logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तासगाव तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या बलगवडे येथील ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन धागेदोरे समोर येत असून तपास गतीने सुरू आहे. या प्रकरणात बलगवडे येथील नागेश अवताडे आणि समीर मुलानी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील मानखुर्द परिसरातील सागर गवळी यालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात खुजगाव येथील रेवन गायकवाड याचे नाव पुढे आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. रेवन गायकवाड सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. या प्रकरणाची सुरुवात आठवडाभरापूर्वी झाली, जेव्हा तासगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत चव्हाण यांना बलगवडे-मांजर्डे रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये नशेच्या इंजेक्शनचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकत कारवाई केली आणि तब्बल ८५ नशेची इंजेक्शने जप्त केली. या कारवाईनंतर पोलिसांनी नागेश अवताडे आणि समीर मुलानी या दोघांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींच्या सखोल चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ही नशेची इंजेक्शने मुंबईतील मानखुर्द परिसरात राहणाऱ्या सागर गवळी याच्याकडून आणली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सागर गवळी यालाही अटक केली. मात्र, तपासात पुढे असे समोर आले की, मानखुर्द येथे नशेची इंजेक्शने उपलब्ध असल्याची माहिती खुजगाव येथील रेवन गायकवाड यानेच आरोपींना दिली होती. या संपूर्ण साखळीत त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. बलगवडे येथील कारवाईनंतर रेवन गायकवाड अचानक फरार झाल्याने त्याच्यावरील संशय अधिक बळावला आहे. तालुक्यात काही काळापासून नशेच्या इंजेक्शनचा वापर वाढत असल्याच्या आणि काही जिम तसेच युवकांपर्यंत या इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे हे रॅकेट किती मोठे आहे, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या अवैध धंद्याची मुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान तासगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, रेवन गायकवाड याच्या शोधासाठी पोलिसांनी कंबर कसली असून विविध ठिकाणी त्याचा माग काढला जात आहे. गेल्या आठवडाभरापासून तो पोलिसांच्या हाती लागत नसला तरी त्याला जेरबंद करण्यासाठी तपास यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील प्रमुख धागेदोरे त्याच्याकडून मिळण्याची शक्यता असल्याने पोलिसांचे लक्ष सध्या त्याच्यावर केंद्रित झाले आहे. बलगवडे ड्रग्ज प्रकरणातील प्रत्येक नव्या खुलाशामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेवन गायकवाड पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकतो आणि या रॅकेटमागील संपूर्ण सत्य कधी समोर येते, याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

1 hr ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory Miraj, Sangli•
1 hr ago
dc3655af-c910-437e-91e2-f2a7014eed83

तासगाव तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या बलगवडे येथील ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन धागेदोरे समोर येत असून तपास गतीने सुरू आहे. या प्रकरणात बलगवडे येथील नागेश अवताडे आणि समीर मुलानी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील मानखुर्द परिसरातील सागर गवळी यालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात खुजगाव येथील रेवन गायकवाड याचे नाव पुढे आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. रेवन गायकवाड सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. या प्रकरणाची सुरुवात आठवडाभरापूर्वी झाली, जेव्हा तासगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत चव्हाण यांना बलगवडे-मांजर्डे रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये नशेच्या इंजेक्शनचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकत कारवाई केली आणि तब्बल ८५ नशेची इंजेक्शने जप्त केली. या कारवाईनंतर पोलिसांनी नागेश अवताडे आणि समीर मुलानी या दोघांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींच्या सखोल चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ही नशेची इंजेक्शने मुंबईतील मानखुर्द परिसरात राहणाऱ्या सागर गवळी याच्याकडून आणली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सागर गवळी यालाही अटक केली. मात्र, तपासात पुढे असे समोर आले की, मानखुर्द येथे नशेची इंजेक्शने उपलब्ध असल्याची माहिती खुजगाव येथील रेवन गायकवाड यानेच आरोपींना दिली होती. या संपूर्ण साखळीत त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. बलगवडे येथील कारवाईनंतर रेवन गायकवाड अचानक फरार झाल्याने त्याच्यावरील संशय अधिक बळावला आहे. तालुक्यात काही काळापासून नशेच्या इंजेक्शनचा वापर वाढत असल्याच्या आणि काही जिम तसेच युवकांपर्यंत या इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे हे रॅकेट किती मोठे आहे, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या अवैध धंद्याची मुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान तासगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, रेवन गायकवाड याच्या शोधासाठी पोलिसांनी कंबर कसली असून विविध ठिकाणी त्याचा माग काढला जात आहे. गेल्या आठवडाभरापासून तो पोलिसांच्या हाती लागत नसला तरी त्याला जेरबंद करण्यासाठी तपास यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील प्रमुख धागेदोरे त्याच्याकडून मिळण्याची शक्यता असल्याने पोलिसांचे लक्ष सध्या त्याच्यावर केंद्रित झाले आहे. बलगवडे ड्रग्ज प्रकरणातील प्रत्येक नव्या खुलाशामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेवन गायकवाड पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकतो आणि या रॅकेटमागील संपूर्ण सत्य कधी समोर येते, याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

