मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी एचपीव्ही लसीकरण गरजेचे! अफवांना बळी न पडता पालकांनी पुढाकार घ्यावा — आरोग्य विभागाचे आवाहन मानोरा :--- एचपीव्ही लसीकरण मोहिमेअंतर्गत १४ वर्ष पूर्ण झालेल्या व १५ वर्षे होणे बाकी असलेल्या मुलींना लस देण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुरजना अंतर्गत आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली असून घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. कोयल राठोड, उपकेंद्र फुलऊमरी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ भाग्यश्री चौधरी, आरोग्य सहाय्यिका निशा दाभने, आरोग्य सेवक विशाल राठोड, आरोग्य सेविका वंदना वाघमारे तसेच आशा कार्यकर्त्या सुशीला पवार व निशा राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी पात्र मुलींच्या पालकांना भेटून एचपीव्ही लसीचे महत्त्व समजावून सांगितले. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही लस भविष्यात गर्भाशयमुख कर्करोग होऊ नये यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लसीकरणामुळे अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ, पोलिओ, धनुर्वात, डांग्या खोकला यांसारखे आजार लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणात आटोक्यात आले आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींना एचपीव्ही लस देऊन त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करावे. ही लस सुरक्षित व प्रभावी असून मुलींच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

- स्थानिक हनुमान जयंतीनिमित्त दारव्हा शहरातील आठवडी बाजार परिसरातील जागृत हनुमान मंदिर येथे दि. १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमात विविध भक्तिगीते, भजन व सुमधुर संगीत सादर करण्यात आले. कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने वातावरण भक्तिमय केले होते. उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत होते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Dhanjay surve Surve1
- यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलीसांनी मोठी कारवाई करीत गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडला. सिनेस्टाईल पाठलाग करून वडगांव जंगल पोलीसांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये १९ गोवंशीय जनावरांची ही सुटका करण्यात आली तर चार जनावरे मृत अवस्थेत आढळून आले. पोलीसांनी २८ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल हा जप्त केला.1
- उमरखेड : अन्याय, अत्याचार व गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लेखणीच्या जोरावर लढणाऱ्या पत्रकारावरच पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल केल्याची धक्कादायक घटना उमरखेड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उमरखेड प्रेस क्लबचे अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यक्ष गजानन वानखेडे व सचिव सिद्धार्थ दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाडस 007 या युट्यूब न्यूज चॅनलचे संपादक अमित वसंतराव देशमुख यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. दि. 10 मार्च 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, गांजा, गुटखा, मटका व अवैध वाहतूक याबाबत तक्रार करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या संबंधित ठाणेदारांनी आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर दि. 12 मार्च 2026 रोजी रात्री पत्रकार म्हणून माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या अमित देशमुख यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जातीय तेढ निर्माण केल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, हे गुन्हे मध्यरात्री उशिरा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या व समाजहितासाठी कार्य करणाऱ्या एका सुशिक्षित युवकावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून त्याचे शैक्षणिक व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करत उमरखेड प्रेस क्लबने मागणी केली आहे की, संबंधित ठाणेदार शंकर पांचाळ यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करावी त्यांचे त्वरित स्थानांतरण करण्यात यावे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल गुन्हे मागे घ्यावेत पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही, तर पत्रकार संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.2
- जळका पटाचे येथे गाड्या ओढण्याची अनोखी धार्मिक परंपरा भक्तिभावात संपन्न प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे धामणगांव रेल्वे तालुक्यातील जळका (पटाचे) येथे हनुमान जयंतीच्या पौर्णिमेनिमित्त दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा भव्य गाड्या ओढण्याचा धार्मिक सोहळा यंदाही भक्तिभाव व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही अनोखी परंपरा आजही गावकऱ्यांनी श्रद्धेने जपून ठेवली असून या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला गावातील आराध्य दैवत श्री लक्ष्मी माता व तेलंगा माता देवस्थान परिसरात विशेष धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. चैत्र महिन्यातील या पवित्र रात्री पारंपरिक बंडीगाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडतो. गावातीलच नव्हे तर परिसरातील तसेच दूरवर वास्तव्यास असलेले ग्रामस्थही या दिवशी खास गावात येऊन उत्सवात सहभागी होतात. या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांना कोणत्याही प्रकारचे बैल किंवा यंत्रसामग्री जोडलेली नसते. दहा ते त्यापेक्षा अधिक बंड्या एकमेकांना बांधून त्यावर मोठ्या संख्येने भाविक बसवले जातात. प्रत्येक बंडीवर सुमारे २५ ते ३० तसेच काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक भाविक बसलेले असतानाही गाड्या पुढे सरकत असल्याने हा सोहळा पाहणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार भगत श्री पंडित दामाजी कंगाले यांच्या अंगात देवीचा संचार होऊन गाड्या पुढे सरकतात, अशी मान्यता आहे. पिढ्यान्पिढ्या त्यांच्या कुटुंबीयांनी देवीची सेवा केल्यामुळे ही दैवी शक्ती त्यांच्या परिवाराला लाभल्याचा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ परंपरा नसून श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक मानला जातो. उत्सवानिमित्त लक्ष्मी माता व तेलंगा माता पूजन, धार्मिक विधी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर समिती व भक्तगण यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीनंतरच्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करतात, ही या परंपरेची खरी ताकद आहे. श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचे प्रतीक असलेली जळका पटाचे येथील गाड्या ओढण्याची अनोखी प्रथा आजही भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Sharad Dayedar1