logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या रोजच्या कटकटीला कंटाळून संतापाच्या भरात हत्या केल्याची नातू-नातसुनेची कबुली; दोघे पोलिसांच्या ताब्यात सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत केळुणे येथे मंगळवारी मध्यरात्री वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने मानेवर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सखाराम गावित (६६) व त्यांच्या पत्नी बायजाबाई सखाराम गावित (६३) अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सखाराम गावित व बायजाबाई गावित हे नेहमीप्रमाणे त्यांच्या राहत्या घरात झोपले होते. मंगळवारी रात्री सुमारे १२ वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती सकाळी परिसरात पसरल्यानंतर पोलीस पाटील बापूराव भोये यांनी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सुरगाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत अहिरे, उपनिरीक्षक मनोज कुवर, हवालदार शिवराम गायकवाड, गणेश आव्हाड, मनोज चव्हाण, रमेश चव्हाण यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी दाखल होऊन तपासासाठी आवश्यक पुरावे संकलित केले. दरम्यान, पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देविदास रघुनाथ गावित व नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दोघांनीही हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत दाम्पत्य मद्यपान करून दररोज शिवीगाळ व कटकट करीत असल्याने त्याला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी संगनमताने हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे करीत आहेत. तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल मोरे, धनंजय सिलावट यांच्यासह सुरगाणा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

1 hr ago
user_जय राजू गांगुर्डे
जय राजू गांगुर्डे
सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago
f7b2abee-540c-46ef-a645-53701275353d

केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या रोजच्या कटकटीला कंटाळून संतापाच्या भरात हत्या केल्याची नातू-नातसुनेची कबुली; दोघे पोलिसांच्या ताब्यात सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत केळुणे येथे मंगळवारी मध्यरात्री वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने मानेवर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सखाराम गावित (६६) व त्यांच्या पत्नी बायजाबाई सखाराम गावित (६३) अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सखाराम गावित व बायजाबाई गावित हे नेहमीप्रमाणे त्यांच्या राहत्या घरात झोपले होते. मंगळवारी रात्री सुमारे १२ वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती सकाळी परिसरात पसरल्यानंतर पोलीस पाटील बापूराव भोये यांनी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सुरगाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत अहिरे, उपनिरीक्षक मनोज कुवर, हवालदार शिवराम गायकवाड, गणेश आव्हाड, मनोज चव्हाण, रमेश चव्हाण यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी दाखल होऊन तपासासाठी आवश्यक पुरावे संकलित केले. दरम्यान, पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देविदास रघुनाथ गावित व नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दोघांनीही हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत दाम्पत्य मद्यपान करून दररोज शिवीगाळ व कटकट करीत असल्याने त्याला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी संगनमताने हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे करीत आहेत. तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल मोरे, धनंजय सिलावट यांच्यासह सुरगाणा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी प्रतिनिधी बोरगाव लक्ष्मण बागुल गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे
    2
    मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी

मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी बोरगाव लक्ष्मण बागुल 
गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य
    1
    शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र
    1
    शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र
लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • येवला - लासलगाव मतदार संघातून जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा.. मतदार संघातून हजारो मराठा बांधव सहभागी होणार.. आंदोलन नियोजन बैठकीत करण्यात आला निर्धार. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात नाशिकच्या येवला - लासलगाव मतदार संघातून हजारो मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा निर्धार आंदोलनाच्या नियोजनासाठी भरवस फाटा येथे झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत करण्यात आला.पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावातून किमान 5 वाहने असे 300 वाहने मुंबईत आंदोलनात जाण्यासाठी सहभागी होणार आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत टप्प्या टप्प्याने मतदार संघातून मराठा बांधव आंदोलनात सहभागी होणार आहे.
    3
    येवला - लासलगाव मतदार संघातून जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा..

मतदार संघातून हजारो मराठा बांधव सहभागी होणार..
