लातूरच्या उदगीर तालुक्यातील हळी हंडरगुळी येथे दाखला ऑफिस समोरून अंगणवाडी आणि रामराव पाटील विद्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिमुकल्या विद्यार्थ्यांची मोठी फरफट होत आहे. रस्त्यावर तुंबलेल्या गटारीतील घाण आणि पावसाचे पाणी साचल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून या दुर्गंधीयुक्त पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. केवळ शाळकरी मुलेच नाही, तर मंदिरात दर्शनासाठी जाणारे नागरिक, अपंग आणि वृद्ध व्यक्तींनाही याच चिखलातून वाट काढावी लागत आहे. या चिखलासोबतच रस्त्यावरील मोकाट गुरे आणि कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुलांना प्रचंड भीतीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरच प्रशासन मोकाट गुरांचा बंदोबस्त करणार का, असा सवाल जनता विचारत असून 'विकास दलदलीत फसला' अशी टीका होत आहे. विशेष म्हणजे, ज्या रामराव पाटील विद्यामंदिर शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना दररोज या घाणीतून जावे लागते, ती संस्था राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याची आहे. असे असूनही त्यांचे या समस्येकडे दुर्लक्ष का होत आहे, हा संशोधनाचा विषय बनला आहे. या त्रासातून सुटका करण्यासाठी प्रशासनाने रस्त्यावरील दलदलीसह मोकाट गुरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

- नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.2
- दुबई येथे आयोजित एका जागतिक व्यासपीठावर भारतीय शिक्षिका रुबल नेगी यांना प्रतिष्ठित जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तब्बल १३९ देशांतील स्पर्धकांमधून रुबल नेगी यांची या जागतिक पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यांना एक मिलियन डॉलरची पुरस्कार राशी देऊन गौरवण्यात आले आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथे कुंडलवाडी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. १० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५७ हजार ८४० रुपये रोख रक्कम आणि सात मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी जुगार खेळणाऱ्या एकूण १२ जणांविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- ५९ जातींच्या आरक्षण वर्गीकरण करण्याच्या विरोधात ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे आढावा बैठक संपन्न झाली आहे.1
- महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे परदेशी समितीची बैठक रद्द झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारचा जोरदार निषेध केला असून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हा एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान सभेने सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफीवरील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात आणि परदेशी समितीची बैठक त्वरित घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना, "आमदारांनो, विधानभवनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठा; अन्यथा शेतकरीच उत्तर देतील!" असा थेट आणि इशारावजा इशारा कॉ. अर्जुन आडे यांनी दिला आहे.1
- लातूरच्या प्रभाग क्रमांक १८ मधील सार्वजनिक बोर गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत प्रभागातील नगरसेवकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत नगरसेवकांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्वरित सूचना दिल्या. त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळे बंद पडलेल्या बोरची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करण्यात आली आणि नवीन पाईप लाईनचे कामही पूर्ण करण्यात आले. यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बोर पुन्हा सुरू झाला आहे. यावेळी प्रभागातील आजी आणि माजी नगरसेविकांसह माधव जाधव, रंजना शिंदे, रेखा बिराजदार, शहाजी सुर्यवंशी, सोनाली सुर्यवंशी, बाळु शिंदे, तानाजी शिंदे, गुरूराज पाटील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथे पार पडलेल्या पादुका सोहळा आणि संतांच्या कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारकरी संमेलनादरम्यान पैशाचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात 'पिस्तुल्या' म्हणून ओळखला जाणारा किशोर महाराज शिवणीकर याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.1