महसूलवाढीच्या बळावर शहराला अधिक सक्षम बनवणार – महापौर रवि लांडगे *पायाभूत सुविधा, स्वच्छता व सार्वजनिक सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यावर देणार भर* पिंपरी, दि. २ पिंपरी चिंचवड शहरातील करदात्यांच्या भक्कम सहकार्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका विविध विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये शहरातील नागरिकांनी वेळेत कर भरून आपली जबाबदारी सजगपणे पार पाडली, ही बाब महापालिकेसाठी अत्यंत प्रेरणादायी असून मी सर्व करदात्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. महापालिकेला कराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग नागरिकांच्या कल्याणासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते. या पत्रकार परिषदेस विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, उपआयुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, राजेश आगळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच पत्रकार उपस्थित होते. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ता कर, पाणीकर, अग्निशमन सेवा शुल्क, झोपडपट्टी सेवाकर, बांधकाम परवानगी शुल्क, आकाशचिन्ह परवाना शुल्क अशा विविध माध्यमातून महसूल वसुलीसाठी सुयोग्य नियोजन करणाऱ्या महापालिकेच्या विविध विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांचेही महापौर रवि लांडगे यांनी यावेळी अभिनंदन केले. महापौर रवि लांडगे म्हणाले, महापालिकेच्या महसूलवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, ऑनलाईन कर भरणा, सवलत योजना आणि सुलभ सेवा यांमुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. करप्रक्रिया अधिक पारदर्शक, सोयीस्कर आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. भविष्यातही करदात्यांचा विश्वास अधिक दृढ करून महसूलवाढ साध्य करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. आगामी काळातही नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामांना गती दिली जाणार असून, शहराला अधिक सुजलाम-सुफलाम आणि स्मार्ट बनविण्याचा महापालिकेचा ठाम संकल्प असल्याचेही महापौर रवि लांडगे यांनी यावेळी नमूद केले. *करसंकलन विभागाची पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ९६१ कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल करत सलग दुसऱ्यांदा साडेनऊशे कोटींचा टप्पा पार केला आहे. शहरातील सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांपैकी ६ लाख ३१ हजार ६१५ मालमत्ताधारकांनी कर भरत सकारात्मक प्रतिसाद दिला. थकबाकीदारांवर कठोर कारवाई, व्यापक जनजागृती, तसेच अभय योजनेतून मिळालेला प्रतिसाद यामुळे महसुलात लक्षणीय वाढ झाली. निवडणूक प्रक्रियेमुळे काही प्रमाणात अडथळे आले असतानाही प्रशासनाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली असून प्रामाणिक करदात्यांमुळेच हे शक्य झाले आहे. *अग्निशमन विभागाची महसूलात भरारी; १७८.२७ कोटींचे उत्पन्न* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १७९ कोटी ६९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १६ कोटी ६४ लाखांची वाढ झाली आहे. अग्निसुरक्षा परवाने, इमारतींच्या फायर ऑडिट शुल्क, एनओसी प्रक्रिया तसेच आपत्कालीन सेवांमधून मिळणारे उत्पन्न यामध्ये वाढ झाली आहे. शहरातील वाढती नागरिकरणाची गती लक्षात घेता अग्निशमन विभागाने आधुनिक यंत्रणा, जलद प्रतिसाद प्रणाली आणि नियमित तपासणी मोहिमा यावर भर दिला आहे. परिणामी, केवळ महसूल वाढ नाही तर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक सक्षमपणे पार पाडत विभागाने आर्थिक व सेवा या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केली आहे. *पाणीकर वसुलीत महापालिकेची विक्रमी झेप; ८०.७४ कोटींची ऐतिहासिक नोंद* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ८० कोटी ७४ लाख रुपयांहून अधिक पाणीकर वसूल करत आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. क्षेत्रनिहाय वसुलीत सांगवी विभागाने सर्वाधिक ७.६५ कोटींची वसुली करत आघाडी घेतली. थकीत मिळकतधारकांवर कारवाई, डिजिटल नोटिसा, तसेच ऑनलाइन सुविधांमुळे वसुली प्रक्रियेला गती मिळाली. या वाढीव महसुलातून पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी जलवाहिन्यांचे जाळे, गळती नियंत्रण, जलशुद्धीकरण प्रकल्पांचे आधुनिकीकरण आणि वितरण क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. *आकाशचिन्ह व परवाना विभागाची महसूलवाढ; २१.