आंदोलन नियोजन बैठकीत करण्यात आला निर्धार.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात नाशिकच्या येवला - लासलगाव मतदार संघातून हजारो मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा निर्धार आंदोलनाच्या नियोजनासाठी भरवस फाटा येथे झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत करण्यात आला.पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावातून किमान 5 वाहने असे 300 वाहने मुंबईत आंदोलनात जाण्यासाठी सहभागी होणार आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत टप्प्या टप्प्याने मतदार संघातून मराठा बांधव आंदोलनात सहभागी होणार आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 min ago
  • नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा वाढला; १०५ भारतीयांसह ३८४ प्रवासी बेपत्ता तिबेट सीमेवरील रासुवा जिल्ह्यात भीषण फ्लॅश फ्लड; पूल, रस्ते, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा वाढला; १०५ भारतीयांसह ३८४ प्रवासी बेपत्ता तिबेट सीमेवरील रासुवा जिल्ह्यात भीषण फ्लॅश फ्लड; पूल, रस्ते, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान दिव्य भारत बीएसएम न्यूज काठमांडू, दि. २६ ऑगस्ट २०२६ : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण अचानक पुरामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. तिबेटच्या सीमेलगत असलेल्या रासुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठच्या भागात हाहाकार उडाला. पुराच्या पाण्याने पूल, रस्ते, वाहने, घरे आणि विविध पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर येत असून मृतांचा आकडा सातत्याने बदलत आहे. दरम्यान, १०५ भारतीय नागरिकांसह एकूण ३८४ प्रवासी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती नेपाळ पर्यटन मंडळाने दिली आहे. भोटेकोशी नदीला अचानक महापूर बुधवारी सकाळच्या सुमारास तिबेटच्या दिशेने आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने भोटेकोशी नदीचे पात्र धोकादायकरीत्या फुगले. काही क्षणांतच पुराच्या पाण्याने नदीकाठचा परिसर जलमय झाला. रासुवा जिल्ह्यातील रसुवागढी, तिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसराला पुराचा मोठा फटका बसला. पुराचा प्रभाव नुवाकोट, धादिंग आणि इतर परिसरांपर्यंत जाणवला. पुराच्या वेगामुळे अनेक वाहने, पूल आणि रस्ते पाण्यात वाहून गेले. काही ठिकाणी चिखल आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. १०५ भारतीय बेपत्ता या आपत्तीमुळे भारतातून नेपाळमार्गे तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक यादीनुसार ३८४ प्रवासी बेपत्ता असून त्यात २९१ विदेशी नागरिक आणि ९३ नेपाळी नागरिक आहेत. विदेशी नागरिकांमध्ये १०५ भारतीयांचा समावेश आहे. बेपत्ता भारतीयांपैकी अनेक जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी प्रवास करत असल्याचे वृत्त आहे. काही प्रवासी मार्गातील विविध ठिकाणी अडकले असण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षिततेची पडताळणी सुरू आहे. पर्यटन संस्था, स्थानिक प्रशासन, पोलीस, मार्गदर्शक आणि ट्रॅव्हल एजन्सी यांच्या माध्यमातून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती पुरानंतर सुरुवातीला काही मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र, ढिगारा, चिखल, वाहून गेलेली वाहने आणि संपर्क तुटलेले भाग यामुळे मृतांची आणि बेपत्तांची अचूक संख्या निश्चित करण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. दिवसभरात विविध वृत्तसंस्थांनी मृतांचा आकडा वेगवेगळा दिला असून काही ताज्या अहवालांमध्ये मृतांचा आकडा ९५ पर्यंत पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर असून मृतांचा अंतिम आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूल आणि रस्ते वाहून गेले पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की अनेक ठिकाणी मजबूत पूलही वाहून गेले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगड-माती साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीमावर्ती भागातील संपर्क व्यवस्था प्रभावित झाल्याने बेपत्ता प्रवाशांशी संपर्क साधणे कठीण बनले आहे. पुरामुळे अनेक जलविद्युत प्रकल्प आणि वीज वितरणाच्या पायाभूत सुविधांनाही मोठे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. काही महत्त्वाचे प्रकल्प बंद पडल्याने वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. भूस्खलन आणि हिमालयीन आपत्तीचा धोका या महापुरामागे तिबेट-नेपाळ सीमावर्ती भागातील भूस्खलन किंवा हिमनदीशी संबंधित घटना कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्राथमिक