वेदिका आरू चे घवघवीत यश सीबीएससी परीक्षेत 97% गुणासह द्वितीय क्रमांक वेदिका आरू चे घवघवीत यश; सीबीएससी परीक्षेत ९७% गुणांसह द्वितीय क्रमांक वाशीम:केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालात मालेगाव तालुक्यातील खिर्डा गावातील रहिवासी व सध्या वाशिम येथे प्राचार्य पदावर कार्यरत असलेले रमेश मारोती आरू यांच्या सुकन्या कु. वेदिका रमेश आरू हिने घवघवीत यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कु. वेदिका हिने सीबीएससी बोर्ड परीक्षेत तब्बल ९७ टक्के गुण मिळवत वाशिम येथील हॅप्पी फेसेस विद्यालय'मधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तिच्या या उल्लेखनीय यशामुळे खिर्डा गावासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या यशाबद्दल शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. योग्य नियोजन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे तिने हे यश संपादन केले आहे. अभ्यासासोबतच इतर शालेय उपक्रमांमध्येही ती सक्रिय सहभाग घेत असल्यामुळे तिच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे. तिचे वडील रमेश आरू हे स्वतः रेखाताई राष्ट्रीय कन्या शाळा येथे प्राचार्य पदावर कार्यरत असल्याने त्यांनी वेदिकेला योग्य दिशा व मार्गदर्शन दिले. तसेच आईचे प्रोत्साहन आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे वेदिकेला यशाच्या शिखरावर पोहोचणे शक्य झाले. हॅप्पी फेसेस विद्यालयाच्या प्राचार्य व शिक्षकवर्गानेही वेदिकाच्या यशाचे कौतुक करत तिच्या भवितव्यासाठी शुभेच्छा उज्ज्वल दिल्या आहेत. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.मुळगाव मालेगाव तालुक्यातील खिर्डा गावातील नागरिकांनीही वेदिकाचे अभिनंदन केले आहे.

- Post by Santosh Dhakulkar1
- Post by Sagar Shinde1
- मूर्तिजापूर: विज्ञानाच्या युगात आजही समाजाला अंधश्रद्धेचा विळखा असल्याचे एक संतापजनक उदाहरण अकोला जिल्ह्यातील निंभा (ता. मूर्तिजापूर) येथे समोर आले आहे. एका भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली लहान मुलांच्या जीवाशी खेळ मांडल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. निंभा गावातील मधु महाराज आणि चेतन महाराज यांच्याकडून हा अघोरी प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक भोंदू बाबा चक्क एका लहान बाळाला आपल्या दातांनी धरून हवेत फिरवताना दिसत आहे. उपचाराच्या नावाखाली सुरू असलेला हा अघोरी प्रकार अत्यंत जीवघेणा असून, यामुळे त्या चिमुरड्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. कायद्याचा भंग या संदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 'जादू-टोणा विरोधी कायदा' अस्तित्वात आहे. अशा प्रकारे अंधश्रद्धेचा प्रसार करणे आणि अघोरी प्रथांचे पालन करणे हा या कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. तसेच, ज्या व्यक्तीकडे अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नाही, अशी व्यक्ती उपचार करत असेल तर तो ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडीज ॲक्ट' अंतर्गतही गुन्हा ठरतो. नागरिकांमध्ये संताप निंभा गावातील या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. "आजच्या काळातही अशा प्रकारे लहान मुलांच्या जिवाशी खेळ खेळला जाणे दुर्दैवी आहे," अशी भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहनही सुज्ञ नागरिकांकडून केले जात आहे.1
- Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image4
- Post by Sachin kadukar1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image1