More news from Sangli and nearby areas
  • अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याभोवती लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत. आपल्या नेत्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हे मराठा बांधव मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. या प्रचंड गर्दीमुळे तेथील मोबाईल टॉवर काम करत नसल्याने सर्व मोबाईल नेटवर्कची रेंज पूर्णपणे गेलेली आहे. सध्या केवळ 'व्ही आय' या कंपनीची रेंज सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याभोवती लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत. आपल्या नेत्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हे मराठा बांधव मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. या प्रचंड गर्दीमुळे तेथील मोबाईल टॉवर काम करत नसल्याने सर्व मोबाईल नेटवर्कची रेंज पूर्णपणे गेलेली आहे. सध्या केवळ 'व्ही आय' या कंपनीची रेंज सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory Miraj, Sangli•
    14 min ago
  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाने मराठा समाजाला एससी-एसटी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, अशी भूमिका पूर्वीपासूनच घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत, कुणबी नोंदी असलेल्या सर्वांना आरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी केली. मराठा समाजातील गरीब घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी अधोरेखित केले. मात्र, सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणणे न्यायालयात टिकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जरांगे पाटील यांच्याशी तातडीने बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आवाहन केले. यासोबतच, ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी असे सांगत, मराठा-ओबीसी समन्वयासाठी राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास समिती स्थापन करण्याची तयारीही आठवले यांनी दर्शवली. दरम्यान, आठवले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली. यासाठी त्यांनी विधान परिषदेची एक जागा आणि किमान दोन महामंडळांच्या अध्यक्षपदांची मागणी केली. याव्यतिरिक्त, बुद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून समाजात शांतता आणि समन्वयाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, "आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवे" असा संदेशही त्यांनी दिला.
    1
    केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाने मराठा समाजाला एससी-एसटी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, अशी भूमिका पूर्वीपासूनच घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत, कुणबी नोंदी असलेल्या सर्वांना आरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी केली.

मराठा समाजातील गरीब घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी अधोरेखित केले. मात्र, सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणणे न्यायालयात टिकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जरांगे पाटील यांच्याशी तातडीने बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आवाहन केले. यासोबतच, ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी असे सांगत, मराठा-ओबीसी समन्वयासाठी राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास समिती स्थापन करण्याची तयारीही आठवले यांनी दर्शवली.

दरम्यान, आठवले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली. यासाठी त्यांनी विधान परिषदेची एक जागा आणि किमान दोन महामंडळांच्या अध्यक्षपदांची मागणी केली. याव्यतिरिक्त, बुद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून समाजात शांतता आणि समन्वयाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, "आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवे" असा संदेशही त्यांनी दिला.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • इचलकरंजीतील टाकवडे वेस येथील घरफोडी प्रकरणात एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ॲडव्होकेट रियाज बाणदार यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला, ज्यामुळे त्यांचा युक्तिवाद यशस्वी ठरला.
    1
    इचलकरंजीतील टाकवडे वेस येथील घरफोडी प्रकरणात एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ॲडव्होकेट रियाज बाणदार यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला, ज्यामुळे त्यांचा युक्तिवाद यशस्वी ठरला.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • अंतरवाली येथे मराठा समाज तीव्र संताप व्यक्त करत आहे. त्यांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला असून, कोणतीही परिस्थिती यापुढे सहन होणार नाही, अशी तीव्र भावना मराठ्यांमध्ये आहे.
    1
    अंतरवाली येथे मराठा समाज तीव्र संताप व्यक्त करत आहे. त्यांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला असून, कोणतीही परिस्थिती यापुढे सहन होणार नाही, अशी तीव्र भावना मराठ्यांमध्ये आहे.
    user_Tej maharashtra varta
    Tej maharashtra varta
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सातारा जिल्ह्यातील बावधन, ता. वाई येथील तृतीयपंथी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेणुका गुरुरंजितानायक पुणेकर यांना 'राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026' प्रदान करण्यात येणार आहे. महालक्ष्मी आधार फाउंडेशन आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना दिला जात आहे. सौ. रेणुका पुणेकर यांचे तृतीयपंथी समाजाच्या सक्षमीकरणासाठी, सामाजिक जनजागृतीसाठी आणि समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी असलेले कार्य प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे, जो समाजातील अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे फाऊंडेशनने म्हटले आहे. महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभा सुनील शेलार यांनी सौ. रेणुका पुणेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या सामाजिक कार्याला भविष्यात अधिक यश, कीर्ती आणि सन्मान लाभो तसेच त्या असेच समाजहिताचे कार्य करत राहाव्यात, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
    1
    सातारा जिल्ह्यातील बावधन, ता. वाई येथील तृतीयपंथी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेणुका गुरुरंजितानायक पुणेकर यांना 'राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026' प्रदान करण्यात येणार आहे. महालक्ष्मी आधार फाउंडेशन आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना दिला जात आहे.