उपग्रह विश्लेषणात सीमेजवळील अस्थिर डोंगररचनेतून मोठ्या प्रमाणावर खडक-माती घसरल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अचानक अडथळा निर्माण होऊन त्यानंतर प्रचंड पाण्याचा लोंढा खालील भागाकडे आला असण्याची शक्यता आहे. हिमालयीन भागात पावसाळ्यात भूस्खलन, ढगफुटी, हिमनदीतील बदल आणि अचानक पूर यांचा धोका कायम असतो. त्यामुळे या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पर्वतीय भागातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्वसूचना यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर आपत्तीग्रस्त भागात नेपाळी लष्कर, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी बचावकार्य सुरू केले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, खराब हवामान, चिखल, तुटलेले रस्ते आणि वाहून गेलेले पूल यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. भारताकडूनही नेपाळमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भारतीय दूतावासाने प्रभावित भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी मदत आणि माहिती मिळविण्याचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिल्याचे वृत्त आहे. कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण १०५ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याच्या वृत्तामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक कुटुंबे आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. संपर्क यंत्रणा खंडित झाल्याने काही प्रवाशांची माहिती तातडीने मिळत नसल्याचे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बेपत्ता प्रवाशांची यादी सातत्याने तपासली जात असून सुरक्षित असलेल्या प्रवाशांची माहिती उपलब्ध होताच ती संबंधित कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती अद्याप गंभीर नेपाळमधील या भीषण पुरामुळे हिमालयीन प्रदेशातील आपत्तीचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी, शेकडो प्रवासी बेपत्ता होणे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान यामुळे नेपाळसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. १०५ भारतीय नागरिकांसह ३८४ प्रवाशांचा शोध लागणे आणि त्यांची सुरक्षितता निश्चित होणे ही सध्या सर्वांत मोठी प्राथमिकता आहे. परिस्थिती वेगाने बदलत असल्याने मृत आणि बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत पुढील काही तासांत बदल होण्याची शक्यता आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी काठमांडू
    2
    नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा वाढला; १०५ भारतीयांसह ३८४ प्रवासी बेपत्ता
तिबेट सीमेवरील रासुवा जिल्ह्यात भीषण फ्लॅश फ्लड; पूल, रस्ते, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान
नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा वाढला; १०५ भारतीयांसह ३८४ प्रवासी बेपत्ता
तिबेट सीमेवरील रासुवा जिल्ह्यात भीषण फ्लॅश फ्लड; पूल, रस्ते, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान
दिव्य भारत बीएसएम न्यूज 
काठमांडू, दि. २६ ऑगस्ट २०२६ : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण अचानक पुरामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. तिबेटच्या सीमेलगत असलेल्या रासुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठच्या भागात हाहाकार उडाला. पुराच्या पाण्याने पूल, रस्ते, वाहने, घरे आणि विविध पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर येत असून मृतांचा आकडा सातत्याने बदलत आहे. दरम्यान, १०५ भारतीय नागरिकांसह एकूण ३८४ प्रवासी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती नेपाळ पर्यटन मंडळाने दिली आहे.
भोटेकोशी नदीला अचानक महापूर
बुधवारी सकाळच्या सुमारास तिबेटच्या दिशेने आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने भोटेकोशी नदीचे पात्र धोकादायकरीत्या फुगले. काही क्षणांतच पुराच्या पाण्याने नदीकाठचा परिसर जलमय झाला. रासुवा जिल्ह्यातील रसुवागढी, तिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसराला पुराचा मोठा फटका बसला. पुराचा प्रभाव नुवाकोट, धादिंग आणि इतर परिसरांपर्यंत जाणवला.
पुराच्या वेगामुळे अनेक वाहने, पूल आणि रस्ते पाण्यात वाहून गेले. काही ठिकाणी चिखल आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
१०५ भारतीय बेपत्ता
या आपत्तीमुळे भारतातून नेपाळमार्गे तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक यादीनुसार ३८४ प्रवासी बेपत्ता असून त्यात २९१ विदेशी नागरिक आणि ९३ नेपाळी नागरिक आहेत. विदेशी नागरिकांमध्ये १०५ भारतीयांचा समावेश आहे.
