logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी नांदेड दि. 15 एप्रिल :- केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करून फार्मर आयडी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी, जेणेकरून खत वितरण सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दतकुमार कळसाईत यांनी केले आहे. फार्मर आयडी अनिवार्य शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे. आयडी शिवाय खत वितरण केले जाणार नाही. अनुदानित खतांसाठी सक्ती रासायनिक खतांवरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. काळाबाजार व लिंकिंग थांबवणे खतांचा काळाबाजार व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरेल. पारदर्शक व नियोजनबद्ध वितरण सुनिश्चित होईल. डिजिटल नोंदणी प्रणाली शेतकऱ्यांची माहिती (जमीन, पीक, योजना) डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. खत खरेदी करताना आयडी स्कॅन/क्रमांक वापरला जाईल. थेट लाभ हस्तांतरण (DBT) खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. इतर शासकीय योजनांसाठीही फार्मर आयडी आवश्यक राहील. जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणी मोहिम सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती व नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहे फार्मर आयडी कसा काढावा ? ग्रामपंचायत कार्यालय. सीएससी CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर). सहाय्यक कृषी अधिकारी / कृषी विभाग कार्यालय महत्वाच्या सूचना शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी. खत खरेदी करताना आयडी सोबत ठेवावा. अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करावी व बिल घ्यावे. खरीप हंगाम 2026 पासून हा नियम काटेकोरपणे लागू केला जाणार आहे. सहकारी संस्था व खाजगी विक्रेत्यांमार्फतही याच नियमांनुसार खत वितरण होईल, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

12 hrs ago
user_राजुभाऊ गायकवाड
राजुभाऊ गायकवाड
मी 2021 पासून पत्रकार आहे हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
12 hrs ago
8f624773-5940-4d2e-b6d1-575fdeb3f3b1

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी नांदेड दि. 15 एप्रिल :- केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करून फार्मर आयडी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी, जेणेकरून खत वितरण सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दतकुमार कळसाईत यांनी केले आहे. फार्मर आयडी अनिवार्य शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे. आयडी शिवाय खत वितरण केले जाणार नाही. अनुदानित खतांसाठी सक्ती रासायनिक खतांवरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. काळाबाजार व लिंकिंग थांबवणे खतांचा काळाबाजार व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरेल. पारदर्शक व नियोजनबद्ध वितरण सुनिश्चित होईल. डिजिटल नोंदणी प्रणाली शेतकऱ्यांची माहिती (जमीन, पीक, योजना) डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. खत खरेदी करताना आयडी स्कॅन/क्रमांक वापरला जाईल. थेट लाभ हस्तांतरण (DBT) खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. इतर शासकीय योजनांसाठीही फार्मर आयडी आवश्यक राहील. जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणी मोहिम सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती व नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहे फार्मर आयडी कसा काढावा ? ग्रामपंचायत कार्यालय. सीएससी CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर). सहाय्यक कृषी अधिकारी / कृषी विभाग कार्यालय महत्वाच्या सूचना शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी. खत खरेदी करताना आयडी सोबत ठेवावा. अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करावी व बिल घ्यावे. खरीप हंगाम 2026 पासून हा नियम काटेकोरपणे लागू केला जाणार आहे. सहकारी संस्था व खाजगी विक्रेत्यांमार्फतही याच नियमांनुसार खत वितरण होईल, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नवसाला पावणारा व इच्छा पूर्ण करणारा हारे का सहारा बाबा श्याम हमारा असा हा देवस्थान आपल्या नांदेड शहरात असून. मुख्य देवस्थान राजस्थान येथील खाटू नगर या ठिकाणी असून त्याचेच प्रतिबिंब स्वरूप म्हणून 2005 वर्षी या नांदेड शहरांमध्ये श्री खाटू श्याम बाबा यांचे मंदिर बांधण्यात आलं परंतु अनेकांना ह्या खाटू श्याम बाबा बद्दल काहीच माहित नव्हतं परंतु जसजसं प्रसार वाढत जाईल तसं तसं या खाटू श्याम बाबाचा पूजन घराघरांमध्ये होणार असं श्रीकृष्णाने या खाटू श्याम बाबा यांना वरदान दिलेलं आहे याच अनुषंगाने या वरदान व्यतिरिक्त आणखी दोन वरदान दिले जे की कोणताही भक्त या कलियुगामध्ये तुझी उपासना करेल तुझी पूजा करेल तुझ्या चौकटीवर येऊन तुला काही मागील तर तू त्यांना देणार खाली हात वापस पाठवू देणार नाही असा तो हारे का सहारा बनशील त्यांनी दुसरा वरदान म्हणजे ज्या व्यक्तीच्या नशिबी दुःख दारिद्र्य संघटन कष्ट ही माझ्या लिखित स्वरूपात दिलेले ते कधीच बदलणार नाही परंतु तुला ते अधिकार सुद्धा मी देतो असे देखील श्रीकृष्णांनी या श्याम बाबांना वरदान दिले याच अनुषंगाने भारतामध्ये अनेक ठिकाणी श्याम बाबा देवस्थान यांची स्थापना करण्यात आली मुख्य बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रा मध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये शहरांमध्ये खाटू श्याम बाबा यांचा देवस्थान मोठ्या प्रमाणात उभारणी होत आहे जसं जसं भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत तशा तशाप्रकारे मोठ्या प्रमाणात खाटू श्याम बाबा या ठिकाणी भक्तांची गर्दी बघण्यास मिळत आहे. नांदेड शहरांमध्ये देखील दर एकादशी निमित्त नांदेड येथील प्रसिद्ध श्री खाटू श्याम बाबा मंदिर सांगवी हिंगोली रोड या ठिकाणी मोठ्या संख्येने दिवसभर भाविकांनी दर्शन घेत श्याम बाबा यांच्या समोर साकडे घातले. ज्याच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्याने त्या सगळ्यांना या ठिकाणी श्याम बाबा मंदिर येथे येऊन आपले नवस सोडले. बाबांचा आशीर्वादाचा चमत्कार आज अनेक भक्त घेत आहेत आणि अनुभवत आहेत. आपणही यावे आणि या श्याम बाबा मंदिर येथे श्याम बाबा यांची दर्शन घ्यावे.
