logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाटोदा तालुका बलुतेदार संस्था पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ----- दैनिक युवक आधार पाटोदा (प्रतिनिधी):- पाटोदा व शिरुर तालुका एकत्र असणारी पाटोदा तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण कारागीर व बलुतेदारांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने १९७२ साली प्रत्येक तालुका पातळीवर या गट संस्था म्हणजेच बलुतेदार सहकारी संस्था स्थापन केल्या होत्या. या संस्थेच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ११ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यापैकी दोन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने १० संचालक बिनविरोध निवडून आले तर एका राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज न आल्याने ती जागा रिक्त राहिली या मध्ये सर्वसाधारण मतदार संघातून-बाळासाहेब शिरोळे, बबन पवार, नवनाथ भालेकर, दिनेश नारायणकर, शिवाजी डिडूळ, हरिभाऊ मस्के, इतर मागास प्रवर्गातून दिगांबर नाईकनवरे, नागरिकांच्या मागास प्रवर्गातून- महादेव उत्तम अडागळे तर महिला मतदारसंघातून- सौ.ज्योती विजय जोशी व सौ.रेखा दत्तात्रय नागथई यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाटोदा व शिरुर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेचे जवळपास साडेतीन हजार सभासद आहेत. या मध्ये सर्व पारंपरिक कारागीरसह नवीन छोटे उत्पादक व सेवा उद्योग करणारांना सभासद करण्यात आलेले आहे. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, पंतप्रधान रोजगार योजना, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांच्या बाबतीत या संस्थेतून मार्गदर्शन करण्यात येते व विविध योजने मधुन उद्योजकांना लाभ मिळवून देण्यात येतो. ---_--- या बलुतेदार संस्थेवर माजी जिल्हा परिषद सदस्य कै.नारायणराव क्षिरसागर यांचे वर्चस्व होते. परंतु तीस वर्षांपूर्वी छगन मुळे यांनी ही संस्था ताब्यात घेवून आजपर्यंत उत्तम काम करीत अधिराज्य केले. परंतु संस्थेला निवडणूकीतून आर्थिक फटका नको आणि आता थांबले पाहिजे म्हणून त्यांनी दोन मतदार संघातून आपली उमेदवारी मागे घेवून निवडणूक बिनविरोध केली हे विशेष...

1 hr ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
1 hr ago
cc4f4615-2e51-4a47-98cf-1132a9467635

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    2
    बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    user_Motiram Narke
    Motiram Narke
    Local Politician बीड, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    7
    भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    user_D K G Pradesh Prasar
    D K G Pradesh Prasar
    Media house गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।
    1
    महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    20 min ago
  • जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..
    1
    जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्‍वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
    1
    मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली.
या प्रकरणी विश्‍वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक  जालना आयुष नोपानी 
उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, 
गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे.
पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    1
    जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.