बेपत्ता भारतीयांपैकी अनेक जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी प्रवास करत असल्याचे वृत्त आहे. काही प्रवासी मार्गातील विविध ठिकाणी अडकले असण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षिततेची पडताळणी सुरू आहे. पर्यटन संस्था, स्थानिक प्रशासन, पोलीस, मार्गदर्शक आणि ट्रॅव्हल एजन्सी यांच्या माध्यमातून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
पुरानंतर सुरुवातीला काही मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र, ढिगारा, चिखल, वाहून गेलेली वाहने आणि संपर्क तुटलेले भाग यामुळे मृतांची आणि बेपत्तांची अचूक संख्या निश्चित करण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. दिवसभरात विविध वृत्तसंस्थांनी मृतांचा आकडा वेगवेगळा दिला असून काही ताज्या अहवालांमध्ये मृतांचा आकडा ९५ पर्यंत पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर असून मृतांचा अंतिम आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूल आणि रस्ते वाहून गेले
पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की अनेक ठिकाणी मजबूत पूलही वाहून गेले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगड-माती साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीमावर्ती भागातील संपर्क व्यवस्था प्रभावित झाल्याने बेपत्ता प्रवाशांशी संपर्क साधणे कठीण बनले आहे.
पुरामुळे अनेक जलविद्युत प्रकल्प आणि वीज वितरणाच्या पायाभूत सुविधांनाही मोठे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. काही महत्त्वाचे प्रकल्प बंद पडल्याने वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
भूस्खलन आणि हिमालयीन आपत्तीचा धोका
या महापुरामागे तिबेट-नेपाळ सीमावर्ती भागातील भूस्खलन किंवा हिमनदीशी संबंधित घटना कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्राथमिक उपग्रह विश्लेषणात सीमेजवळील अस्थिर डोंगररचनेतून मोठ्या प्रमाणावर खडक-माती घसरल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अचानक अडथळा निर्माण होऊन त्यानंतर प्रचंड पाण्याचा लोंढा खालील भागाकडे आला असण्याची शक्यता आहे.
हिमालयीन भागात पावसाळ्यात भूस्खलन, ढगफुटी, हिमनदीतील बदल आणि अचानक पूर यांचा धोका कायम असतो. त्यामुळे या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पर्वतीय भागातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्वसूचना यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर
आपत्तीग्रस्त भागात नेपाळी लष्कर, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी बचावकार्य सुरू केले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, खराब हवामान, चिखल, तुटलेले रस्ते आणि वाहून गेलेले पूल यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
भारताकडूनही नेपाळमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भारतीय दूतावासाने प्रभावित भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी मदत आणि माहिती मिळविण्याचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिल्याचे वृत्त आहे.
कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण
१०५ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याच्या वृत्तामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक कुटुंबे आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. संपर्क यंत्रणा खंडित झाल्याने काही प्रवाशांची माहिती तातडीने मिळत नसल्याचे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बेपत्ता प्रवाशांची यादी सातत्याने तपासली जात असून सुरक्षित असलेल्या प्रवाशांची माहिती उपलब्ध होताच ती संबंधित कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
परिस्थिती अद्याप गंभीर
नेपाळमधील या भीषण पुरामुळे हिमालयीन प्रदेशातील आपत्तीचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी, शेकडो प्रवासी बेपत्ता होणे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान यामुळे नेपाळसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
दरम्यान, बचावकार्य सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. १०५ भारतीय नागरिकांसह ३८४ प्रवाशांचा शोध लागणे आणि त्यांची सुरक्षितता निश्चित होणे ही सध्या सर्वांत मोठी प्राथमिकता आहे. परिस्थिती वेगाने बदलत असल्याने मृत आणि बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत पुढील काही तासांत बदल होण्याची शक्यता आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज 
प्रतिनिधी काठमांडू
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्-आयुक्त शेखर सिंह यांची पत्रकार परिषदेत माहिती *नाशिक नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक शहरात आयोजित कुंभ भक्ती संगमात शुक्रवार २८ ऑगस्टपासून भक्ती, संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. ‘कुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे हा महोत्सव होईल. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. या महोत्सवाचे २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार असून, रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे ‘अभंगवारी’ सादर करतील. 29 ऑगस्टला भक्ती संमेलनासह कीर्तन-भजन २९ ऑगस्ट हा दिवस ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ति कार्यक्रमांच्या सादरीकरणांनी समृद्ध असेल. सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल. पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील. दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून, डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा यांचा या सत्रात सहभाग असेल. भक्ती संमेलनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकिर्तनापर्यंत महोत्सवाच्या ३० ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थेचे नियोजन महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहनांसाठी निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत आणि वाहतूक पोलिस तसेच कार्यक्रमस्थळी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. सायंकाळच्या कार्यक्रमांना रसिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुरेसा वेळ ठेवून ठक्कर डोम येथे पोहोचावे, असे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले. आयुक्त श्री. सिंह म्हणाले, की ‘कुंभ भक्ती संगम’ हा नाशिककरांसाठी आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्ती, संगीत आणि विविध भारतीय परंपरांचा अनुभव घेण्याची एक चांगली संधी आहे. