लातूर. लातूर शहरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या आरोपींना अटक; पोलिसांची जलद व प्रभावी कारवाई.* *लातूर शहरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या आरोपींना अटक; पोलिसांची जलद व प्रभावी कारवाई.* लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका लूटप्रकरणाचा पोलिसांनी अल्पावधीत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 14 मार्च 2026 रोजी फिर्यादी अथर्व दुष्यांत गाडेकर (वय 17 वर्षे, रा. माळी गल्ली, पटेल चौक, लातूर) यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ते व त्यांचे मित्र महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी अंदाजे 2.00 वाजता घराकडे जात असताना, आरोपी अजय दिलीप काळे (रा. मंठाळे नगर, लातूर) व त्याचे दोन साथीदार यांनी संगनमत करून मोटारसायकलवर येत त्यांना अडवले. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या हातातील अंदाजे 20,000/- रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व घटनास्थळावरून पसार झाले. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड यांनी पथक गठित करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला. अत्यंत शिताफीने आरोपी १) अजय दिलीप काळे २) देवेंद्र शिवराम सलगर ( दोघे रा. कातपूर रोड, लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी त्यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे 75,000/- रुपये) तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल (किंमत अंदाजे 60,000/- रुपये) असा एकूण 1,35,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश चित्ते तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपटले, अनिल कज्जेवाड, दीपक थोटे, राहुल गव्हाणे व राजू हनमंते यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

- आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; आमदार नाना पटोले आणि आमदार अमित देशमूख यांच्याविरोधात लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध लातूर (प्रतिनिधी) : अनु. जाती आरक्षण उपवर्गीकरणाला आमदार नाना पटोले यांनी केलेल्या लेखी विरोधामुळे लातूर जिल्ह्यातील मातंग समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. डॉ. अण्णाभाऊ साठे १०५ वी सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, लातूर तसेच समस्त मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना सामूहिक निवेदन सादर करत तीव्र निषेध नोंदवत डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे चौक घोषणांनी दणाणून गेला होता. आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आमदारांनी घेतलेली भूमिका ही समाजाच्या हक्कांवर गदा आणणारी असून ती पूर्णतः अन्यायकारक आणि समाजविघातक आहे. या भूमिकेमुळे समाजामध्ये अंतर्गत तेढ निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ऍड सच्छिन्द्र कांबळे यांनी केला. मातंग समाजाच्या भावना प्रचंड तीव्र झाल्या असून, संबंधित आमदारांविरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी ऍड सचिंद्र कांबळे यांनी केला. तसेच स्थानिक चे आमदार अमित देशमुख यांचाही जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला. या वेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by Ramesh Mulgir1
- सेलूतील खून प्रकरणी आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईकांचा ठिय्या1
- Post by Mohsin ahmed khan1
- मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद1
- हिंगोली (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव येथे आज नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत महामार्गामुळे शेती जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी शासनाने हा प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार न केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.यावेळी अनेकांनी आपले मत मांडत महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.1
- गांधी चौक पोलिसांची धडक कारवाई. जबरदस्तीने मारहाण करून सोन्याची अंगठी केली लंपास. दोन आरोपी जेरबंद, वाहनासह 1,35,000/-हजाराचा मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026. लातूर शहरात गुंडगिरी करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात गांधी चौक पोलिसांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून जबरदस्तीने मारहाण करून सोन्याची अंगठी हिस्कावून घेणाऱ्या आरोपींना वाहनासह अटक करण्यात आली. गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वातील पथकाला दिनांक 14 मार्च 2026 रोजी गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील कॉलेजवरून घराकडील मार्गावर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पायी चालत जात असलेल्या फिर्यादीला व त्याच्या मित्राला आरोपींनी मोटरसायकलवर पाठीमागून येत फिर्यादीस व फिर्यादीच्या मित्रांना धक्काबुक्की करून शिवीगाळी करून लाथाबूक्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी अंदाजे किंमत 20,000/- रुपयाची जबरदस्तीने काढून घेवून गेले असल्याने फिर्यादी अथर्व दुष्यांत गाडेकर, वय 17 वर्षे, व्यवसाय-शिक्षण रा. माळी गल्ली, पटेल चौक, लातूर यानी गांधी चौक पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली असता त्यांच्या जबाबदावरून आरोपी नामे अजय दिलीप काळे राहणार मंठाळे नगर लातूर व त्याचे इतर दोन साथीदार यांनी संगणमत केल्याने नमूद CR NO. 151/2026 कलम 309 (4), 3(5) भारतीय न्याय संहिता कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीरसिंह साळवे यांनी मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणि बाबत सूचना दिल्या त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक श्री सुनील रेजीतवाड व यांच्या पथकाने अत्यंत शीताफिने आरोपीची गोपनीय माहिती काढून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) अजय दिलीप काळे व त्याचा साथीदार 2) देवेंद्र शिवराम सलगर दोघे राहणार कातपूर रोड. यांन ताब्यात घेऊन दि 16 एप्रिल 2026 रोजी अटक करून गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता आरोपीने गुन्हा केल्याची कबूल करून गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल एक सोन्याची 5 ग्रॅम ची अंगठी किमत -75000/- रु ची व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किमत 60,000/- असा एकूण 1,35,000/- रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. सदर पथकात पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते, पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले, अनिल कज्जेवाड, दीपक थोटे, राहुल गव्हाणे, राजू हनमंते यांनी कार्यवाही केली आहे.2