५० कोटींची विक्रमी वसुली* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात सुमारे २१ कोटी ५० लाख रुपयांची वसुली करत महसूलात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १ कोटी रुपयांची वाढ झाली असून हा विभागासाठी विक्रमी टप्पा ठरला आहे. दंड व विलंब शुल्क, जाहिरात परवाना शुल्क, फलक भाडे आणि जाहिरात कर या विविध माध्यमांतून उत्पन्न वाढले. नियमांची काटेकोर अंमलबजावणी, अनधिकृत जाहिरातींवर कारवाई, तसेच तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे महसूलवाढ साध्य झाली असून यामुळे महापालिकेच्या आर्थिक बळकटीकरणास चालना मिळणार आहे. *झोपडपट्टी सेवाकर वसुलीत विक्रमी कामगिरी; १.१० कोटींचा उच्चांक* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १ कोटी १० लाख रुपयांहून अधिक सेवाकर वसूल करत गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. नियोजनबद्ध मोहीम, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच ऑनलाइन-ऑफलाइन सुलभ सुविधा यामुळे वसुलीत लक्षणीय वाढ झाली. मार्च महिन्यात सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवून नागरिकांना सोयीस्कर सेवा देण्यात आल्या. या उपक्रमांमुळे सेवाकर वसुलीत विक्रमी वाढ साध्य झाली आहे. ------------- *कला, साहित्य, नाट्य व नृत्य क्षेत्रातील योगदानाचा केला जाणार सन्मान* पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक विकासाबरोबरच कला, साहित्य, नाट्य आणि नृत्य क्षेत्रातही समृद्ध परंपरा जपणारे शहर आहे. या क्षेत्रात अनेक ज्येष्ठ कलाकारांनी दीर्घकाळ योगदान देऊन शहराची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम केली आहे. अशा कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली. महापौर रवि लांडगे म्हणाले, शहरातील कला, साहित्य, नाट्य आणि नृत्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेणे ही महापालिकेची सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारी आहे. या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि शहरातील सांस्कृतिक चळवळींना अधिक बळ मिळेल. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवत असून, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रालाही तितकेच प्रोत्साहन दिले जात असल्याचे महापौर लांडगे यांनी सांगितले. *सन्मान केल्या जाणाऱ्या कलाकारांची प्राथमिक यादी* क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या वतीने शहरातील कला, साहित्य, नाट्य आणि नृत्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये अभिनेते, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ चिटणीस मधुकर जोशी, तबलावादक धोंडीराम सायकर, आंतरराष्ट्रीय किर्तीचे नर्तक पद्मश्री नंदकिशोर कपोते, लेखक रमेश वाकनीस, अभिनेते, दिग्दर्शक सुहास जोशी, साहित्यिक, व्याख्याते, कामगार नेते अरूण बोऱ्हाडे, लेखिका कल्पना क्षीरसागर, लेखिका वंदना घांगुर्डे, शास्त्रीय संगीत गायक पंडित चव्हाण, समाज प्रबोधनकार शारदा मुंढे, भरतनाट्यम नृत्यांगना गीता शर्मा, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, निर्माते डॉ. संजीवकुमार पाटील, चित्रकार प्रफुल्ल भिष्णूकर, क्रीडा शिक्षक आणि लेखक डॉ. मनोज देवळेकर, कथ्थक नर्तिका वैशाली धोंगडे, अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार श्रीकृष्ण (समीर) कालमित्रा, कवियित्री सीमा गांधी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रकार संजय काळभोर या कलाकारांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे यांनी यावेळी दिली.

- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Maharashtra 18 news1
- अंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून दोन समाजामध्ये वाद1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे. सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत.... #पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या #PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews1
- पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!1
- Post by Kishor subhash jadhav1
- Post by Prasad Panchal1
- राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात गारपीठाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कांदा, मका, गहू, भाजीपाला पिके भुईसपाट; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी1