जिल्हा परिषद लातूरमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काम बंद असहकार आंदोलन संपन्न लातूर (प्रतिनिधी) जय महाराष्ट्र शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या असहकार आंदोलनात जिल्हा शाखा लातूरच्या वतीने जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ४था वेतन आयोगा पासूनची वेतनत्रुटी दूर करणे, पदोन्नतीचे स्तर कमी करून पदनामात बदल करणे तसेच २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणे. या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ अधिकारी व कर्मचारी एकत्र जमून घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम न करता असहकार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार असून शासनाने मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हा परिषद मुख्यालयीन कर्मचारी तसेच पंचायत समिती अंतर्गत सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनास जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना जिल्हा शाखा लातूर, राजपत्रित महासंघ, महाराष्ट्र विकास सेवा संघटना, विस्तार अधिकारी संघटना, ग्रामपंचायत अधिकारी संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, वाहन चालक संघटना आदी विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनस्थळी राजपत्रित महासंघाचे सचिव संताजी माने (गटविकास अधिकारी, नरेगा) यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. तसेच जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष लिंबराज धुमाळ यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी जय महाराष्ट्र संघटना जिल्हा शाखा लातूरचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, उपाध्यक्ष सुजित मळभागे यांच्यासह वैजनाथ बादणे, दयानंद स्वामी, हिरागीर गिरी, ब्रह्मानंद डांगे, संजय पाटील, महेशकुमार मठपती, विठ्ठल आयनले, सुरज बरमदे, सलमान पठाण, रोहित बुडगे, प्रणव जाधव, विक्रांत जाधव, तसेच मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आंदोलनामुळे जिल्हा परिषद प्रशासनात कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.1
- दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..1
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला* नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी शिवकुमार काळे नांदेड: गेला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठळक वैशिष्ट्ये: भव्य आतिशबाजी रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता. शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पुतळ्याची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे4
- खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.1