लातूर. माता येडेश्वरी चौक बकुळ मार्ग सदगुरू नगर लातूर येथील आयोजित कालच्या या पवित्र प्रसंगी जगद ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले, माता येडेश्वरी चौक बकुळ मार्ग सदगुरू नगर लातूर येथील आयोजित कालच्या या पवित्र प्रसंगी जगद ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले, त्या सर्व मान्यवरांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करणारे प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मान्यवर, समाजातील बांधव-भगिनी, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे आयोजक व कार्यकर्ते यांचे विशेष आभार. तसेच कार्यक्रमासाठी आर्थिक, शारीरिक व मानसिक सहकार्य करणारे सहकारी व सर्व दात्यांचे व मान्यवरांचे सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. शेवटी, पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या धावपळीत कार्यक्रमाला बोलविण्यात आलेल्या सर्व मान्यवरांना कार्यक्रमच्या दिवशी फोन करून निमंत्रण देऊ शकलो नाही त्या बद्दल आपल्या सर्वांची मनापासून माफी मागतो. कार्यक्रमाच्या नियोजनात काही चुका झाल्या असतील किंवा कळत नकळत काही राहिले असेल तर पुनश्च एकदा माफी मागतो आपल्या सर्वांची साथ अशीच लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. संतोष धनुरे
लातूर. माता येडेश्वरी चौक बकुळ मार्ग सदगुरू नगर लातूर येथील आयोजित कालच्या या पवित्र प्रसंगी जगद ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले, माता येडेश्वरी चौक बकुळ मार्ग सदगुरू नगर लातूर येथील आयोजित कालच्या या पवित्र प्रसंगी जगद ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले, त्या सर्व मान्यवरांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करणारे प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मान्यवर, समाजातील बांधव-भगिनी, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे आयोजक व कार्यकर्ते यांचे विशेष आभार. तसेच कार्यक्रमासाठी आर्थिक, शारीरिक व मानसिक सहकार्य करणारे सहकारी व सर्व दात्यांचे व मान्यवरांचे सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. शेवटी, पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या धावपळीत कार्यक्रमाला बोलविण्यात आलेल्या सर्व मान्यवरांना कार्यक्रमच्या दिवशी फोन करून निमंत्रण देऊ शकलो नाही त्या बद्दल आपल्या सर्वांची मनापासून माफी मागतो. कार्यक्रमाच्या नियोजनात काही चुका झाल्या असतील किंवा कळत नकळत काही राहिले असेल तर पुनश्च एकदा माफी मागतो आपल्या सर्वांची साथ अशीच लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. संतोष धनुरे
- माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.1
- सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.1
- *लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.* लातूर शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १८.०० वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव 1) नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर) असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/-स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.1
- *लातूर शहरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या आरोपींना अटक; पोलिसांची जलद व प्रभावी कारवाई.* लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका लूटप्रकरणाचा पोलिसांनी अल्पावधीत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 14 मार्च 2026 रोजी फिर्यादी अथर्व दुष्यांत गाडेकर (वय 17 वर्षे, रा. माळी गल्ली, पटेल चौक, लातूर) यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ते व त्यांचे मित्र महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी अंदाजे 2.00 वाजता घराकडे जात असताना, आरोपी अजय दिलीप काळे (रा. मंठाळे नगर, लातूर) व त्याचे दोन साथीदार यांनी संगनमत करून मोटारसायकलवर येत त्यांना अडवले. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या हातातील अंदाजे 20,000/- रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व घटनास्थळावरून पसार झाले. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड यांनी पथक गठित करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला. अत्यंत शिताफीने आरोपी १) अजय दिलीप काळे २) देवेंद्र शिवराम सलगर ( दोघे रा. कातपूर रोड, लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी त्यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे 75,000/- रुपये) तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल (किंमत अंदाजे 60,000/- रुपये) असा एकूण 1,35,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश चित्ते तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपटले, अनिल कज्जेवाड, दीपक थोटे, राहुल गव्हाणे व राजू हनमंते यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.1
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- Post by परळी वार्ता1
- माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद, ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू1