logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी-चिंचवड मनपाचा महसूल वसुलीत नवा विक्रम; सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते विभागप्रमुखांचा गौरव पिंपरी, दि. १ एप्रिल (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल वसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून विविध विभागांनी विक्रमी उत्पन्न प्राप्त केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आज झालेल्या स्थायी समिती सभेत विभागप्रमुखांचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या वाढीव उत्पन्नामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीत मोठी बळकटी आली असून शहराच्या विकासाचे चक्र अधिक वेगाने धावणार आहे, असा विश्वास सभापती अभिषेक बारणे यांनी यावेळी व्यक्त केला. या सन्मान सोहळ्याप्रसंगी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, विकास साने, सुलभा उबाळे यांसह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाने यंदा सर्वाधिक ९६१ कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्यापाठोपाठ बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ६७६ कोटी रुपये, पाणीपुरवठा विभागाने ८० कोटी ७४ लाख रुपये, आकाशचिन्ह व परवाना विभागाने २१ कोटी ५० लाख रुपये आणि झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने १ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. या प्रभावी कामगिरीबद्दल सभापतींनी सहशहर अभियंता सुनील बागवानी, उप आयुक्त सचिन पवार, राजेश आगळे, अण्णा बोदडे, सीताराम बहुरे, पंकज पाटील, व्यंकटेश दुर्वास आणि मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांचे विशेष अभिनंदन केले व महसूल वाढीची ही कामगिरी कायम राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, आजच्या स्थायी समिती बैठकीत शहरातील विविध विकासकामांना आणि विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रभाग क्र. ८ मधील एमआयडीसी एस ब्लॉक, सेक्टर क्रमांक ९, ११, १२, १३ व इतर ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ८ मधील सेक्टर १ ते ४ मधील किरकोळ देखभाल दुरुस्तीची स्थापत्य विषयक कामे करणे, प्रजिमा ३१ रस्त्यावरील आवश्यक रोड फर्निचरची व इतर स्थापत्य कामे करणे, तसेच महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांसाठी लागणारी आवश्यक औषधे व साहित्य खरेदी करणे अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. हे वाढीव उत्पन्न शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. आज मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना याचा मोठा लाभ मिळेल. -अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती पिंपरी चिंचवड महापालिका.

17 hrs ago
user_वरद महाराष्ट्र वार्ता
वरद महाराष्ट्र वार्ता
Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
17 hrs ago
660c9aaa-66d5-4f8f-af9a-209498831b25

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    Pimpri Chanchwad, Pune•
    18 hrs ago
  • अंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून दोन समाजामध्ये वाद
    1
    अंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून दोन समाजामध्ये वाद
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे. सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत.... #पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या #PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews
    1
    पिंपरी चिंचवड : - 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे.
सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत....
#पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या
#PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!
    1
    पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Prasad Panchal
    1
    Post by Prasad Panchal
    user_Prasad Panchal
    Prasad Panchal
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात गारपीठाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कांदा, मका, गहू, भाजीपाला पिके भुईसपाट; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी
    1
    राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात गारपीठाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कांदा, मका, गहू, भाजीपाला पिके भुईसपाट; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.