logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कानठळ्या बसवणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई करा; येवला शिवसेनेचे पोलिसांना निवेदन शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. ​गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ​मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

1 hr ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago

कानठळ्या बसवणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई करा; येवला शिवसेनेचे पोलिसांना निवेदन शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. ​गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ​मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. ​गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ​मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले.
​गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
​मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देवळाली मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे प्रभावित २२ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आ. सरोज अहिरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. जमीन अधिग्रहणाच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ती दूर करून शासनाने विशेष मोबदला पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पूर्णपणे भूमीहीन होणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचीही मागणी त्यांनी केली.
    1
    अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देवळाली मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे प्रभावित २२ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आ. सरोज अहिरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. जमीन अधिग्रहणाच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ती दूर करून शासनाने विशेष मोबदला पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पूर्णपणे भूमीहीन होणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचीही मागणी त्यांनी केली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • राहुरीत पोलिसांवर काही तरुणांनी चा हल्ला हल्ला करणारे तीन तरुण पोलिसांनी अटक करून भर बाजारपेठेमध्ये त्यांची धिंड काढले आहे
    1
    राहुरीत पोलिसांवर काही तरुणांनी चा हल्ला हल्ला करणारे तीन तरुण पोलिसांनी अटक करून भर बाजारपेठेमध्ये त्यांची धिंड काढले आहे
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    15 hrs ago
  • श्री विष्णु महायज्ञ एवं श्रीमद् भागवत कथा का पहला दिन, कथावाचक महंत श्री राघव दास जी महाराज
    1
    श्री विष्णु महायज्ञ एवं श्रीमद् भागवत कथा का पहला दिन, कथावाचक महंत श्री राघव दास जी महाराज
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • शहागंज–सिटी चौक रोड पर हात गाड़ियों को लेकर अतिक्रमण हटाओ; अन्यथा 10 मार्च से ‘शिवसेना स्टाइल’ आंदोलन की चेतावनी, शिवसेना स्टाइल में आप उतरोंगे तो हम भी SDPI स्टाईल में उतरेंगे रास्ते पर ! शहर में कानून का राज चेलेगा ना गुंडा गर्दी का अभी औरंगाबाद में SDPI है
    1
    शहागंज–सिटी चौक रोड पर हात गाड़ियों को लेकर
अतिक्रमण हटाओ; अन्यथा 10 मार्च से ‘शिवसेना स्टाइल’ आंदोलन की चेतावनी,
शिवसेना स्टाइल में आप उतरोंगे तो हम भी SDPI स्टाईल में उतरेंगे रास्ते पर !
शहर में कानून का राज चेलेगा ना गुंडा गर्दी का
अभी औरंगाबाद में SDPI है
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by Rajubhau Pradhan
    1
    Post by Rajubhau Pradhan
    user_Rajubhau Pradhan
    Rajubhau Pradhan
    Newspaper advertising department औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सिल्लोड : IPS परीक्षेत निवड झाल्याबद्दल जळगाव सपकाळ येथील सुपुत्र भिकन रोजेकर यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सिल्लोड येथे शिवसेना भवन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
    1
    सिल्लोड  : IPS परीक्षेत निवड झाल्याबद्दल जळगाव सपकाळ येथील सुपुत्र भिकन रोजेकर यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सिल्लोड येथे शिवसेना भवन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • तालुक्यातील अंगुलगाव येथे पीरसाईबाबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'खासदार समीर भुजबळ क्रिकेट करंडक २०२६' चा शुभारंभ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. अचानक भयानक क्रिकेट क्लब आणि आयोजक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती देविदास निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. ​कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली. "ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि गावातील क्रीडा संस्कृती अधिक प्रगल्भ व्हावी," असा विश्वास आयोजक देविदास निकम यांनी यावेळी व्यक्त केला. ही स्पर्धा मिशन हॉस्पिटल जवळील 'अचानक भयानक' मैदानावर खेळवली जात असून, यात येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत. ​उपस्थित मान्यवर: या सोहळ्याला सरपंच बाजीराव जाधव, परमानंद जाधव, पोलीस पाटील समाधान झाल्टे, उपसरपंच महेंद्र झाल्टे, भारमचे सरपंच प्रवीण गांजे, काशिनाथ साबळे, सोपान जगझाप, कारभारी आगवन, कृष्णा जानराव, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, विनोद ठोंबरे,राहुल चिंचोले यांसह अंगुलगावचे ग्रामस्थ व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​पुढील काही दिवस या मैदानात चुरशीचे सामने रंगणार असून, क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    तालुक्यातील अंगुलगाव येथे पीरसाईबाबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'खासदार समीर भुजबळ क्रिकेट करंडक २०२६' चा शुभारंभ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. अचानक भयानक क्रिकेट क्लब आणि आयोजक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती  देविदास निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.
​कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली. "ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि गावातील क्रीडा संस्कृती अधिक प्रगल्भ व्हावी," असा विश्वास आयोजक देविदास निकम यांनी यावेळी व्यक्त केला. ही स्पर्धा मिशन हॉस्पिटल जवळील 'अचानक भयानक' मैदानावर खेळवली जात असून, यात येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत.
​उपस्थित मान्यवर:
या सोहळ्याला सरपंच बाजीराव जाधव, परमानंद जाधव, पोलीस पाटील समाधान झाल्टे, उपसरपंच महेंद्र झाल्टे, भारमचे सरपंच प्रवीण गांजे, काशिनाथ साबळे, सोपान जगझाप, कारभारी आगवन, कृष्णा जानराव, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, विनोद ठोंबरे,राहुल चिंचोले यांसह अंगुलगावचे ग्रामस्थ व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​पुढील काही दिवस या मैदानात चुरशीचे सामने रंगणार असून, क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.