सौ. रेणुका पुणेकर यांचे तृतीयपंथी समाजाच्या सक्षमीकरणासाठी, सामाजिक जनजागृतीसाठी आणि समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी असलेले कार्य प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे, जो समाजातील अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे फाऊंडेशनने म्हटले आहे.

महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभा सुनील शेलार यांनी सौ. रेणुका पुणेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या सामाजिक कार्याला भविष्यात अधिक यश, कीर्ती आणि सन्मान लाभो तसेच त्या असेच समाजहिताचे कार्य करत राहाव्यात, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आमदार रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, सीआयडी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करत नाहीये, कारण त्यांच्यावर सरकार आणि गृह खात्याचा दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसते. या संदर्भात माहिती अधिकार (RTI) अर्जांनाही उत्तरे दिली जात नसल्याचे पवार यांनी नमूद केले. यामुळे आता स्वतः रोहित पवार आरटीआय अर्ज दाखल करणार आहेत. जर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर लवकरच एक व्हिडिओ समोर आणून 'या फोटोतील सॉली कोणाच्या गळ्यात आहेत' याचा खुलासा केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. पवार यांच्या म्हणण्यानुसार, सीआयडीकडून योग्य तपासाची अपेक्षा करणे चुकीचे आहे, कारण अजित दादांच्या प्रकरणात सीआयडीवर गृह खात्याचा दबाव आहे.
    1
    आमदार रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, सीआयडी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करत नाहीये, कारण त्यांच्यावर सरकार आणि गृह खात्याचा दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसते.

या संदर्भात माहिती अधिकार (RTI) अर्जांनाही उत्तरे दिली जात नसल्याचे पवार यांनी नमूद केले. यामुळे आता स्वतः रोहित पवार आरटीआय अर्ज दाखल करणार आहेत. जर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर लवकरच एक व्हिडिओ समोर आणून 'या फोटोतील सॉली कोणाच्या गळ्यात आहेत' याचा खुलासा केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पवार यांच्या म्हणण्यानुसार, सीआयडीकडून योग्य तपासाची अपेक्षा करणे चुकीचे आहे, कारण अजित दादांच्या प्रकरणात सीआयडीवर गृह खात्याचा दबाव आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • अंतरवाली सराटी येथे सकाळी जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. निर्मलाताई तारख यांनी जरांगे पाटील यांना औक्षण केले. जरांगे पाटील उपोषणासाठी एका वर्तुळाच्या मधोमध बसले आहेत, जे त्यांनी एक रेष मारून तयार केले आहे. या कड्याबाहेर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आणि मराठा बहिणी उपस्थित आहेत.
    1
    अंतरवाली सराटी येथे सकाळी जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. निर्मलाताई तारख यांनी जरांगे पाटील यांना औक्षण केले. जरांगे पाटील उपोषणासाठी एका वर्तुळाच्या मधोमध बसले आहेत, जे त्यांनी एक रेष मारून तयार केले आहे. या कड्याबाहेर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आणि मराठा बहिणी उपस्थित आहेत.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory Miraj, Sangli•
    45 min ago
  • सांगलीतील माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावर, एलसीबी (लोकल क्राईम ब्रँच) पथकाने गावठी बनावटीची हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर जेसीबीच्या साहाय्याने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर फॅक्टरीच्या उत्तरेस ओढ्यात छापा टाकून ही धडक मोहीम राबवण्यात आली, ज्यात हातभट्टीचा संपूर्ण अड्डा जमीनदोस्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान, ७५० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे दारूचे रसायन आणि इतर संबंधित साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच, २०० लिटर क्षमतेचे पाच लोखंडी बॅरल, डबे आणि कोळशाची पोती असा एकूण ३१,६५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी, रा. कंजारभाट वस्ती, कर्नाळ यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मोहिमेत अनिल कोळेकर, अतुल माने, महादेव नागणे, संदीप पाटील, विक्रम खोत, अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, श्रीधर वाघमोडे आदी पोलिसांनी सहभाग घेतला.
    1
    सांगलीतील माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावर, एलसीबी (लोकल क्राईम ब्रँच) पथकाने गावठी बनावटीची हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर जेसीबीच्या साहाय्याने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर फॅक्टरीच्या उत्तरेस ओढ्यात छापा टाकून ही धडक मोहीम राबवण्यात आली, ज्यात हातभट्टीचा संपूर्ण अड्डा जमीनदोस्त करण्यात आला.

या कारवाईदरम्यान, ७५० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे दारूचे रसायन आणि इतर संबंधित साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच, २०० लिटर क्षमतेचे पाच लोखंडी बॅरल, डबे आणि कोळशाची पोती असा एकूण ३१,६५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी, रा. कंजारभाट वस्ती, कर्नाळ यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मोहिमेत अनिल कोळेकर, अतुल माने, महादेव नागणे, संदीप पाटील, विक्रम खोत, अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, श्रीधर वाघमोडे आदी पोलिसांनी सहभाग घेतला.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.