,                                   ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.