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. त्यामुळे नाशिककरांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तीन दिवसांचा आनंद घ्यावा.” कार्यक्रमाच्या पावित्र्याला सहकार्य करण्याचे आवाहन शबद कीर्तनाच्या वेळी उपस्थित भाविकांनी अध्यात्मिक भाव जपण्यासाठी शिर झाकून ठेवावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे पावित्र्य, परिसरातील स्वच्छता आणि शिस्त कायम राहावी, यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कार्यक्रमस्थळी करू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्थळ : ठक्कर डोम, नाशिक कालावधी : २८ ते ३० ऑगस्ट २०२६ प्रवेश : विनामूल्य; तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही “सिंहस्थ महाकुंभ मेळा"च्या तयारीमध्ये पायाभूत सुविधांसोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभवाला देखील महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तन आणि अभंगवारीपासून गुरबाणी शबद कीर्तन आणि मणिपूरच्या नट संकीर्तनापर्यंत विविध परंपरा नाशिकमध्ये एकत्र येत आहेत. हा खऱ्या अर्थाने भक्तीचा संगम आहे.” - शेखर सिंह, आयुक्त, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण.
    1
    नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्-आयुक्त शेखर सिंह यांची पत्रकार परिषदेत माहिती
*नाशिक नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक शहरात आयोजित कुंभ भक्ती संगमात शुक्रवार २८ ऑगस्टपासून भक्ती, संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. ‘कुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे हा महोत्सव होईल. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.
या महोत्सवाचे २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार असून, रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे ‘अभंगवारी’ सादर करतील.
29 ऑगस्टला भक्ती संमेलनासह कीर्तन-भजन
२९ ऑगस्ट हा दिवस ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ति कार्यक्रमांच्या सादरीकरणांनी समृद्ध असेल. सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल.
पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील.
दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून, डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा यांचा या सत्रात सहभाग असेल.
भक्ती संमेलनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकिर्तनापर्यंत
महोत्सवाच्या ३० ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल.
वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थेचे नियोजन
महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहनांसाठी निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत आणि वाहतूक पोलिस तसेच कार्यक्रमस्थळी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. सायंकाळच्या कार्यक्रमांना रसिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुरेसा वेळ ठेवून ठक्कर डोम येथे पोहोचावे, असे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले. 
आयुक्त श्री. सिंह म्हणाले, की ‘कुंभ भक्ती संगम’ हा नाशिककरांसाठी आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्ती, संगीत आणि विविध भारतीय परंपरांचा अनुभव घेण्याची एक चांगली संधी आहे. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. त्यामुळे नाशिककरांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तीन दिवसांचा आनंद घ्यावा.”
कार्यक्रमाच्या पावित्र्याला सहकार्य करण्याचे आवाहन
शबद कीर्तनाच्या वेळी उपस्थित भाविकांनी अध्यात्मिक भाव जपण्यासाठी शिर झाकून ठेवावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे पावित्र्य, परिसरातील स्वच्छता आणि शिस्त कायम राहावी, यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कार्यक्रमस्थळी करू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : ठक्कर डोम, नाशिक
कालावधी : २८ ते ३० ऑगस्ट २०२६
प्रवेश : विनामूल्य; तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही
“सिंहस्थ महाकुंभ मेळा"च्या तयारीमध्ये पायाभूत सुविधांसोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभवाला देखील महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तन आणि अभंगवारीपासून गुरबाणी शबद कीर्तन आणि मणिपूरच्या नट संकीर्तनापर्यंत विविध परंपरा नाशिकमध्ये एकत्र येत आहेत. हा खऱ्या अर्थाने भक्तीचा संगम आहे.”
- शेखर सिंह, आयुक्त, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" ​काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! ​रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? ​अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. ​गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा
    2
    माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!"
​काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो!
​रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार?
​अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे.
​गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात!
तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील उमराणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था, कर्मचारी दवाखान्यात येतात की नाही प्रश्नचिन्ह
    1
    दिंडोरी तालुक्यातील उमराणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था, कर्मचारी दवाखान्यात येतात की नाही प्रश्नचिन्ह
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.