logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

टिपू सुलतान प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली दिलगिरी : 'टिपू सुलतान याला (Tipu Sultan Controversy) छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे', असे विधान करून नवा वाद ओढवून घेणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मंगळवारी याप्रकरणी अखेर दिलगिरी व्यक्त केली. भाजपच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दांचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमींप्रती दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचविण्याचा माझा हेतू नव्हता,'' असे सपकाळ यांनी 'एक्स'द्वारे सांगितले. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतान याचे छायाचित्र लावले होते. या छायाचित्रावरून वाद झाला असताना सपकाळ यांनी, टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, असे विधान केले होते. या विधानावरून सपकाळ यांच्याविरोधात भाजपने राज्यभर निषेध मोर्चे काढले. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. ''माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भाजप आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला, हे आपण पुण्यात पाहिले आहे,'' असे सपकाळ म्हणाले. 'बंधुभाव जपावा, हीच भावना' सपकाळ म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्याशी तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. टिपू सुलतानने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये. जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये, हीच भूमिका मी मांडली होती.''

2 hrs ago
user_महाराष्ट्राचा एकमत
महाराष्ट्राचा एकमत
पत्रकार इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

टिपू सुलतान प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली दिलगिरी : 'टिपू सुलतान याला (Tipu Sultan Controversy) छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे', असे विधान करून नवा वाद ओढवून घेणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मंगळवारी याप्रकरणी अखेर दिलगिरी व्यक्त केली. भाजपच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दांचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमींप्रती दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचविण्याचा माझा हेतू नव्हता,'' असे सपकाळ यांनी 'एक्स'द्वारे सांगितले. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतान याचे छायाचित्र लावले होते. या छायाचित्रावरून वाद झाला असताना सपकाळ यांनी, टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, असे विधान केले होते. या विधानावरून सपकाळ यांच्याविरोधात भाजपने राज्यभर निषेध मोर्चे काढले. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. ''माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भाजप आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला, हे आपण पुण्यात पाहिले आहे,'' असे सपकाळ म्हणाले. 'बंधुभाव जपावा, हीच भावना' सपकाळ म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्याशी तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. टिपू सुलतानने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये. जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये, हीच भूमिका मी मांडली होती.''

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
    1
    वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • वाघोली मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन नुकतेच पार पडले,या वेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
    1
    वाघोली मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन नुकतेच पार पडले,या वेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    13 hrs ago
  • डंपरचे चाक महिलेच्या पायावरून... बोल्हेगावात थरारक अपघात... अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला. वीटाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे. वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतीरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास वीटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे.या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, गतीरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. याच वेळी सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र धस यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या परिसरात तातडीने गतीरोधक बसवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे."या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने गतीरोधक बसवले नाहीत, तर आम्ही आंदोलन करू." असा इशारा नागरिकांनी दिला आहे.बोल्हेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.
    1
    डंपरचे चाक महिलेच्या पायावरून...
बोल्हेगावात थरारक अपघात...
अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला. वीटाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे. वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतीरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास वीटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे.या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, गतीरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. याच वेळी सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र धस यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या परिसरात तातडीने गतीरोधक बसवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे."या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने गतीरोधक बसवले नाहीत, तर आम्ही आंदोलन करू." असा इशारा नागरिकांनी दिला आहे.बोल्हेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • महेदविया कब्रस्तानच्या सुरक्षा भिंतीचे काय? एस.एम यांचा प्रश्न
    1
    महेदविया कब्रस्तानच्या सुरक्षा भिंतीचे काय? एस.एम यांचा प्रश्न
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *सांगली–मिरज रोडवर २० वर्षांनंतर अतिक्रमणावर बुलडोझर; पृथ्वीराज पवारांचा इशारा – “अन्याय सहन करणार नाही!”* ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001
    1
    *सांगली–मिरज रोडवर २० वर्षांनंतर अतिक्रमणावर बुलडोझर; पृथ्वीराज पवारांचा इशारा – “अन्याय सहन करणार नाही!”*
==================
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    13 hrs ago
  • Post by Deepak Sagar
    1
    Post by Deepak Sagar
    user_Deepak Sagar
    Deepak Sagar
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • वाघोली येथील आव्हाळवाडी चौकामध्ये वाघोली गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर पावसाळी गटार लाईन ला मोठा खड्डा पडला आहे यामध्ये अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, प्रशासनाने याकडे लक्ष देत दुरुस्त करावे अशी मागणी केली जात आहे
    2
    वाघोली येथील आव्हाळवाडी चौकामध्ये वाघोली गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर पावसाळी गटार लाईन ला मोठा खड्डा पडला आहे यामध्ये अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, प्रशासनाने याकडे लक्ष देत दुरुस्त करावे अशी मागणी केली जात आहे
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    14 hrs ago
  • एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत… आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर… अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात आल्या. मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाड झाला. शिरूरजवळ बस अचानक बंद पडली… विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला. शिरूर आगारातून सीएनजी बस मागविण्यात आली,पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती! तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला. विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं… शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसाबसा पूर्ण करण्यात आली. या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला. या घटनेनंतर काही दिवसांतच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला. प्राथमिक तपासात समोर आलं की, चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती.थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं. परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली… मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिक्षक संघटनांचा आरोप आहे की – बसची फिटनेस तपासणी होत नाही चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही विश्रांती वेळ दिली जात नाही आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही “उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत”अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे. या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत.काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत. “जोपर्यंत एसटी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत,” अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणावरही होणार आहे. काही शाळा खासगी स्कूलबस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत. पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? “स्कूलबसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत. आता एसटी प्रशासनाला शाळांना भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे. बसची स्थिती, चालकांची पात्रता, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षिततेची हमी हे सर्व स्पष्ट करावं लागेल. जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. एसटी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? कॉमेंट करून नक्की सांगा.
    1
    एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?
जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत!
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत…
आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर…
अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती.
या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात आल्या.
मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाड झाला.
शिरूरजवळ बस अचानक बंद पडली…
विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला.
शिरूर आगारातून सीएनजी बस मागविण्यात आली,पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती!
तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला.
विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं…
शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसाबसा पूर्ण करण्यात आली.
या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला.
या घटनेनंतर काही दिवसांतच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला.
प्राथमिक तपासात समोर आलं की, चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती.थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं.
परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला.
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली…
मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या.
या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
शिक्षक संघटनांचा आरोप आहे की –
बसची फिटनेस तपासणी होत नाही
चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही
विश्रांती वेळ दिली जात नाही
आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही
“उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत”अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे.
या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत.काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत.
“जोपर्यंत एसटी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत,”
अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे.
याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणावरही होणार आहे.
काही शाळा खासगी स्कूलबस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत.
पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?
“स्कूलबसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?”
असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत.
आता एसटी प्रशासनाला शाळांना भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे.
बसची स्थिती, चालकांची पात्रता, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षिततेची हमी
हे सर्व स्पष्ट करावं लागेल.
जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही.
एसटी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील.
या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे?
कॉमेंट करून नक्की सांगा.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.