logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रावेरच्या वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी बेकायदेशीरपणे रूममध्ये आढळली..! वैशाली लॉजिंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस..! मॅनेजरसह दोघे अटकेत रावेर पोलिसांची हॉटेल-लॉजिंग तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी व तरुणाला कोणतेही ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

12 hrs ago
user_R Media
R Media
रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
12 hrs ago

रावेरच्या वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी बेकायदेशीरपणे रूममध्ये आढळली..! वैशाली लॉजिंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस..! मॅनेजरसह दोघे अटकेत रावेर पोलिसांची हॉटेल-लॉजिंग तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी व तरुणाला कोणतेही ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रावेरच्या वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी बेकायदेशीरपणे रूममध्ये आढळली..! वैशाली लॉजिंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस..! मॅनेजरसह दोघे अटकेत रावेर पोलिसांची हॉटेल-लॉजिंग तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी व तरुणाला कोणतेही ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
    1
    रावेरच्या वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी बेकायदेशीरपणे रूममध्ये आढळली..! 
वैशाली लॉजिंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस..! मॅनेजरसह दोघे अटकेत
रावेर पोलिसांची हॉटेल-लॉजिंग तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी व तरुणाला कोणतेही ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
    user_R Media
    R Media
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातून श्रावण सोमवारनिमित्त आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात्रेदरम्यान भाविकांनी भगवान शंकराचे नामस्मरण करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कांचन नगर परिसरातील नागरिकांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
    1
    जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातून श्रावण सोमवारनिमित्त आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात्रेदरम्यान भाविकांनी भगवान शंकराचे नामस्मरण करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कांचन नगर परिसरातील नागरिकांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. ##साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. सोमेश मुळे जळगाव: साखरेच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या वाढत्या साखर भाववाढीच्या विरोधात आज जळगाव महानगरपालिकेजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. माजी महापौरांच्या नेतृत्वात घोषणाबाजी या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा महापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी केले. 'साखर भाव कमी झालेच पाहिजेत', 'केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो' अशा तीव्र घोषणा देत उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे जगणे कठीण झाले असून, सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आंदोलनानंतर उबाठा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. साखरेचे दर नियंत्रित आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. 
##साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. 
सोमेश मुळे जळगाव:
साखरेच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या वाढत्या साखर भाववाढीच्या विरोधात आज जळगाव महानगरपालिकेजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
माजी महापौरांच्या नेतृत्वात घोषणाबाजी
या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा महापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी केले. 'साखर भाव कमी झालेच पाहिजेत', 'केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो' अशा तीव्र घोषणा देत उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे जगणे कठीण झाले असून, सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
आंदोलनानंतर उबाठा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. साखरेचे दर नियंत्रित आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_सोमेश किशोर मुळे
    सोमेश किशोर मुळे
    पेपर वितरक जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    2
    सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. ​हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. ​शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    4
    ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च


खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. ​हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. ​शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन, आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....
    1
    चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन,
आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • अकोट शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपीकडुन ०८ चोरीच्या मोटरसायकली व ०२ मोटारसायकल इंजिन व मोटरसायकलचे स्पेअर पार्ट असा एकुन ६,०५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त. अकोट शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपीकडुन ०८ चोरीच्या मोटरसायकली व ०२ मोटारसायकल इंजिन व मोटरसायकलचे स्पेअर पार्ट असा एकुन ६,०५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त. अकोट तालुका प्रतिनिधी.. पोलीस ठाणे अकोट शहर येथे अपराध क्रमांक ६८४/२०२६ कलम ३०३ (२) बि.एन.एस-२०२३ अन्वये दिनांक १६/०८/२०२६ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे शिवराज मोहन हाडोळे वय ३२ वर्षे रा. नंदीपेठ अकोट यांनी रिपोर्ट दिला की, दि.१६/०८/२०२६ रोजी रात्री ०२/१५ वा चे सुमारास त्याची एम एच ३० बि. एच ७६९९ क्रमांकाची काळया रंगाची स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल जिचा इंजिन क्रमांक HA10AGKHA20067 व चेसीस क्रमांक MBLHAW082KHA04910 किमंत ७०,०००/- रू ची घरासमोर उभी केली होती सकाळी ०५/३० वाजता त्याचा लहान भाऊ सुरज हाडोळे हा शेतात जाण्यासाठी उठला असता त्याला फिर्यादीने उभी करून ठेवलेली मोटरसायकल त्याला दिसली नाही. म्हणुन त्याने फिर्यादीस उठवुन विचारले की तु आपली मोटरसायकल कोणाला दिली का तर फिर्यादीने उठुन दारात पाहीले असता त्याने घरासमोर उभी करून ठेवलेली स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल क्रमांक एम.एच ३० बि.एच ७६९९ किमंत ७०,०००/- रू काळया रंगाची दिसली नाही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे. अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासादरम्यान तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशईत आरोपी गजानन प्रभुदास रायबोले वय २३ वर्षे, अब्दुल जावेद अब्दुल जमील जमादार वय ३० वर्षे दोन्ही रा. इंदिरा नगर येवदा ता. दर्यापुर जि. अमरावती यांना ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली असता त्यांनी अकोट शहर व परिसरात मोटारसायकल चोरी केल्याची माहीती दिली. वरून दोन्ही आरोपीतांचे घराची झडती घेतली असता आरोपीकडुन पोलीस स्टेशन अकोट शहर येथे दाखल अप क्रमांक १) ६८४/२०२६ कलम ३०३(२) बि.एन.एस-२०२३ २) अप क्रमांक ७१५/२०२६ कलम ३०३(२) बि.एन.एस-२०२३ मधील मोटरसायकली मिळुन आल्या असुन त्याचेकडुन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. शाईन मोटर सायकल काळया रंगाची ७०,०००, हिरो होन्डा कंपनीची काळया रंगाची निळा पट्टा असलेली स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल ६५,०००/-,हिरो होन्डा कंपनीची सिल्वर रंगाची पिवळा पट्टा असलेली स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल ६०,०००/-,हिरो होन्डा कंपनीची काळया रंगाची स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल ६५,०००/-, हिरो होन्डा कंपनीची काळया रंगाची निळा व पांढरा रंगाचे प‌ट्टे असलेली स्प्लेन्डर प्लस मो सा ६५,०००/-, हिरो कंपनीची काळया रंगाची सिल्हर रंगाचे प‌ट्टे असलेली स्प्लेन्डर प्लस मो सा६५०००, हिरो कंपनीची काळया रंगाची सिल्वर रंगाचे प‌ट्टे असलेली स्प्लेन्डर प्लस मो सा ६०,०००/- ,हिरो होन्डा कंपनीची निळ्या रंगाची पेंशन प्लस मो सा ६५,०००/-, हिरो कंपनीचे मोटरसायकल इंजिन ३५,०००/-,हिरो कंपनीचे मोटरसायकल इंजिन ३५,०००/-, एक मोटरसायकल चेसीस १०,०००/-, मोटरसायकल चे वेगवेगळे स्पेअर पार्ट १०,०००/- असा एकुन दोन्ही आरोपीकडुन ६,०५,०००/- रू चा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला असुन सदर जप्त करण्यात आलेल्या वाहनाबाबत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बि. चंद्रकांत रेड्डी मा. उपविभागिय पोलिस अधिकारी निखील पाटील, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार किशोर जुनघरे तसेच गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि निलेश बारहाते, व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोहेकॉ नरेंद्र जाधव, पोहेकॉ रामेश्वर भगत, पोहेकॉ कपिल राठोड, पोहेकॉ नितेश सोळंके, पोहेकॉ सुबोध खंडारे यांनी केली.
    4
    अकोट शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपीकडुन ०८ चोरीच्या मोटरसायकली व ०२ मोटारसायकल इंजिन व मोटरसायकलचे स्पेअर पार्ट असा एकुन ६,०५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त.
अकोट शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपीकडुन ०८ चोरीच्या मोटरसायकली व ०२ मोटारसायकल इंजिन व मोटरसायकलचे स्पेअर पार्ट असा एकुन ६,०५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त.
अकोट तालुका प्रतिनिधी..
