logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दिग्रस रोडवरील शेतातील गोठ्याला आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.

1 day ago
user_GAJAANNAN THHAKKARE
GAJAANNAN THHAKKARE
दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
1 day ago

दिग्रस रोडवरील शेतातील गोठ्याला आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल हा शतप्रतिशत लागला आहे. सात्विक गुंडेवार हा विद्यार्थी ९७. ५० टक्के गुण मिळवत पहिला आला. ७६ पैकी ७५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
    1
    सीबीएसई इयत्ता १० वी  परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल हा शतप्रतिशत लागला आहे. सात्विक गुंडेवार हा विद्यार्थी ९७. ५० टक्के गुण मिळवत पहिला आला. ७६ पैकी ७५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    52 min ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका! हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने खांब न हटवता काम पूर्ण केल्याने सध्या वाहनांची ये-जा अडचणीत आली आहे. अनेक अपघात घडून काहींना गंभीर दुखापत व अपंगत्वही आले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वी उपोषण केल्यानंतर खांब हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिना उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Nanded #RoadSafety #Mahavitaran #PublicIssue BreakingNews MaharashtraNews TrafficProblem
    1
    रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; 
हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका!
हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने खांब न हटवता काम पूर्ण केल्याने सध्या वाहनांची ये-जा अडचणीत आली आहे. अनेक अपघात घडून काहींना गंभीर दुखापत व अपंगत्वही आले असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वी उपोषण केल्यानंतर खांब हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिना उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
#Himayatnagar #Nanded #RoadSafety #Mahavitaran #PublicIssue BreakingNews MaharashtraNews TrafficProblem
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ​हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. ​२०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. ​अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. ​चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. ​शेतकरी न्यायापासून वंचित ​निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. ​भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. ​भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ​जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    ​हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
​२०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच?
या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे.
​अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली.
​चौकशी पत्रात अनियमितता
अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे.
​शेतकरी न्यायापासून वंचित
​निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत.
​भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही.
​भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
​जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच
"महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • திண்டுக்கல் நாகல் நகர் பகுதியில் இன்று திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் செந்தில்குமார் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அப்பொழுது அவருக்கு அந்தப் பகுதி இனிப்பு பிரபலமான உற்பத்தியாளர்கள் ஜிலேபி ஊட்டி வரவேற்பு அளித்தனர்
    1
    திண்டுக்கல் நாகல் நகர் பகுதியில் இன்று திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் செந்தில்குமார் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அப்பொழுது அவருக்கு அந்தப் பகுதி இனிப்பு பிரபலமான உற்பத்தியாளர்கள் ஜிலேபி ஊட்டி வரவேற்பு அளித்தனர்
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.