    3
    नवसाला पावणारा व इच्छा पूर्ण करणारा हारे का सहारा बाबा श्याम हमारा असा हा देवस्थान आपल्या नांदेड शहरात असून. मुख्य देवस्थान राजस्थान येथील खाटू नगर या ठिकाणी असून त्याचेच प्रतिबिंब स्वरूप म्हणून 2005 वर्षी या नांदेड शहरांमध्ये श्री खाटू श्याम बाबा यांचे मंदिर बांधण्यात आलं परंतु अनेकांना ह्या खाटू श्याम बाबा बद्दल काहीच माहित नव्हतं परंतु जसजसं प्रसार वाढत जाईल तसं तसं या खाटू श्याम बाबाचा पूजन घराघरांमध्ये होणार असं श्रीकृष्णाने या खाटू श्याम बाबा यांना वरदान दिलेलं आहे याच अनुषंगाने या वरदान व्यतिरिक्त आणखी दोन वरदान दिले जे की कोणताही भक्त या कलियुगामध्ये तुझी उपासना करेल तुझी पूजा करेल तुझ्या चौकटीवर येऊन तुला काही मागील तर तू त्यांना देणार खाली हात वापस पाठवू देणार नाही असा तो हारे का सहारा बनशील त्यांनी दुसरा वरदान म्हणजे ज्या व्यक्तीच्या नशिबी दुःख दारिद्र्य संघटन कष्ट ही माझ्या लिखित स्वरूपात दिलेले ते कधीच बदलणार नाही परंतु तुला ते अधिकार सुद्धा मी देतो असे देखील श्रीकृष्णांनी या श्याम बाबांना वरदान दिले याच अनुषंगाने भारतामध्ये अनेक ठिकाणी श्याम बाबा देवस्थान यांची स्थापना करण्यात आली मुख्य बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रा मध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये शहरांमध्ये खाटू श्याम बाबा यांचा देवस्थान मोठ्या प्रमाणात उभारणी होत आहे जसं जसं भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत तशा तशाप्रकारे मोठ्या प्रमाणात खाटू श्याम बाबा या ठिकाणी भक्तांची गर्दी बघण्यास मिळत आहे. नांदेड शहरांमध्ये देखील
दर एकादशी निमित्त नांदेड येथील प्रसिद्ध श्री खाटू श्याम बाबा मंदिर सांगवी हिंगोली रोड या ठिकाणी मोठ्या संख्येने दिवसभर भाविकांनी दर्शन घेत श्याम बाबा यांच्या समोर साकडे घातले. ज्याच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्याने त्या सगळ्यांना या ठिकाणी  श्याम बाबा मंदिर येथे येऊन आपले नवस सोडले. बाबांचा आशीर्वादाचा चमत्कार आज अनेक भक्त घेत आहेत आणि अनुभवत आहेत. 
आपणही यावे आणि या श्याम बाबा मंदिर येथे श्याम बाबा यांची दर्शन घ्यावे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
  • नांदेड मध्ये महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नांदेड जिल्हा पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम नमस्कार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली विष्णुपूरी येथील डॉक्टर. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवार १४ एप्रिल रोजी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळ आणि अन्नदान वाटप करण्यात आले आहे
    1
    नांदेड मध्ये महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नांदेड जिल्हा पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम
नमस्कार
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली
विष्णुपूरी येथील डॉक्टर. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
मंगळवार १४ एप्रिल रोजी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळ आणि अन्नदान वाटप करण्यात आले आहे
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
    1
    आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • उमदरीयेथील गट क्रमांक ५८/३ मध्ये सुरू असलेल्याबेकायदशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनही, भूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाही. उलट, अधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहे. प्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी १ एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाही, अद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार झाल्या पासून हे उत्खनन थांबण्या ऐवजी त्याचे स्वरूप अधिक ‘चोरटे‘ झाले आहे. ५ ते ६ हायवा टिपर्सच्या माध्यमातून रातोरात मुरूम गायब केला जात आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाआरोप होत आहे. ‘जाया मोका‘ पंचनामा त्वरित होणे अपेक्षित असताना टाळाटाळ का केली जात आहे? आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. मुखेडचे तहसीलदार याकडे गांभीर्याने बघून गुन्हे दाखल करणार की भूमाफियांना अभय देणार, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
    2
    उमदरीयेथील गट क्रमांक ५८/३ मध्ये सुरू असलेल्याबेकायदशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनही, भूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाही. उलट, अधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहे. प्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी १ एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाही, अद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार झाल्या पासून हे उत्खनन थांबण्या ऐवजी त्याचे स्वरूप अधिक ‘चोरटे‘ झाले आहे. ५ ते ६ हायवा टिपर्सच्या माध्यमातून रातोरात मुरूम गायब केला जात आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाआरोप होत आहे.
‘जाया मोका‘ पंचनामा त्वरित होणे अपेक्षित असताना टाळाटाळ का केली जात आहे?
आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. मुखेडचे तहसीलदार याकडे गांभीर्याने बघून गुन्हे दाखल करणार की भूमाफियांना अभय देणार, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    16 hrs ago
  • दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.
    1
    दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते  अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.