पोलीस ठाणे अकोट शहर येथे अपराध क्रमांक ६८४/२०२६ कलम ३०३ (२) बि.एन.एस-२०२३ अन्वये दिनांक १६/०८/२०२६ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे शिवराज मोहन हाडोळे वय ३२ वर्षे रा. नंदीपेठ अकोट यांनी रिपोर्ट दिला की, दि.१६/०८/२०२६ रोजी रात्री ०२/१५ वा चे सुमारास त्याची एम एच ३० बि. एच ७६९९ क्रमांकाची काळया रंगाची स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल जिचा इंजिन क्रमांक HA10AGKHA20067 व चेसीस क्रमांक MBLHAW082KHA04910 किमंत ७०,०००/- रू ची घरासमोर उभी केली होती सकाळी ०५/३० वाजता त्याचा लहान भाऊ सुरज हाडोळे हा शेतात जाण्यासाठी उठला असता त्याला फिर्यादीने उभी करून ठेवलेली मोटरसायकल त्याला दिसली नाही. म्हणुन त्याने फिर्यादीस उठवुन विचारले की तु आपली मोटरसायकल कोणाला दिली का तर फिर्यादीने उठुन दारात पाहीले असता त्याने घरासमोर उभी करून ठेवलेली स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल क्रमांक एम.एच ३० बि.एच ७६९९ किमंत ७०,०००/- रू काळया रंगाची दिसली नाही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे. अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासादरम्यान तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशईत आरोपी  गजानन प्रभुदास रायबोले वय २३ वर्षे, अब्दुल जावेद अब्दुल जमील जमादार वय ३० वर्षे दोन्ही रा. इंदिरा नगर येवदा ता. दर्यापुर जि. अमरावती यांना ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली असता त्यांनी अकोट शहर व परिसरात मोटारसायकल चोरी केल्याची माहीती दिली. वरून दोन्ही आरोपीतांचे घराची झडती घेतली असता आरोपीकडुन पोलीस स्टेशन अकोट शहर येथे दाखल अप क्रमांक १) ६८४/२०२६ कलम ३०३(२) बि.एन.एस-२०२३ २) अप क्रमांक ७१५/२०२६ कलम ३०३(२) बि.एन.एस-२०२३ मधील मोटरसायकली मिळुन आल्या असुन त्याचेकडुन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
शाईन मोटर सायकल काळया रंगाची ७०,०००,
हिरो होन्डा कंपनीची काळया रंगाची निळा पट्टा असलेली स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल ६५,०००/-,हिरो होन्डा कंपनीची सिल्वर रंगाची पिवळा पट्टा असलेली स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल ६०,०००/-,हिरो होन्डा कंपनीची काळया रंगाची स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल ६५,०००/-,
हिरो होन्डा कंपनीची काळया रंगाची निळा व पांढरा रंगाचे प‌ट्टे असलेली स्प्लेन्डर प्लस मो सा ६५,०००/-,
हिरो कंपनीची काळया रंगाची सिल्हर रंगाचे प‌ट्टे असलेली स्प्लेन्डर प्लस मो सा६५०००, हिरो कंपनीची काळया रंगाची सिल्वर रंगाचे प‌ट्टे असलेली स्प्लेन्डर प्लस मो सा ६०,०००/- ,हिरो होन्डा कंपनीची निळ्या रंगाची पेंशन प्लस मो सा ६५,०००/-,
हिरो कंपनीचे मोटरसायकल इंजिन ३५,०००/-,हिरो कंपनीचे मोटरसायकल इंजिन ३५,०००/-,
एक मोटरसायकल चेसीस
१०,०००/-,
मोटरसायकल चे वेगवेगळे स्पेअर पार्ट १०,०००/- असा एकुन दोन्ही आरोपीकडुन ६,०५,०००/- रू चा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला असुन सदर जप्त करण्यात आलेल्या वाहनाबाबत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक  अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बि. चंद्रकांत रेड्डी मा. उपविभागिय पोलिस अधिकारी निखील पाटील, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार किशोर जुनघरे तसेच गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि निलेश बारहाते, व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोहेकॉ नरेंद्र जाधव, पोहेकॉ रामेश्वर भगत, पोहेकॉ कपिल राठोड, पोहेकॉ नितेश सोळंके, पोहेकॉ सुबोध खंडारे यांनी केली.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहे #कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका कारखान्यात खराब झाल्यानंतर हे पदार्थ टाकून देण्यात आले होते. व्हिडिओ बनवणाऱ्याच्या मते, यातील काही चॉकलेट्सची मुदत २०२४ मध्येच संपली होती. अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे. व्हिडीओ सौजन्य :सोशल मीडिया #vidioviral #kanpur #cricketnews #Crime
    1
    कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहे
#कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका कारखान्यात खराब झाल्यानंतर हे पदार्थ टाकून देण्यात आले होते. व्हिडिओ बनवणाऱ्याच्या मते, यातील काही चॉकलेट्सची मुदत २०२४ मध्येच संपली होती. अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे.
व्हिडीओ सौजन्य :सोशल मीडिया 
#vidioviral #kanpur #cricketnews #Crime
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.