logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अंबिका माता यात्रेनिमित्त शिरवळ सज्ज; शिवमहोत्सव, छबिना, कुस्त्या व तमाशाचा जल्लोष जनसंघर्ष न्युज नेटवर्क शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा — वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) निमित्त शिरवळ येथे श्री अंबिका देवीची पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. यात्रेची सुरुवात शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ‘कमानपीरबाबा संदल’ या कार्यक्रमाने होणार असून त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ‘शिवमहोत्सव’ साजरा केला जाणार आहे. रविवार, दि. १९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता श्री अंबिका शासन काठीचे भव्य स्वागत होणार असून रात्री छबिन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या छबिन्यात ढोल-लेझीम खेळांचे आकर्षण असणार असून परिसरातील खेळाडूंना सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे. उत्कृष्ट खेळाडूंना बक्षिसेही दिली जाणार आहेत. सोमवार, दि. २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशा रंगणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार असून शिरवळ गावचे प्रथम सरपंच कै. पांडुरंग (भाऊ) तांबे यांच्या स्मरणार्थ पाच स्मृती चषक देण्यात येणार आहेत. रात्री ९ वाजता वसंत नांदवळकर सह रविंद्र पिंपळे यांचा नामांकित तमाशा सादर होणार आहे. यात्रेचा पुढील टप्पा गुरुवार, दि. २३ एप्रिल व रविवार, दि. २६ एप्रिल रोजी ‘मायबोली महाराष्ट्राची लोकधारा’ या विशेष कार्यक्रमाने रंगणार असून महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ऐश्वर्या जाधव यांचा बहुप्रसिद्ध गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तमाशा कार्यक्रम एस.टी. स्टँड मैदान व दत्त मंदिर परिसरात, तर कुस्त्या आणि ऑर्केस्ट्रा कार्यक्रम ज्ञानसंवर्धनी प्रशाळा मैदानावर पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमांसाठी आयोजक मंडळाने भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेला शोभा आणण्याचे आवाहन केले आहे. सरपंच, ग्रामस्थ व संयोजक समितीच्या वतीने यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

3 hrs ago
user_Sanjay  Chandgude
Sanjay Chandgude
Local News Reporter Indapur, Pune•
3 hrs ago
d2a455ae-3405-480e-b427-82a6d27ec192

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Vadodara Gujarat NH 48 accident date 3 wegti two wheeler Se jyaga par spot ho gaya hai
    1
    Vadodara Gujarat NH 48 
accident date 3 wegti 
two wheeler Se jyaga par spot ho gaya hai
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    Post Office/Courier शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमात त्यांनी समता, न्याय व बंधुतेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #सामाजिक_समता #अहिल्यानगर #समता_सप्ताह #प्रेरणादायी_विचार
    1
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमात त्यांनी समता, न्याय व बंधुतेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #सामाजिक_समता #अहिल्यानगर #समता_सप्ताह #प्रेरणादायी_विचार
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!
    1
    बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!
    user_Mahesh Mangrulkar
    Mahesh Mangrulkar
    Shirur (Kasar), Beed•
    19 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागर यांनी केला दिलखुलास डान्स.
    1
    बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागर यांनी केला दिलखुलास डान्स.
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • “जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांची सांगड घातली तर यश नक्की मिळते” याचा जिवंत आदर्श म्हणजे शेख वसिम २०१३ पासून पाटोदा ग्राम पंचायत ते नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून रोजदारी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शेख वसिम यांची अखेर अधिकृत नगरपंचायत विजतंत्रीपदी समावेशन करण्यात आले आहे. मात्र या यशामागे अनेक वर्षांचा खडतर संघर्ष दडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजदारी पद्धतीवर काम करत असताना वसिम यांनी केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही, तर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला. स्थानिक प्रशासनापासून छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालयापर्यंत विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत त्यांनी आपली लढाई सुरू ठेवली. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना न्यायालयीन लढाही त्यांनी दोन वर्षे जिद्दीने लढला. अनेकांनी “हा नाद सोड” असा सल्ला देत हेटाळणी केली, मात्र वसिम यांनी आपल्या ध्येयावरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. संकटांच्या वादळातही त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि अखेर न्यायालयीन लढ्यात यश मिळवत त्यांनी आपले स्वप्न साकार केले. आज त्यांच्या समावेशनाची अधिकृत घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संघर्षाची दखल घेत भाई विष्णुपंत घोलप,पाटोदा तालुका औद्योगिक बहुउदेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे चेअरमन डिगंबर नाईकनवरे, पत्रकार हमिदखान पठाण, पत्रकार जावेद शेख, मोसिन भाऊ जनतावाले, यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत सत्कारही केला. शेख वसिम यांच्या सह रावसाहेब काळे यांची पंप ऑपरेटर, चांगदेव अडागळे यांची पंप ऑपरेटर, सुनिल चौरे यांची पंप ऑपरेटरपदी समावेश करण्यात आला असुन या सर्वांचा प्रवास केवळ यशाची कहाणी नसून, संकटांवर मात करून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
    1
    “जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांची सांगड घातली तर यश नक्की मिळते” याचा जिवंत आदर्श म्हणजे शेख वसिम २०१३ पासून पाटोदा ग्राम पंचायत ते नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून रोजदारी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शेख वसिम यांची अखेर अधिकृत नगरपंचायत विजतंत्रीपदी समावेशन करण्यात आले आहे. मात्र या यशामागे अनेक वर्षांचा खडतर संघर्ष दडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजदारी पद्धतीवर काम करत असताना वसिम यांनी केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही, तर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला. स्थानिक प्रशासनापासून छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालयापर्यंत विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत त्यांनी आपली लढाई सुरू ठेवली. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना न्यायालयीन लढाही त्यांनी दोन वर्षे जिद्दीने लढला. अनेकांनी “हा नाद सोड” असा सल्ला देत हेटाळणी केली, मात्र वसिम यांनी आपल्या ध्येयावरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. संकटांच्या वादळातही त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि अखेर न्यायालयीन लढ्यात यश मिळवत त्यांनी आपले स्वप्न साकार केले. आज त्यांच्या समावेशनाची अधिकृत घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संघर्षाची दखल घेत भाई विष्णुपंत घोलप,पाटोदा तालुका औद्योगिक बहुउदेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे चेअरमन डिगंबर नाईकनवरे, पत्रकार हमिदखान पठाण, पत्रकार जावेद शेख, मोसिन भाऊ जनतावाले, यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत सत्कारही केला. शेख वसिम यांच्या सह रावसाहेब काळे यांची पंप ऑपरेटर, चांगदेव अडागळे यांची पंप ऑपरेटर, सुनिल चौरे यांची पंप ऑपरेटरपदी समावेश करण्यात आला असुन या सर्वांचा प्रवास केवळ यशाची कहाणी नसून, संकटांवर मात करून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.