Shuru
Apke Nagar Ki App…
वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेने १५ हजारांची रक्कम मिळाली परत* चंद्रपूर :- येथील गिरनार चौकातील सिग्नलवर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस हवालदार सुभाष जाधव यांना त्याच चौकातून ऑटोमधून जात असलेल्या एका व्यापाराची १५ हजारांची रोख रक्कम खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच ती रक्कम उचलून ऑटो थांबवून त्या व्यापाऱ्याला रकमेबद्दल विचारणा केली असता ती रक्कम त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सदर रक्कम माजी नगरसेवक रामू तिवारी यांच्या समक्ष व्यापाऱ्याच्या हवाली केली. या वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे ती रक्कम सदर व्यक्तीला परत मिळाली. या घटनेनंतर वाहतूक पोलिस हवालदार सुभाष जाधव यांचे कौतूक करण्यात आले.
Disha News
वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेने १५ हजारांची रक्कम मिळाली परत* चंद्रपूर :- येथील गिरनार चौकातील सिग्नलवर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस हवालदार सुभाष जाधव यांना त्याच चौकातून ऑटोमधून जात असलेल्या एका व्यापाराची १५ हजारांची रोख रक्कम खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच ती रक्कम उचलून ऑटो थांबवून त्या व्यापाऱ्याला रकमेबद्दल विचारणा केली असता ती रक्कम त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सदर रक्कम माजी नगरसेवक रामू तिवारी यांच्या समक्ष व्यापाऱ्याच्या हवाली केली. या वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे ती रक्कम सदर व्यक्तीला परत मिळाली. या घटनेनंतर वाहतूक पोलिस हवालदार सुभाष जाधव यांचे कौतूक करण्यात आले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- गडचांदुरात पेट्रोल पंपावर मध्यरात्री चोरी, सीसीटीव्ही मध्ये कैद झाला चोरटा चंद्रपूर - गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी कॅबिनमध्ये झोपलेले असतानाच चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश केला आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली तब्बल १ लाख २ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना २३ ऑगस्टच्या रात्री ते २४ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास घडली. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर पेट्रोल पंपावरील तीन कर्मचारी कॅबिनमध्ये झोपले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने खिडकीतून कॅबिनमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, चोरटा कॅबिनमध्ये शिरून रोकड घेऊन पसार होत असताना तिथे झोपलेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी एकालाही जाग आली नाही. दरम्यान, सकाळी चोरीचा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी गडचांदूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करणारा संशयित स्पष्टपणे कैद झाला असून, फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले असून, फरार आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. या धाडसी चोरीमुळे गडचांदूर शहरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी अशा घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल1
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ), सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद ) सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण ) निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड भिवापुर- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे, सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे, जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत, सदस्य - शरद मिरे, अमर मोकाशी, जितेंद्र धोटे, राम वाघमारे, हर्षल राऊत, निशा जांभुळे, सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1
- भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !1
- देश की शिक्षा पर खुलकर चर्चा | बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू Rok Tok Hindustan news imran shaikh देश की शिक्षा व्यवस्था, मौजूदा चुनौतियों और बच्चों के भविष्य जैसे अहम मुद्दों पर बाबा खान से खास बातचीत। देखिए Rok Tok Hindustan News पर बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू और जानिए शिक्षा को लेकर उनकी बेबाक राय। सच • साहस • सवाल | Rok Tok Hindustan News #RokTokHindustanNews #बाबाखान #शिक्षा #Education #EducationSystem #ExclusiveInterview #देशकीशिक्षा #MumbaiNews #MumbraNews #News #BreakingNews1
- कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! कुही (विशेष प्रतिनिधी): कुही तालुका कृषी कार्यालयाकडून सन २०२५-२०२६ या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वित्तीय अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कागदोपत्री शिबिरे दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा संशय शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. काय आहे प्रकरण? तालुका कृषी कार्यालयामार्फत कुही तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक शिबिरासाठी जेवणाचा खर्च ₹४,८०० (आलूभात, कढी, जिलेबी) आणि प्रत्येकी ₹८,८२३ किमतीच्या साहित्य किटचे वाटप केल्याचे दाखवले गेले आहे. या किटमध्ये फ्लॅक्स बॅनर (₹५०८), माहिती पुस्तिका (₹९५), बॉलपेन (₹१०), फोल्डर फाईल (₹३८), नोटपॅड (₹५९), मार्कर पेन (₹२३), रजिस्टर (₹६५) आणि स्केच पेन (₹२३) यांचा समावेश असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. कागदोपत्री दाखवलेला खर्च आणि गावांची यादी: वग: १२ शिबिरे – जेवण खर्च ₹५७,६०० अडम: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० नवरगाव: ४ शिबिरे खुर्षेपार: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० सिल्ली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० आवरमारा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० चिखली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० विरखंडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० वेळगाव: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० गोन्हा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० मांगली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० पारडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० कऱ्हाडला: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० या सर्व गावांमध्ये प्रत्येक शिबिरासाठी ₹८,८२३ चे साहित्य वाटप केल्याचे दाखवून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. बोगस वाहतूक बिलांचाही प्रकार! एवढेच नव्हे तर 'पानी फाउंडेशन'च्या कामासाठी वडेगाव (काळे) ते कुही आणि सोनपुरी ते कुही या मार्गावर 'कृषी ताई' महिलांना मॅटाडोरने आणले असताना, त्याच्याऐवजी बसचे जास्त भाडे दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याचेही समोर आले आहे. शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन: शासनाचा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा कृषी अधिकारी अशा प्रकारे लाटत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात कुही तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी लवकरच तालुका कृषी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आणि युवकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (मोर्चीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.) – संजय अतकरी, PTN न्यूज, कुही.1
- ईद-ए-मीलादुन्नबी च्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात पोलिसांचे भव्य पथ संचलन शहरात सुरक्षेचा आढावा1