कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय येथील परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अचानक दिली भेट नांदेड जिल्ह्यात आज इयत्ता बारावीचा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली या भेटीत पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांनी ओळखपत्र न बाळगणे विद्यार्थ्यांना बसण्यास ड्युअल डेस्कची व्यवस्था नसणे यासह उरलेल्या प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षितरित्या जमा न केल्याच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या या अनियमिततेसंदर्भात संबंधित केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित परीक्षा केंद्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय येथील परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अचानक दिली भेट नांदेड जिल्ह्यात आज इयत्ता बारावीचा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली या भेटीत पर्यवेक्षण करणाऱ्या
शिक्षकांनी ओळखपत्र न बाळगणे विद्यार्थ्यांना बसण्यास ड्युअल डेस्कची व्यवस्था नसणे यासह उरलेल्या प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षितरित्या जमा न केल्याच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या या अनियमिततेसंदर्भात संबंधित केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित परीक्षा केंद्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
- वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..! नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते1
- १० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हा जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद रफीख नांदेड : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत अंदाजे १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने तत्काळ छापा टाकला. या कारवाईत अंदाजे ५ ब्रास रेती (सुमारे २५ हजार रुपये), एक जेसीबी मशीन (३ लाख रुपये) आणि एक ट्रॅक्टर (७ लाख ५० हजार रुपये) असा एकूण १०,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धर्मपाल ज्ञानोबा कांबळे (वय ३४, व्यवसाय पोलीस, नांदेड ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी केशवराव लमदाडे, बापुराव शीरसागर, मदन येवले (सर्व रा. मार्कंड) व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०३(२), ३०३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसानी प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस कर्मचारी विठ्ठल शिंदे, आरिफ, जमीर सरवे आदींचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.2
- शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews1
- Post by Today One Live1
- संस्काराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गुरु कडून आशीर्वाद हेच जीवनाचे साफल्य - रामभाऊ तिरुके उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील वाढवणा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ तिरुके विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर संस्कार केलेल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत संस्कार करणारे, शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून देणारे मार्गदर्शक तथा शिक्षक शिवाजीराव पांचाळ गुरुजी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. गुरु पेक्षा शिष्य मोठा व्हावा, तोच गुरुला खरा आनंद असतो. भावनेने प्रचंड आनंदाने त्यांनी रामभाऊ तिरुके यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद घेतल्यानंतर बोलताना रामभाऊ तिरुके म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाच्या त्या मजबूत पायावर उभा राहूनच मी पुढील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवू शकलो. गेली ३२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांनी दिलेला विश्वास, उभं केलेलं काम आणि चार वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवताना तीन वेळा जनतेने माझ्यावर उधळलेला विजयाचा गुलाल, हे सर्व ऐकून आणि पाहून गुरुजींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. गुरुजींचे आशीर्वाद हेच माझे खरे बळ असून त्यांच्या कृपाशिर्वादाने समाजसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने आणि निष्ठेने पुढे सुरू राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या गुरुजनांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षश्रष्ठींचा सन्मान झाला पाहिजे अशाच पद्धतीचे काम माझ्या हातून होत राहील. आज पर्यंत जो आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे, तोच आदर्श शेवटपर्यंत माझ्यासमोर राहील. त्यामुळे मी समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय ठेवले आहे, असे स्पष्ट केले.1
- 🕉️📖 महाशिवरात्री विशेषांकाचे दिमाखदार विमोचन! 📖🕉️ महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगरमध्ये सुरू असलेल्या भक्तिमय वातावरणात “श्रमिक लोकराज्य” दैनिकाच्या महाशिवरात्री उत्सव 2026 विशेषांकाचे उत्साहात विमोचन संपन्न झाले. या विशेषांकाचे प्रकाशन माजी आमदार मा. माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास मंदिर कमिटी पदाधिकारी, नगरपरिषद प्रतिनिधी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्म, संस्कृती आणि समाजमनाचे दर्शन घडवणारा हा विशेषांक वाचकांसाठी पर्वणी ठरत आहे. 🙏 #श्रमिकलोकराज्य #महाशिवरात्रीविशेषांक #Mahashivratri2026 #हिमायतनगर #दैनिकविमोचन धार्मिकउत्सव ShivBhakti MediaNews NNLDigitalMedia1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- उदगीर (एल पी उगीले) येथील जीवन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आद्य क्रांतिगृह असतात लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने जीवन प्रयाग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, प्रा. संजय बीबीनवरे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, चंद्रकला सूर्यवंशी यांच्यासह वस्ताद लहुजी साळवे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.1