logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा एल्गार! डी.जे.पी. कॅम्पसमध्ये ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा एल्गार! डी.जे.पी. कॅम्पसमध्ये ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार व्यसनमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला असून, ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ या संदेशाने जालना शहरातील डी.जे.पी. कॅम्पस गजबजून गेले. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत, जालना आणि डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. रेवगाव रोडवरील डी.जे.पी. कॅम्पसमध्ये पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चित्रकला, घोषवाक्य लेखन, भाषण, लोकनृत्य, लोकगीत, रिल निर्मिती, पथनाट्य आणि मौखिक कविता अशा आठ विविध प्रकारांत सहभाग घेत व्यसनमुक्त भारताचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच धन्वंतरी प्रार्थनेने झाली. सहायक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजु यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त (कौशल्य विभाग) गणेश चिमणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनल ठोसर होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. रंगमंजु यांनी व्यसनाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडत व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले. गणेश चिमणकर यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी मौखिक कविता स्पर्धेत नम्रता पवार, प्रांजल तस आणि ऋतुजा गरजे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. लोकनृत्य स्पर्धेत वैष्णवी ढाकीणकर व टीम प्रथम, तनुजा पवार व टीम द्वितीय तर सारिका नागरे व टीम तृतीय ठरली. भाषण स्पर्धेत साक्षी सुरेश डांगे, श्वेता नवनाथ देशमुख आणि भूमिका आढाव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. घोषवाक्य स्पर्धेत साक्षी राजेंद्र ठाकूर, स्नेहा श्याम खरात आणि नेहा संजय जोगदंड, तर रिल निर्मिती स्पर्धेत शिवराज टेकाळे, जयदीप शिंदे आणि प्रगती बोरुडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. लोकगीत स्पर्धेत पियुष पाटील व टीम, साईनाथ पवार आणि अर्जुन उबाळे, चित्रकला स्पर्धेत अनुश्री कदम, स्वराली लाडे आणि कल्याणी पाटील, तर पथनाट्य स्पर्धेत पल्लवी व टीम, श्रावणी व टीम आणि कैफ खान यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेतील विजेत्यांना अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संजय सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मान्यवर, परीक्षक, महाविद्यालयीन कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद सावंत आणि बी. एस. सय्यद यांनी केले, तर समारोप जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांनी केला. युवकांच्या सर्जनशीलतेतून व्यसनमुक्त भारताचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ‘नशामुक्त युवा’ अभियानाला जालना जिल्ह्यात नवी ऊर्जा मिळाली आहे.

3 hrs ago
user_सय्यद अबरार सय्यद अफसर
सय्यद अबरार सय्यद अफसर
Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात! पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप.. जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात! पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप.. आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जालना शहरात उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संगम पाहायला मिळाला. पोलीस बँड पथकाच्या दिमाखदार मानवंदनेने जयंती सोहळ्याला विशेष रंगत आली. राष्ट्रगीताच्या सुरावटीने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. या कार्यक्रमात सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    1
    जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात!

पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप..

जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात!
पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप..
आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जालना शहरात उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संगम पाहायला मिळाला. पोलीस बँड पथकाच्या दिमाखदार मानवंदनेने जयंती सोहळ्याला विशेष रंगत आली. राष्ट्रगीताच्या सुरावटीने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
या कार्यक्रमात सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    39 min ago
  • जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले
    1
    जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    40 min ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
    1
    भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा 
मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा 
मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
    user_Samadhn kalam
    Samadhn kalam
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    1
    भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ⚡ Bharat 24taas News च्या बातमीची ऊर्जा राज्यमंत्र्यांनी घेतली दखल..! कमलकीशोर जोगदंडे भोकरदन | प्रतिनिधी भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून दुरुस्ती करणारे महावितरणचे लाईनमन दिपक देवरे यांचा व्हिडिओ Bharat 24taas News चे Digital Media news Editor कमलकिशोर जोगदंडे यांनी सर्वप्रथम प्रसिद्ध केला होता. या वृत्ताची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वतः लाईनमन दिपक देवरे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच भर पावसात काम करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेतली गेल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. Bharat 24taas News ने सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या या बातमीमुळे या घटनेला राज्यस्तरावरही विशेष महत्त्व प्राप्त झाले. Bharat 24taas News
    1
    ⚡ Bharat 24taas News च्या बातमीची ऊर्जा राज्यमंत्र्यांनी घेतली दखल..!
कमलकीशोर जोगदंडे 
भोकरदन | प्रतिनिधी
भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून दुरुस्ती करणारे महावितरणचे लाईनमन दिपक देवरे यांचा व्हिडिओ Bharat 24taas News चे Digital Media news Editor कमलकिशोर जोगदंडे यांनी  सर्वप्रथम प्रसिद्ध केला होता.
या वृत्ताची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वतः लाईनमन दिपक देवरे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच भर पावसात काम करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेतली गेल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. Bharat 24taas News ने सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या या बातमीमुळे या घटनेला राज्यस्तरावरही विशेष महत्त्व प्राप्त झाले.
Bharat 24taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    22 hrs ago
  • अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देत पुढील काही काळ वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्लाही देण्यात आला.
    1
    अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू
छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देत पुढील काही काळ वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्लाही देण्यात आला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 min ago
  • मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप.. आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकाम आणि दुकान पाडल्याच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. विविध मागण्यांसाठी महेबुब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या चार रहिवाशांनी 27 जुलैपासून जालना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित विनापरवानगी बांधकाम तातडीने हटवावे, पाडण्यात आलेल्या दुकानाची नुकसानभरपाई द्यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अ
    1
    मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!

अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी..

मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!
अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी..
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप..
आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार
संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकाम आणि दुकान पाडल्याच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. विविध मागण्यांसाठी महेबुब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या चार रहिवाशांनी 27 जुलैपासून जालना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित विनापरवानगी बांधकाम तातडीने हटवावे, पाडण्यात आलेल्या दुकानाची नुकसानभरपाई द्यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अ
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    43 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.