Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
लोखंडे संभाजी नगर पत्रकार
छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.1
- नाथनगर–वडखा–वरझडी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. "राजकीय नेत्यांना फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच गाव आठवते का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावरून दररोज शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. नाथनगर, वडखा, वरझडी, बनगाव, गेवराई, गेवराई-२, आडगाव, लिंगदरी, दोनवाडा, खामखेडा, पिरवाडी, हालदुला आणि अजिंडव या सुमारे १२ ते १३ गावांतील नागरिक आणि शेंद्रा एमआयडीसीतील कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर तरुणांनी स्वतःच हे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.2
- छत्रपती संभाजीनगरच्या प्रतापनगर परिसरात व्यावसायिक संजय लाहोटी यांच्या बंगल्यावर झालेल्या सशस्त्र दरोड्यानंतर अवघ्या सहा दिवसांत पुन्हा त्याच भागात दुसरी मोठी चोरी झाली आहे. घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती देशमुख यांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास केल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. देशमुख या कामानिमित्त बाहेरगावी गेल्या असताना पहाटे ३:४५ वाजताच्या सुमारास दोन शस्त्रधारी चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. त्यांनी लोखंडी लॅच लॉक, लाकडी दरवाजाची चौकट आणि कपाट फोडून अवघ्या २० मिनिटांत ९ तोळे सोने, दीड किलो चांदीचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा चोरीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या डॉ. देशमुख यांना पोलीस ठाण्यात वीज पुरवठा नसणे आणि अधिकारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत तब्बल १० तास हेलपाटे मारावे लागल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच, फॉरेन्सिक पथकही चोरीच्या घटनेनंतर तब्बल १२ तासांनी घटनास्थळी पोहोचल्याने पोलिसांच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लाहोटी यांच्या बंगल्यातील दरोड्यात ज्या पद्धतीने दरवाजे फोडून घरात प्रवेश करण्यात आला होता, हुबेहूब त्याच पद्धतीचा वापर या चोरीतही झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यांमागे एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रतापनगर परिसरात लागोपाठ घडणाऱ्या या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी या भागात रात्रगस्त वाढवावी अशी जोरदार मागणी रहिवाशांनी केली आहे.4
- पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, 'जनलक्ष्य न्यूज'चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार - २०२६" प्रदान करण्यात आला आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. प्रमोद बारी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- औरंगाबादमध्ये एमआयएमचे (AIMIM) शहर अध्यक्ष नासेर सिद्दीकी यांचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.1
- छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. येथे थेट 'हल्लाबोल' आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे.1
- पैठण तालुक्यातील कडेठाण येथे शेतातून डाळिंब चोरी केल्याच्या संशयावरून एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास सध्या सुरू असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.1